लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील तहसीलदार राहुल तायडे यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. अपघातात तहसीलदार यांच्यासह 2 जण गंभीर जखमी झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमींवर रुग्ण्यालयात उपचार सुरु आहेत. बुलढाणा येथील नांदुरा येथील तहसीलदार राहुल तायडेचा अपघात. सकाळी 11 वाजेच्या सुमारास मोताळा येथील वरुड फाट्यावरील अपघात घडला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या प्रशिक्षण व एका मिटिंगसाठी बुलडाणा येथे येत असताना अपघात झाला. रस्त्याच्या कडेला खोल नाल्यामध्ये तायडे यांची गाडी कोसळली या कारमध्ये तहसीलदार राहुल तायडे, वाहन चालक व नांदुरा तहसील कार्यालयातील ऑपरेटर पटेल हे होते. जखमींवर बुलडाणा येथे डॉ. भवटे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. तहसीलदार राहुल…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
आमदार राजूमामा भोळे यांची पाहणी करतांना माहिती जळगाव-प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज नगर रेल्वे उड्डाणपूलाचे काम पुर्ण होणार असून शिवाजीनगर परिसरातील रहिवाशांसाठी लवकरच हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. अशी माहिती आ. राजूमामा भोळे यांनी दिली. गेला अनेक दिवसांपासून शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. एक ना अनेक अडचणींमुळे गेल्या काळात या कामाला विलंब झाला. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेल किंवा शिवाजीनगर परिसरातील नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी परिसरातील नागरिकांकडून प्रशासनाच्या विरोधात आंदोलन ही करण्यात आली. त्यामुळे प्रशासनाकडून या पुलाच्या कामाला गती देण्यात आली होती. जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांच्यासह महापालिकेचे…
काय नाना..! तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलीतं…! नाना पटोले यांचा हॉटेलमध्ये महिलेसोबत गळ्यात हात टाकून खुर्चीवर बसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालं आहे लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले एका व्हिडीओमुळे अडचणीत आले आहे. नाना पटोले यांचा ऋ. चेरापुंजी येथील एक खासगी सहलीतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. शशी शाखा ओव्या विश्वास न तो भाजपच्या नेत्या चित्रा वाघ. यांनी ट्विट केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात पत्रकार परिषदेत चित्रा वाघ म्हणाल्या की, नाना पटोले यांचा एक ‘व्हिडीओ रोमान्स इन चेरापुंजी, मेघालया’ हा आज सकाळपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राजकीय व सामाजिक जीवनात वावरत…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील शाहू नगर भागातील जळकी मीलच्या मोकळ्या जागेत चौघे जण दारू पित असतांना बाचाबाची झाली. यात दारूच्या नशेत असतांना तिघांनी रमा उर्फ रहीम शहा मोहम्मद शहा याचा चाकूने सपासप वार करून खून केला. पोलीसांनी काही तासातच तिघांना ताब्यात घेतले आहे. रहीम शहा उर्फ रमा मोहम्मद शहा (वय-२५) रा. गेंदालील मील, जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे. रहीम शहा उर्फ रमा मोहम्मद शहा हा मालधक्क्यावर हमालीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. बुधवारी २० जुलै रोजी कामावर सुटी असल्याने सहकारी पवन किसन लाडे, मनोज जलाल गायकवाड आणि विलास तुकाराम निकम तिघे रा. गेंदालाल मील, जळगाव यांच्यासोबत दुपारी ३…
जळगाव प्रतिनिधी : जळगाव शहरातील गेंदलाल मिल परिसरात असलेल्या मोकळ्या जागेवर एका 25 वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याचा धक्कादायक प्रकार दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आला आहे. या घटनेत पोलिसांनी तीन संशयित आरोपींना अटक केली आहे.रहीम शहा उर्फ रमा मोहम्मद शहा (वय-25) रा. गेंदालाल मिल भोंग्याजवळ जळगाव असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहीम शहा उर्फ रमा हा काही त्याच्या तीन मित्रांसोबत शाहूनगर येथील गेंदालाल मेलच्या भोंग्याजवळ एका रेल्वे पाठीच्या बाजूला झाडाखाली बसलेले होते. अज्ञात कारणाहून या ३ जणांनी त्यांच्या पोटाला चाकूने भोसकून खून केल्याचा धक्कादायक प्रकार ३ वाजेचा सुमारास उघडकीला आला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर…
धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील निंभोरा येथे ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद मराठी शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती डी.ओ.पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरपंच महिला अरूणाबाई पाटील, माजी सरपंच चेतन पाटील, ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य रोहिदास नाना, उपसरपंच मनोहर कोळी, ग्रामपंचाय सदस्य भिकुबाई कोळी यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य, ज्येष्ठ नागरीक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सार्वजनिक जागा, जिल्हा परिषदेची मराठी शाळेत वृक्षारोपण करण्यात आले.
