Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली असून सर्वपक्षीयांचा विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे.ओबीसी समाजाला न्याय मिळणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचे आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देणार असल्याचं निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिली. ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर न्यायालयीन निर्णयाच्या प्रतीक्षेत आपण सर्वचजण आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षणा करिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्व प्रयत्न केले आहेत. यापुढेही करत राहू, ओबीसी आरक्षणाशिवाय येणाऱ्या निवडणूका…

Read More

लशिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ४० आमदारांनी बंड पुकारले नवीन सरकार स्थापन केले. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची बैठक घेतली. बैठकीला तब्बल १० खासदार गैरहजर होते. त्यामुळे शिवसेनेचे काही खासदार शिंदे गटात सामील होणार असल्याच्या चर्चांना उदान आले आहे. शिवसेनेत आमदारांनी बंडामुळे खासदार देखील शिंदे गटात सामील होणार आहे. शिंदे गटातील अनेक बंडखोर आमदारांनीही पक्षातील खासदार आमच्या संपर्कात असल्याचे माहिती होती. तसेच भाजपने राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिलेल्या द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केली होती. हा प्रकार लक्षात येताच उद्धव ठाकरेंनी खासदारांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला तब्बल…

Read More

जळगाव प्रतिनिधी । ‘अग्निपथ’ योजनेंतर्गत औरंगाबाद येथे १३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान सैनिक भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सैनिक भरती मेळाव्यात जिल्ह्यातील तरूणांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत केले आहे. दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, भारत सरकार यांचेकडील “अग्निपथ” योजनेअंतर्गत १३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मैदानात सैनिक भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. सदरील सैनिक भरतीमध्ये औरंगाबाद, बुलढाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड व परभणी या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना देखील भरती प्रक्रियेत सहभाग घेता येणार आहे. सैनिक भरतीसाठी १ जुलै पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरूवात करण्यात आली असून ३०…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा दिला. एकनाथ शिंदे गटा विरुध्द शिवसेना वाद टोकाला गेला आहे. तर ही लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. दुसरीकडे निवडणूक चिन्हाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले. अनिल परबाचे मोठे वक्तव्य, शिवसेनेचे निवडणूक चिन्ह कोणाकडेही जाणार नाही, याबाबतची लढाई आता निवडणूक आयोगाकडे होणार आहे. सुप्रीम कोर्टाने आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईबाबत दिलेल्या निर्देशानंतर अनिल परब यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. विधीमंडळ सचिवालयाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. नवीन अध्यक्षांची निवड करण्यात आले, त्यामुळे आमदार अपात्रतेचा निर्णय ते घेतील. आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली, सध्याचे विधानसभा अध्यक्ष…

Read More

एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल जळगाव प्रतिनिधी । शहरातील गणेशवाडी परिसरातून एकाची दुचाकी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सतीष प्रल्हाद नेमाडे (वय-५०) रा. पंचमुखी अपार्टमेंट, गणेशवाडी जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. नास्तागाडी लावून आपला उदरनिर्वाह करतात. ६ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता त्यांनी त्यांची मालिकीची दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीएस ५०५५) ही अपार्टमेंटमध्ये पार्किंग करून लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्याचे गुरूवार ७ जुलै रोजी उघडकीला आले. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोधाशोध केली परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. अखेर रविवार १० जुलै रोजी…

Read More

अमळनेर प्रतिनिधी । शहरातील गांधलीपूरा भागातून अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमळनेर पोलीसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, शहरातील गांधीलपूरा येथे सतरा वर्षीय अल्पवयील मुलगी ही आई व भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला आहे. शनिवार ९ जानेवारी रोजी सकाळी मुलीचा भाऊ व आई हे कामाला निघून गेले. तेव्हा मुलगी घरी एकटीच होती. दुपारी मुलीचा भाऊ हा दुपारी ३ वाजता कामावरून घरी आला तेव्हा त्याला त्याची बाहिण दिसली नाही. त्याने मामा व आजी यांच्या घरी जावून तपास केला असता मुलगी आली नसल्याचे सांगितले. त्यानंतर सर्वत्र तिचा शोध घेतला परंतू अल्पवयीन मुलगी…

Read More

पहूर पोलीस ठाण्यात चार जणांविरूध्द गुन्हा दाखल जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेला शिवीगाळ, मारहण करून जीवेठार मारण्याची धमकी देत तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामनेर तालुक्यातील एका गावात ३३ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ९ जुलै रोजी दुपारी ३ वाजता महिला शौचालयात जात असतांना गावातील सचिन सुदाम लोखंडे हा महिलेच्या मागे दुचाकीने येवून मोठ मोठ्याने हार्न वाजवित होता. त्यानंतर महिलेजवळ येवून तिचा हात पकडून विनयभंग केला. दरम्यान हा प्रकार महिलेने सचिन लोखंडेच्या घरी सांगितले असता सचिनचे भाऊ जितेंद्र सुदाम लोखंडे, संजय सुदाम लोखंडे आणि…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: एकनाथ शिंदेसह चाळीस आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेमध्ये मोठी फुट पडली आहे. शाखाप्रमुखांपासून ते आमदरांनी आता शिंदे गटाचा मार्ग निवडला आहे. एकापाठोपाठ आमदार, नगरसेवक शिवसेना सोडून शिंदे गटात सामील होत आहे. हे ड्रॅमेज कंट्रोल करण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे उभे ठाकले आहे. त्यात भर म्हणजे आमदारांपाठोपाठ खासदारांनीही बंड पुकारण्याचे संकेत दिले आहे. हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरे एक पाऊल मागे येण्याची चिन्हे दिसत आहे. उद्धव ठाकरे हे ११ जुलै मातोश्रीवर सर्व खासदारांची महत्वाची बैठक आयोजित केली आहे. शिवसेनेतील डॅमेज रोखण्यासाठी उद्धव ठाकरे राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रोजी देशात राष्ट्रपती पदाची निवडणूक 18…

Read More

सावदा स्टेशन प्रबंधकाला अटक; भुसावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल भुसावळ प्रतिनिधी । लग्नाचे आमीष दाखल तरूणीवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत सावदा स्टेशन प्रबंधकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. भुसावळ पोलीसांच्या सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील एका भागात २८ वर्षीय तरूणी आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. ती खासगी नोकरीला आहे. ४ डिसेंबर २०१७ रोजी तिच्या नातेवाईकांच्या लग्नात आली असता तिची ओळख सावदा रेल्वे स्टेशनच्या स्टेशन प्रबंधकपदी नोकरीला असलेला अंकुश किरण मोरे (वय 34 रा. भुसावळ) याच्याशी झाली. त्यावेळी अंकुशने तारुणीकडून मोबाईल नंबर घेऊन संपर्क साधला. मध्यंतरी ३१ मार्च २०१८ रोजी तरुणीला…

Read More

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील हतनुर धरणातील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाल्याने ४ दरवाजे पुर्णपणे उघडण्यात आले आहे तर २० दरवाजे १ मीटरने उघडले आहे. हतनुर धरणाचे वरच्‍या भागात मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. शिवाय मध्यप्रदेश, विदर्भात होत असलेल्या संततधार पावसामुळे हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली आहे. गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. पाऊस सुरूच असल्‍याने धरणातील पाणी पातळी 209.68 मीटर इतकी झाली आहे यातून ३८ हजार १०५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात केला जात आहे. जळगाव जिल्ह्यात देखील मागील दोन तीन दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा…

Read More