Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

तापी नदी पत्रात न जाण्याचा जिल्हा प्रशासनाचे आवाहन भुसावळ प्रतिनिधी । तापी नदीच्या उगमस्थानासह पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला असून, पाणी वेगाने वाहू लागल्याने बुधवारी सायंकाळी हतनूर धरणाचे सर्व ४१ पैकी २८ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. यामुळे दर सेकंदाला धरणातून ३० हजार ४४५ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यासाठी सिंचन व बिगर सिंचनासाठी महत्त्वाचे असलेल्या हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात बुधवारी १३ जुलै रेाजी दिवसभर दमदार पाऊस झाल्याने सायंकाळी हतनूर धरणाचे ४१ पैकी २८ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले. जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. यात हतनूर धरण क्षेत्रात बुधवारी सकाळपासून दमदार पाऊस झाला. यामुळे धरण…

Read More

नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी; हजारो हेक्टर शेती पाण्याखाली लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: राज्यात पावसाच्या जोरधारा कायम असून अनेक नदी-नाल्यांना पूर आल्याने संपूर्णतः रस्ते पाण्याखाली गेले. येथील नागरिकांसमोर दळण वळणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.अनेक धरणांचे दरवाजे उघडल्याने परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. राज्यात गेल्या दहा दिवसांत पावसाच्या कहरात एकूण ८४ जणांचा मृत्यू झाला आहे. विदर्भात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.शाळकरी विद्यार्थी तसेच नोकरदार वर्गाना सदरच्या पुराच्या पाण्यामुळे आपआपल्या घरी जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. नाशिकध्ये सप्तश्रृंगी गडावर ढगफुटी झाली. यावेळी धावपळीत अनेकदा नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. नाशिकमध्ये पुढील…

Read More

वावडदा, वाकडी परिसरातील चोरीच्या गुन्ह्याचा शोध लावण्याचा नागरीकांची मागणी प्रविण पाटील प्रतिनिधी । वावडदा-म्हसावद रोडवरील प्लॉस्ट कंपनीतून १२ हजार रुपये किंमतीचे भंगार चोरुन नेणाऱ्या तिघांना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. तिघांना गुरूवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, वावडदा, वाकडी या परिसरातील गुन्ह्याचा शोध देखील लावावा अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वावडदा-म्हसावद रोडवरील श्री गुरुप्रभा पावर प्लॉट कंपनी आहे. या कंपनी आवारात भंगार सामान तोडताड करुन ठेवलेला होता. सोमवारी ११ जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सदरचा १२ हजार रुपये किंमतीचा सामान चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. प्रकार समोर आल्यानंतर कंपनीचे सुपरवायझर विजय…

Read More

सोलापूर वृत्तसंस्था । सोलापूर भाजपा जिल्हाध्यक्षांचे एका महिलेसोबत आक्षेपाहार्य व्हिडीओ व्हायरल झाल्याचे राज्यात खळबळ उडाली आहे. व्हिडीओत महिलेने देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. महिला व्हिडीओमध्ये रडत रडत सांगत आहे की, देशमुख यांनी आपल्याशी संबंध ठेवून आता आपल्याला धोका दिला. या व्हिडीओत देशमुखही दिसत असून त्यांच्याकडे बोट करून ही महिला हे सांगत आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भाजप नेतृत्वाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन देशमुख यांच्याकडे विचारणा केल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, देशमुख यांनीही आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हा राजीनामा स्वीकारला आहे. एका घरात किंवा हॉटेलातील हा व्हिडीओ असून एका खोलीत दोघेच आहेत. तिने…

Read More

यावल प्रतिनिधी । भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने प्रवाशी ॲपे रिक्षाला जोरदार धडक दिल्याची घटना आहे. या अपघातात किनगाव येथील सतरा वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सकाळी घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तेजस प्रकाश तायडे (वय-१७) रा. किनगाव ता. यावल हा अल्पवयीन मुलगा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होता. गेल्या काही दिवसांपासून तो पंढरपूर येथ गेले होता. पंढरपूरहून परल्यानंतर तो मंगळवारी १२ जुलै रोजी सकाळी जळगाव येथून घरी किनगाव येथे येण्यासाठी ॲपेरिक्षाने बसला. धामणगाव फाट्याजवळ पेट्रोलपंपासमोरून प्रवाशी रिक्षा जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात डंपरने प्रवाशी ॲपेरिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात तेजस तायडे हा जागीच ठार आला. तर…

