जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्रात शिंदे गटाची सत्ता स्थापन झाल्यानंतर आता मंत्रीपदासाठी बंडखोर आमदारांना आस लागली आहे. राजकीय क्षेत्रात मंत्रीपदासाठी खलबते सुरू आहे. शिंदे गटातील पाचोरा-भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांची मंत्रीमंडळात वर्णी लागणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. राज्यात मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्विकारल्यानंतर राजकीय क्षेत्रात मंत्रीमंडळ निवडीबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. एकीकडे माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील यांचे उत्तर महाराष्ट्रात मंत्रीमंडळात मंत्रीपद निश्चित मानले जात असले तरी दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे असलेले बंडखोर आमदार किशारे पाटील यांचे नाव आघडीवर आहे. किशोर पाटलांच्या रूपाने नवीन चेहरा लाभल्यास शिंदे गटाला विस्ताराची मोठी संधी…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्रात आज आषाढी एकादशी निमित्त एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथील विठ्ठल-रखुमाईचे महापूजा केले आहे. भाजपाच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने त्यांना हा बहुमान मिळाला. शरद पवार यांनी औरंगाबाद येथे माध्यमांशी संवाद साधला असून शरद पवार यांनी यु-टॅर्न घेतला आहे. औरंगाबाद येथे शरद पवार यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बैठकीत मध्यावधी निवडणुका होतील, अश्या बातम्या समोर आल्या परंतु त्यावरही त्यांनी खुलासा केला आहे, ‘मध्यावधी निवडणुका लागतील असे मी बोललो नाही. निवडणुकांसाठी आपण तयार असले पाहिजे असे मी कार्यकर्त्यांना म्हणालो होतो’. ‘औरंगाबादच्या नामांतराबाबत सुसंवाद नव्हता, नामांतराचा निर्णय घेणार याबाबत माहिती नव्हती. विधानसभा निवडणुका तिन्ही पक्षाने एकत्रपणे लढण्याचा माझी मनस्थिती आहे.…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील नेरी नाक्यावरील ईदगाव मैदानात बकरी ईदनिमित्त मुस्लिम बांधवांनी नमाज पठन करून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आले. बकर ईद निमित्त मुस्लिम कब्रस्तान व इदगाह ट्रस्टतर्फे अजिंठा चौक येथील इदगाह मैदानावर रविवारी १० वाजता सकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास शहरातील मुस्लिम बांधवांनी एकाचवेळी नमाज अदा करण्यात आली. यावेळी मौलाना उस्मान कासमी यांनी दुवा पठण करत अल्लाहाकडे साकडे घातले. गात सुख शांती नांदू दे अशी दुवा केली असता त्यांच्या प्रत्येक शब्दावर उपस्थित हजारो लोकांनी आमीन म्हणून दुआ कबूल हो असे अनुमोदन दिले. याप्रसंगी इदगाह ट्रस्टचे अध्यक्ष वहाब मलिक, सचिव फारुक शेख, खजिनदार अशपाक बागवान, सहसचिव अनिस शहा व मुकीम शेख, संचालक…
अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील भिलाली येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील भिलाली येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवार ६ जुलै रोजी अल्पवयीन मुलीचे पालक हे शेतात कामासाठी गेले. त्यावेळी मुलगी घरी एकटी होती. सायंकाळी तिचे पालक घरी आल्यावर मुलगी घरी दिसून आली नाही. त्यांनी गावात आणि नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला परंतू मुलगी कुठेही आढळून आली नाही. दरम्यान, मुलीच्या पालकांनी मारवड पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिली. याप्रकरणी मारवड पोलीस…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ गुहेजवळ झालेल्या ढगफुटीत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे , तब्बल 40 जणं बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. यात्रेला मुंबई पोलीस हवालदार देखील गेले होते सुदैवाने त्यावेळी अमरनाथ गुहेजवळ नसल्याने संकट टळले होते तोच काळाने घाला घातला श्रीनगरच्या दिशेने परताना सकाळी अचानक त्यांना श्वसनाचा त्रास झिल्याने उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मुंबई येथील विलेपार्ले पोलीस ठाणे येथे नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार सुनील देवजी जंगम 3 जुलै ते 17 जुलैपर्यंत अर्जित रजेवर होते. यादरम्यान ते अमरनाथ यात्रेला गेले होते. 9 जुलै रोजी दर्शन घेऊन श्रीनगरच्या दिशेने परताना श्वसनाचा त्रास होऊ…
