Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील अहिरे बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सिताबाई सोनवणे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील अहिरे बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी नुकतेच ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी ग्रामसेवकाच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदी सीताबाई सोनवणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या सिताबाई सोनवणे याचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आली. याप्रसंगी सरपंच कृष्णा संदाशिव, नाना बळीराम पाटील यांच्यासह ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.

Read More

मुक्ताईनगर प्रतिनिधी । मुसळधार पाऊस सुरू असल्याने तापी, पुर्णा नदीला पुर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नदी काठच्या नागरीकांनी सतर्क राहण्याचे आवाहन मुक्ताईनगर पोलीसांनी केले आहे. मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष , पोलिस मित्र तसेच पत्रकार बंधू व प्रतिष्ठित नागरिक यांना कळविण्यात येते की, सध्या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मुसळधार पाऊस सुरू असून आपल्या मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीत देखील पावसाचा जोर कायम आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास तापी-पूर्णा नदीला पुर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. लहान, मोठे नाल्यांना मोठा पूर येण्याची शक्यता असून कृपया कोणीही मच्छीमारी करता अगर इतर कारणास्तव नदीपात्रा…

Read More

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथील रस्त्यांची दयनिय अवस्था झाली असून तातडीने रस्त्यावरील डागडुजी करून उपाययोजना करावी अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नशिराबाद नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना मंगळवारी १९ जुलै रोजी सकाळी देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून नशिराबाद शहरात पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शहरातील विकसित झालेल्या वाढीव वस्त्या, उपनगरातील रहिवाशांना यामुळे फारच त्रास सहन करावा लागत आहे. विविध समस्यांपैकी प्रामुख्याने भेडसावते, ती रस्त्यांची समस्या या उपनगरातील तसेच वाढीव वस्त्यांतील रस्ते कच्चे असल्याने, त्या ठिकाणी साधे खडीकरणही नसल्याने पावसाच्या पाण्यामुळे चिखल होत असून नागरिकांना ये-जा करणे त्रासदायक होत आहे. या रस्त्यांनी…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: यावल शिवारातील स्वामी जनार्दन मंदीराची दानपेटी फोडून ४ हजार ५०० रूपयांची चिल्लर अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सोमवारी १८ जुलै रोजी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, यावल शिवारात श्री राष्ट्रसंत जनार्दन स्वामी ध्यान मंदीर आहे. या ठिकाणी अनेक भाविक मोठ्या संख्येने येत असतात. चेतन देवीदास निगडे (वय-३७) हा तरूण रोजी सकाळी आणि संध्याकाळी मंदीरातील साफसफाई करून पुजापाठ करतो. सोमवार १८ जुलै रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० वाजेच्या कालावधीत अज्ञात व्यक्तीने मंदीराची दानपेटीचे कुलूप तोडून ४ हजार ५०० रूपयांची चिल्लर चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे.…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: गेल्या अनेक दिवसांपासून रामदास कदम नाराज असल्याची चर्चा होती. शिवसेना नेते रामदास कदम यांनी अखेर आपल्या नेतेपदाचा राजीनामा देत रामराम ठोकला. भावूक होत रामदास कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केला. शिवसेनेत तेढा निर्माण झाल्याने आता सर्वांचे लक्ष धनुष्य बाणाचा चिन्हावर लागले आहे. 52 वर्षे मी कामं केलं पण माझ्यावर नेतेपदाचा राजीनामा देण्याची वेळ येईल असं कधी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं.पक्षाच्या कारवाईनंतर मी खूप अस्वस्थ असून, राजीनामा दिल्याने मी समाधानी नाही. “आज शिवसेना प्रमुख असते तर तुम्हाला राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊन मुख्यमत्री होऊ दिलं असतं का? हे तुमच्या मनाला विचारून पाहा. बाळासाहेबांनी आपल्यासाठी कोणतंही पद घेतलं नाही. भाजपनं…

