लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: विमानासारख्या वाहनाचा अत्यंत किरकोळ बिघाड देखील प्रवाशांसाठी धोकादायक ठरू शकतो, कारण विमान हे आकाशात अधांतरी उडणारे वाहन आहे. गेल्या महिन्यात तब्बल ९ वेळा स्पाईसजेट कंपनीचे विमानात बिघाड झाल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. महिनाभरापूर्वी दिल्ली विमानतळावर जम्मूला जाणाऱ्या प्रवाशांनी भरलेले स्पाईसजेटचे विमान उड्डाणाच्या आधी विजेच्या खांबाला धडकले. त्यानंतर आता दुबईहून मदुराईला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या बोईंग B737 MAX विमानाचे चाक निकामी झाल्याने उशीर झाला. स्पाईसजेटच्या विमानात वारंवार तांत्रिक बिघाडांच्या घटनांनंतर 19 जूनपासून त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. याआधी 2 जुलै रोजी जबलपूरला जाणारे स्पाइसजेटचे विमान सुमारे 5,000 फूट उंचीवर क्रू मेंबर्सच्या केबिनमध्ये धूर पाहून दिल्लीला परतले होते. त्यामुळे…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावर डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या समोरील उड्डाणपुलावर रूग्णवाहिका आणि रिक्षाची समोरासमोर जोरदार टक्कर होवून अपघात झाल्याची घटना गुरूवार १४ जुलै रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात तीन जण जखमी झाले आहे. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते. सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्गावर डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या समोरील उड्डापुलावर गुरूवार १४ जुलै रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास (एमएच १४ सीएल ०७५५) या क्रमांकाची शासकीय रूग्णवाहिका आणि एमएच १९ सीडब्ल्यू ०६३८ क्रमांकाच्या ऍपे रिक्षाची समोरा समोर धडक झाली. या अपघातात रूग्ण वाहिकाचालक निलेश धनगर रा. वरणगाव ता. भुसावळ यांच्यासह…
राज्यभरातही शिंदे गटाच्या भूमिकेची उत्सुकता लाईव्ह महाराष्ट्र न्यूज :- धरणगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत स्वतंत्र चूल मांडण्याची भूमिका तालुक्यातील माजी पालकमंत्री व आमदार गुलाबराव पाटील समर्थकांनी घेतली आहे . यासाठी पुढाकार घेऊन हे समर्थक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून आले आहेत . या शिंदे गटाचे नेतृत्व आमदार गुलाबराव पाटील यांच्याकडेच राहणार असल्याने जिल्ह्यातील राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत . तथापि शिवसेनेपासून वेगळे होऊन आपल्याच तालुक्यात स्वतंत्र लढणे ही गुलाबराव पाटील यांचीच कसोटी ठरणार आहे . राज्यातील सत्तांतराचा पार्शवभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री शिंदे समर्थक काय भूमिका घेतील याची उत्सुकता सर्वांना आहेच . त्यात राज्यात पहिल्यांदा धरणगाव नगरपरिषदेसाठी अशी…
मुंबई वृत्तसंस्था । राज्यातील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचयतींच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाला राज्य निवडणूक आयोगाकडून स्थगिती देण्यात आली आहे. राज्यातील ९२ नगरपालिका आणि चार नगरपंचातींच्या निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात आला होता. यासाठी निवडणूक आयोगाने १८ ऑगस्टची तारीख देखील जाहीर केली होती. दरम्यान, याबाबत सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल करण्यात आली होती. १२ जुलै रोजी सुनावणी झाल्यानंतर शासनाने समर्पित आयोगाने नागरीकांच्या मागासप्रवर्गाबाबत दिलेला अहवाल सर्वाच्च न्यायालयात सादर करण्यात आला. याचे कामकाज आता १९ जुलै रोजी होणार असल्याने या निवडणुका आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत तर ज्या क्षेत्रात आचारसंहिता जाहीर होती होती ती आपसुकच संपुष्टात आली आहे. याबाबतचे आदेश गुरुवार,…
गिरणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे गिरणा धरणाचे दरवाजे देखील उघडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा गिरणा पाटबंधारे विभागाच्या वतीने गुरूवारी १४ जुलै रोजी दुपारी १ वाजता देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या इशार्यात म्हटले आहे की, गिरणा धरणात दुपार पर्यंत ८० टक्के जिवंत साठा होणार आहे. तसेच वरून येणारा पुर पाण्याची आवक पाहता व धरण सुरक्षिततेचा आढावा घेऊन गुरूवार १४ जुलै रोजी दुपार गिरणा धरणातून जास्तीचे पुराचे पाणी खाली नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. यामुळे नदी काठावरील नागरिकांनी सावध रहावे, कोणतीही जीवित व वित्त हानी होणार नाही याची काळजी घ्यावी असा इशारा येत दिलेला आहे. दरम्यान, पुराचा…