जळगाव-प्रतिनिधी प्रविण पाटील। जळगाव तालुक्यातील विटनेर गावाजवळ भरधाव महिद्रा पिकअप मालवाहू गाडीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना दुपारी घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील विटनेर गावापासून चार किलोमीटर अंतरावर नेरीकडून एरंडोलकडे जाणाऱ्या महिंद्रा पिकअप मालवाहू गाडी (जीजे ०५ बीटी ६४८९) ने जात असतांना समोरून येणाऱ्या दुचाकी (एमएच २८ डब्ल्यू ९४४०) ला जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी १० जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीस्वार साहेबराव चिमा शिंदे रा. चिंचखेडा ता. मोताळा जि. बुलढाणा हा तरूणाचा मृत्यू झाला. तर गाडीतील चालकासह इतर दोघे जखमी झाले आहे. जखमींना तातडीने रूग्णवाहिकेने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ…
जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे खरीप हंगामातील पिकांसाठी हे वरदान ठरत आहे अजून पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याची हवामान खात्याने माहिती दिली. गेल्या आठवड्याच्या विश्रांतीनंतर जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरलेल्या पिकांसाठी या पावसाने चांगले जीवदान मिळणार आहे. दुसरीकडे तापी नदीच्या पातळीत वाढ झाल्याने हातनुर धरणाचे दरवाजे देखील उघडण्यात आले आहे. तापी नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहे.अजून पुढील तीन दिवस जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मेहरुण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये आषाढी एकादशीनिमित्त शनिवार 9 जुलै रोजी सकाळी 9 वाजता विशेष दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका धरत वातावरण भक्तीमय केले होते. श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयमध्ये सकाळी विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत तसेच मुलींनी पारंपारिक विषयांमध्ये वस्त्र परिधान करून विद्यालयात उपस्थिती दिली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी कुर्ता पायजमा तर मुलींनी नऊवारी साडी व पातळ घातलं होतं.मुलांनी वारकऱ्यांच्या वेशभूषांमध्ये दिंडीत सहभाग घेतल्याने चैतन्यमय वातावरण झालं होतं. दिंडीमध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मनमोहक मूर्ती ठेवलेल्या होत्या. पालखी पूजन व मूर्तिपूजन संस्थेचे अध्यक्ष तथा मेहरुणचे नगरसेवक प्रशांत नाईक…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मु.जे.महाविद्यालयातील तत्वज्ञान विभागातर्फे एक दिवसीय व्याख्यानाचे शनिवारी 9 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आयोजन करण्यात आले. भारतीय दार्शनिक अनुसंधान परिषदेच्या वतीने हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ऑनलाईन माध्यमातून सहभागी असलेले अखिल भारतीय दर्शन परिषदेचे अध्यक्ष डॉ. जटाशंकर यांनी बीज भाषण केले. तसेच प्रथम मुख्य वक्ता नव नालंदा महाविहारा, बिहार येथील डॉ. सुशिम दुबे यांनी योग विषयाचे महत्त्व तसेच आताच्या पिढीला त्याची आवश्यकता व आहारातील सात्विक, राजसिक आणि तामसीक यांच्यातिल महत्व आदि संकल्पनांचे सुस्पष्ट विवरण त्यांनी सहज आणि सोप्या शब्दात समजावून सांगितले. याप्रसंगी द्वितीय मुख्य वक्ता देव संस्कृती विश्वविद्यालयाचे (हरिद्वार) योग आणि आरोग्य विभागाचे विभागप्रमुख डॉ.…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्तास्थापन करून नवीन सरकार उभे केले आहे. यातच शिवसेने कडून एकनाथ शिंदे गटातील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर अनेक टीका आणि शब्दाचा भडीमार होत आहे. यावरच पलाटवार करताना बंडखोर आमदारांमध्ये सहभागी दिपक केसरकर ठाकरेवर निशाणा साधला आहे. आम्हीही खूप बोलु शकतो, पण आम्ही बोलणार नाही, केसरकर भडकले दिपक केसरकर यांनी ठाकरेंना खडे बोल सुनावले आहेत. मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक राजकीय वातावरण उफाळून आले आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराआधी दीपक केसरकर हे गुरुवारी सायंकाळी शिर्डी येथे साई दर्शनासाठी आले असता माध्यमातून सडकून टीका केली. दरम्यान, शिवसेनेच्या आदित्य ठाकरे ,गद्दार हे गद्दारच आहेत. ज्यांना वाटते त्यांनी अजूनही…