Read More

शिंदे गटातील 3 नगरसेवक भाजपमध्ये दाखल लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शिवसेनेशी बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. शिंदे गटामध्ये आमदार आणि खासदारांचा प्रवेश सुरू असताना, अशातच भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांना धक्का दिला आहे. पण नवी मुंबईमध्ये भाजपनेच शिंदे गटाला धक्का दिला आहे. राज्यातील सामान्य नागरिक या सर्व घटनांना वैतागून गेली आहे. शिंदे गटातील 3 नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून सेनेला हादरा दिला होता परंतु तीच वेळ शिंदेंच्या वाटेला आली. नवीन गवते, अपर्णा गवते आणि दीपा गवते हे पुन्हा एकदा भाजपमध्ये दाखल झाले आहे. आमदार गणेश नाईक…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शिवसेनेच्या ४० आमदारांचे बंड घडवून आणल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. शिवसेनेचे राज्यातील १८ पैकी १२ खासदार वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडून जोरदार हालचाली सुरु असताना उद्धव ठाकरे गटही आक्रमक झाला आहे. ठाकरे गट शिवसेना आमचीच असल्याचा दावा करणार आहेत. उद्धव ठाकरे आणि शिंदे गाटाकडून शिवसेना आमचीच असल्याचा दावा करण्यात येत आहे. यामुळे शिवसेना कुणाची? असा प्रश्न उपस्थित केला जात असताना शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटातील वाद महाराष्ट्रातून दिल्लीत पोहचला आहे. जे विधानसभेत झाले तेच आता संसदेत होणार आहे. शिवसेना आमचीचच असल्याचे पत्र ठाकरे गटातील खासदार लोकसभा…

Read More

अन्…. चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सुखरूप लाईव्ह महाराष्ट्र न्यूज- रावेर तालुक्यातील सुकी नदीपात्रात आज सायंकाळी अडकलेल्या नऊ पर्यटकांना चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनास यश आले आहेत. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सुखी (गारबर्डी) धरणाचा वेस्ट वेअर ओसंडून वाहत असून या जलप्रवाहाच्या विळख्यात ९ पर्यटक अडकल्याची माहिती सायंकाळी 6.30 वाजता स्थानिकांनी प्रशासनाला दिली. हे नऊ पर्यटक नदीच्या मधोमध उभे असून पाण्याचा वेढा त्यांच्या दोन्ही बाजूने पडला आहे. तसेच पाण्याचा प्रवाह वाढतच असल्याने हे सर्व जण वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात होती. याबाबतची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. बेहरे, सावदा येथील उपविभागीय अभियंता यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला देऊन…

Read More

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील सुखी गारबर्डी धरणामध्ये दहा पर्यटक पाण्यामध्ये अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे पर्यटक पर्यटनासाठी या ठिकाणी गेले होते. जिल्हा प्रशासनाच्या वतीने वचावाचे कार्याला सुरूवात करण्यात आली आहे. रावेर तालुक्यातील सुखी घरबर्डी धरणामध्ये दहा पर्यटक अडकल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्याचे बचाव कार्य हाती घेण्यात आले आहे. यासंदर्भात तहसीलदार उशाराणी देवगुणे यांच्यासह पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. पर्यटकांना या ठिकाणी मदत कार्याचे काम केले जात असल्याचे सांगितले. विभागीय अधिकारी व तहसीलदार साहित्य व मनुष्यबळासह याठिकाणी रवाना झाले आहेत.त्याच प्रमाणे सीआरपीएफ जवानांना देखील पाचारण करण्यात आल्याचे विश्वसनिय सुत्रांकडून माहिती मिळाली आहे.

Read More

शिवसेनेची नवीन कार्यकारिणी जाहीर, महत्वाचे नेते पदावर ! लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे.एकनाथ शिंदे गटाने नवीन कार्यकारणी जाहीर केली आहे. यामुळे आता शिवसेना मोठा धक्का बसला आहे. बंडखोर आमदारांनमुळे शिवसेनेत फुट पडलीं आहे. शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. तर, दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे गटाने शिवसेना पक्षप्रमुखपदाला मात्र हात लावलेला नाही. शिंदे गटाने शिवसेनेची नवीन कार्यकारणी जाहीर करताना नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड केली आहे. काही तासांपूर्वीच नेत्यांची शिवसेनेतून पक्षविरोधी कारवाई…

Read More