मुंबई वृत्तसंस्था । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळात महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. नगराध्यक्ष, सरपंच थेट लोकांमधूनच निवडला जाणार असल्याची घोषणा आज करण्यात आली आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाची आजच्या बैठकीत नऊ मोठे निर्णय घेण्यात आले. पेट्रोल डिझेल दर कपात, नगराध्यक्ष, सरपंच थेट निवड यासह नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचं अनुदान, आणीबाणीच्या काळात ज्या लोकांना तुरुंगात राहावं लागलं होतं. अनेक राज्यात पेन्शन दिली जाणार यासह इतर महत्वाचे नऊ निर्णय घेण्यात आले आहे. हे आहे महत्वाचे 9 निर्णय१. पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचा निर्णय (वित्त विभाग),२. राज्यात “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान”…
जळगाव प्रतिनिधी । गर्दीचा फायदा घेत पाकीट चोरी करणार्या संशयिताला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचार्याला महिलेसह एकाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना जळगावातील बसस्थानकात घडली. याप्रकरणी दोन जणांवर जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील डॉ. राहुल सांडू अग्रवाल (वय-२८) हे मंगळवारी १२ जुलै रोजी दुपारच्या सुमारास बसस्थानकातून त्यांच्या पाकीट चोरल्याची घटना घडली. त्यांनी जिल्हापेठ पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार गस्तीवर असलेले पोलीस नाईक जुबेर सिराज तडवी व अमित मराठे यांनी तात्काळ बसस्थानक गाठले. यावेळी एक अनोळखी इसम व महिला गर्दीचा फायदा घेवून प्रवाशांचे पाकीट लांबवित असल्याचे डॉ. अग्रवाल यांनी त्यांना सांगितले. त्यानुसार…
सोलापूर-प्रतिनिधी । भाजपचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा एका महिलेसोबतचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर देशमुख यांनी राजीनामा दिली. संबंधित महिलेने गुंगीचं औषध दिल्याचा आरोप देशमुख यांनी पत्रकारांशी बोलतांना केला आहे. एका महिलेने हॉटेलच्या रुममध्ये फोनवर एक व्हिडीओ शूट केलाय. त्यात तिने देशमुख यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला. संबंधित महिलेनं ग्रीन टीमध्ये गुंगीचं औषध टाकून माझ्यासोबत आक्षेपार्ह व्हिडीओ बनवला. त्यानंतर चारित्र्य हननाचा प्रयत्न केला. या प्रकारात राजकीय विरोधकांचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे. तसंच संबंधित महिलेविरोधात ओशिवरा अंधेरी पोलीस ठाण्यात हनी ट्रपिंग आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे असं देखील देशमुख यांनी सांगितले आहे. यानंतर महिलेचा १७ मिनीटाचा कॉल रेकॉर्डींग व्हायरल…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव नाशिक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असतांना रजेवर कारागृहाबाहेर पडून फरार झालेल्या बंदी आरोपीला एलसीबीच्या पथकाने बुधवारी अमळनेर शहरातून अटक केली आहे. वसंत ऊर्फ जयकुमार ढोमन अहिरे रा. भोईवाडा, अमळनेर अस अटकेतील या आरोपींच नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर पोलीस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्हयात वसंत अहिरे यास अमळनेर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा भोगत असतांना ५ जून रोजी आरोपी अहिरे यास कोरेाना अभिवचन रजेवर सोडण्यात आले होते. मात्र त्यानंतरही मुदतीत आरोपी वसंत कारागृहात पुन्हा दाखल झाले नाही. त्यामुळे याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बंदी आरोपी वसंत हा अमळनेरात…
जळगाव प्रतिनिधी । व्हॉट्सॲप चॉटींग करून तरूणाकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून गळफास घेतलेल्या तारखेडा येथील तरूणीचा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्रास देणारा तरूण व त्याची आई यांना अटक करावी अशी मागणीचे निवेदन मयत तरूणीच्या नातेवाईकांनी पोलीस अधिक्षक यांना दिले आहे. दिव्या दिलीप जाधव (वय-२१) रा. तारखेडा ता. पाचोरा जि.जळगाव असे मयत तरूणीचे नाव आहे. अधिक माहिती अशी की, दिव्या जाधव ही आई वडीलांसह वास्तव्याला होती. आईवडील हाती मजूरी करून आपला उदरनिर्वाह करतात. गावातील निलेश मंगलसिंग गायकवाड याच्यासोबत दिव्याची ओळख निर्माण झाली होती. निलेशने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार दिव्याची दिशाभूल करत होता. गेल्या दोन वर्षांपासून लग्न करणार…

