Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अन्नधान्य व खाद्य पदार्थ यांच्यावरील जीएसटी रद्द करण्याची युवासेनेची मागणी
    आरोग्य

    अन्नधान्य व खाद्य पदार्थ यांच्यावरील जीएसटी रद्द करण्याची युवासेनेची मागणी

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 15, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । अन्नधान्ये, डाळी, कडधान्ये इत्यादी वस्तूवर लागू केलेले जीएसटी केंद्र सरकारने रद्द करावी, अशी मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांना युवासेनेतर्फे देण्यात आले आहे.

    दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने २०१७ मध्ये जीएसटी प्रस्तावित असतांना अन्यधान्यासह इतर खाद्य पदार्थ वस्तूंना जीएसटी कक्षाच्या बाहेर ठेवण्यात आले होते. शिवाय वस्तू व्हॅट मधूनही वगळण्यात आल्या होत्या. ह्या सर्व वस्तूंचे उत्पादन देशातील छोटे छोटे शेतकरी करत असतात लहरी निसर्ग व उत्पादित शेतमालाला मिळणारी किंमत याचा मेळ बसवणे कठीण आहे. सुरवातीस फक्त रजिस्टर ब्रँडमधील विक्री होणाऱ्या अन्नधान्ये, डाळी, कडधान्ये इत्यादी वस्तू समाजातील सधन वर्गच वापरतात असे सांगून त्यावर कर आकारणी केली गेली. आता त्यात बदल करून अन्नधान्यासह गूळ,आटा, रवा, मैदा, पोहा, मुरमुरे, डाळी, कडधान्ये, दही, लस्सी, ताक इत्यादी सर्वच जीवनावश्यक दैनंदिन गरजेच्या वस्तूचा समावेश जीएसटी लागू केला आहे. तरी केंद्र सरकारने, अन्नधान्ये, डाळी, कडधान्ये इत्यादी वस्तूवर लागू केलेले जीएसटी रद्द करावी, अशी मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांना शुक्रवारी १५ जुलै रोजी दुपारी देण्यात आले.

    याप्रसंगी युवासेना महाराष्ट्र राज्य सहसचिव विराज कावडीया, जिल्हा युवाधिकारी शिवराज पाटील, चंद्रकांत शर्मा, पंकज राणे, प्रीतम शिंदे, रोहित भामरे आदी उपस्थितीत होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    भुसावळात शस्त्रसाठा उघड; तरुणाच्या अटकेने सुरक्षा प्रश्न ऐरणीवर

    May 3, 2026

    शॉर्टसर्किटचा कहर; चटई कंपनीपासून तीन कंपन्यांपर्यंत आगीचा फैलाव

    May 3, 2026

    हळदीच्या कार्यक्रमाहून परतताना अपघात, तरुण ठार तर एक जखमी !

    May 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.