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात पक्षावर नियंत्रण मिळवण्याची धरपकड सुरू आहे. शिंदे गटाचा दावा आहे की खरी शिवसेना त्यांची आहे, शिवसेना पक्षाचे खासदार आणि आमदार त्यांच्या सोबत आहेत. त्यामुळे शिवसेना आणि त्याच्या चिन्हावर त्यांचा दावा आहे. या विरोधात शिवसेनेकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र देण्यात आले आहे आणि या संदर्भात निकाल देण्याची मागणी केली आहे. ४ जुलै रोजी झालेल्या बहुमत चाचणीत शिंदे गटाच्या बाजूने ४० आमदारांनी मदतान केले. ७ जुलै रोजी ठाणे मनपातील ६७ पैकी ६६ नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले. मुंबईनंतर ठाणे मनपा सर्वात मोठी आहे. इतक सर्व झाल्यानंतर १८ जुलै…
सर्व गावांना मिळणार फिल्टरचे पाणी; आ. सावकारे व मा. जि.प. सदस्य विश्वनाथ पाटलांचा यशस्वी पाठपुरावा भुसावळ प्रतिनिधी- राज्याचे तत्कालीन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील यांनी तालुक्यातील कुर्हे पानाचे तसेच महादेवमाळ; वराडसीम, जोगलखोरी; गोजोरे आणि मोंढाळे या सहा गावांसाठी जलजीवन मिशन योजनेच्या अंतर्गत तब्बल २३ कोटी रूपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर केली असून याला तांत्रीक आणि प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ पाटील यांनी याच गावांना २००८ साली पाणी पुरवठा योजना मंजूर करून तेव्हापर्यंत भेडसावणारा पाण्याचा प्रश्न कायम निकाली काढला होता. आता १५ वर्षांनी हीच योजना अधिक अद्ययावत स्वरूपात आणि…
धरणगाव प्रतिनिधी । शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या शौचालयाचे बांधकाम सुरू असल्याने नागरीकांची गैरसोय निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे शहरातील रस्ते खराब झाले असून दुरूस्ती करण्यात यावी या मागणीसाठी धरणगावातील सार्वजनिक बांधकाम विभागासमोर भाजपाचे ठिय्या आंदोलन करण्यात आले. धरणगाव शहरातील रामदेवजी बाबा नगर,गणेश ऑटो सर्व्हिस व टिळक तलाव येथील शौचालय दुरुस्तीसाठी अनेक दिवसांपासून बंद आहेत तसेच मोठा माळी वाडा ,धरणीनाला,पाताळ नगरी जवळील शौचालयाचे बांधकाम सुरू असल्यामुळे त्याही ठिकाणी शौचास जागा नाही त्यामुळे नागरीकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊन त्रास सहन करावा लागत आहे.आता तर पावसाळ्याचे दिवस असल्याने खूपच त्रास महिला व पुरुषांना होत असून उघड्यावर शौचास बसल्यामुळे रोगराई वाढून नागरीकांचे…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: गेल्या वर्षांपासुन धरणगाव सार्वजनिक बांधकाम विभागाने उड्डाण पुलापासून ते धरणी नाला पुलापर्यंत, शहरातील प्रमुख रस्त्याचे उद्घाटन होऊन काँक्रिटीकरणाचे व डिव्हाईडरची कामे सुरू करण्यात आली होती. मात्र सुरू असलेली कामे अर्धात थांबवून कामे बंद करण्यात आली व जे रस्ते तयार केलेत, त्या रस्त्यावरही मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे आजतागायत रस्त्यांचे कामे करण्यास धरणगाव बांधकाम उपविभाग असमर्थ ठरल्यामुळे माहिती अधिकार जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ व संघटनांच्या वतीने दि.२३ जुलै, २०२२ शनिवार पासून उपोषणास बसणार आहेत. २३जुलै रोजी शहरातील गूड शेफर्ड इंग्लिश स्कूल, उड्डाण पूल, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, बस स्थानक, व्हाईट हाऊस, मटन मार्केट, पारोळा नाका, पाटील वखार, भूमी गार्डन…