Read More

मुंबई वृत्तसेवा । भाजपा हा आपला नैसर्गिक मित्र पक्ष आहे. शिवसेना आणि भाजप एकत्र आले तर केंद्र आणि राज्य सरकार एकत्र असेल तर विकास कामांना गती मिळेल. अशी माहिती शिवसेनेचे खा. हेमंत गोडसे यांनी दिली. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना खासदारांच्या विनंती वरून शेवटी एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर खा. गोडसे यांची प्रतिक्रीया घेतली त्यावेळी ते बोलत होते. संजय राऊतांनी शिंदेंना टॅग केल्यामुळे खळबळ माजली. राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपाला मदतीचा हात करावी, अशी आम्ही मागणी होती. पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती होणार असतील तर आपण पाठिंबा द्यायला पाहिजे, असं आम्ही सांगितलं. यावर विचार करू…

Read More

जळगावातील खोटे नगरजवळील घटना; रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जळगाव प्रतिनिधी । जुनी दुचाकी घेण्यासाठी जळगावात आलेल्या तरूणाच्या खिशातून ५५ हजार रूपयांची रोकड रिक्षातून चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रूपेश रमेश भाटीया (वय-३२) रा. भाटीया गल्ली धरणगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. आगरबत्ती विक्री व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतो. व्यवसाय करण्यासाठी त्याला जुनी दुचाकी घेण्यासाठी २८ मे रोजी जळगावात आला होता. त्यावेळी रूपेशने ५५ हजार रूपये सोबत आणलेले होते. जळगावात आल्यानंतर त्याचा मित्र मनोज वाणी याला भेटून गणेश कॉलनीतील ख्वॉजामियॉ येथे त्याला जुन्या दुचाकी…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : मध्यप्रदेशमध्ये एक दहा वर्षांचा मुलावर मगरने झडप घालून हल्ला केला. मुलाला ओढून नदीन खोल नेलं आणि त्याचा फडशा पाडला. दहा वर्षांच्या मुलाला या मगरीने जिवंत गिळलं. या धक्कादायक घटनेने मध्य प्रदेशमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मध्य प्रदेशच्या शोपूपमध्ये चिंबल नदीत दहा वर्षांचा मुलाला अंघोळ करताना चिमुकल्याला महाकाय मगरीने गिळले. अंगावर काटा आणणारा हा प्रकार समोर आला. नंदीत अंघोळ करताना मगरीने झडप टाकून हल्ला केला. नदीच्या खोलवर घेऊन गेली या मुलाला मगरीने जिवंत गिळलं. सोमवारी सकाळी घडलेल्या या घटनेनंतर गावातील लोकांनी नदीत मगरीचा शोध घेतला. तिला नदीतून बाहेर काढलं आणि आक्रोश सुरु झाला. गावातील लोकांनी मगरीला शोधलं…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतरही केंद्र सरकार आणि ठाकरे यांच्यात संघर्ष सुरूच आहे. नव्याने शिवसेनेला उभारी देण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी पुन्हा पक्षबांधणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.अनेक ठिकाणी शिवसेनेनं कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. आदित्य ठाकरे यांनी आता दहिसर येथील फेरीत आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी त्यांनी बंडखोर आमदाराना लाज असेल, हिंमत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवून दाखवावी, असं वक्तव्य केलं होतं. शिदें यांनी 40 आमदारांना सोबत घेत बंड केल्याने महाविकास आघाडी सरकारकडून विकास कामासाठी अपुरा निधी आणि हिदुत्वांच्या विचारांचं आरोप आमदारांनी केला. एकनाथ शिंदेंनी मागण्या ठाकरेंसमोर ठेवल्या त्या शिवसेनेनं मान्य न केल्यामुळे त्यांनी भाजपसोबत जाण्याचा…

Read More

मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. तर, अनेक भागांतील पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्कही तुटला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील या दमदार पावसामुळे जिल्हातील धरणे ओसंडून वाहू लागली आहेत. गंगापूर धरणातून सोडलेल्या विसर्ग गोदावरील पूर आला आहे. नाशिक रेड अलर्ट जारी केल्याने पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे तीन चार दिवस नाशिकमध्ये शाळा आज बंद राहणार आहेत. नाशिक जिल्ह्यात अजून तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून पूरस्थिती उद्बवू शकते, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, नदीकाठावर जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. महालपाटणे (ता. देवळा) गावाला पुराचा धोका वाढला असून पेठ…

Read More