मुंबईत बोलाताना पेडणेकर यांनी भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे. आज मुंबईत बोलाताना त्यांनी भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे. आमच्या महाराष्ट्राचा आणि मुंबईचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असे खडे बोल मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्यपाल कोश्यारींना सुनावले आहेत. तर पाठींबा देणारे भाजप आमदार नितेश राणे यांच्या वक्तव्याचाही खरपूस समाचार घेतला. नितेश राणेंच्या वक्तव्यावर पेडणेकर म्हणाल्या, जेव्हा नितेश राणे गोधडीत होते तेव्हा त्यांचे वडीलजीएसटीचे चेअरमन होते. इतिहास तपासा, आणि मग बोला असे म्हणत त्यांनी राणेंना फटकारले आहे. राणे पिता-पुत्र ज्या पक्षात जातात त्यांची सुपारी वाजवतात. आधी कॉंग्रसेशी पटलं नाही आणि आता भाजपची…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव प्रतिनिधी तुम्ही इंस्टाग्रामचा वापरात असाल तर सावधान. मुंबई आणि इतर परिसरातून २२ हून अधिक महिलांचे अश्लील व्हिडीओ बनवून त्यांना ब्लॅकमेल करून पैशाची मागणी करत होता. अनेक तक्रार आल्याने आरोपींचा तपास घेऊन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. महिलिचा लैंगिक छळ आणि ब्लॅकमेलच्या आरोपाखाली महाराष्ट्र पोलिसांनी गुजरातमधील गांधीनगर येथून प्रशांत आदित्य असे एका १९ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. आरोपी इन्स्टाग्रामवरून महिलांचे फोटो काढून त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवायचा आणि ते व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलांकडे पैशांची मागणी करत असे . आतापर्यंत त्याने सुमारे २२ महिलांना ब्लॅकमेल केल्याची माहिती आहे. महिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याला अटक केली. त्याने आतापर्यंत ४९ महिलांना…
जळगाव प्रतिनिधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईमध्ये केलेल्या वक्तव्यावर आता विरोधकांकडून राज्यपालांनी या वक्तव्याप्रकरणी माफी मागावी म्हणत त्यांनी राजीनामा घ्या अशीही मागणी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘मराठी माणसाला डिवचू नका!’ असे ट्विट केले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा आपल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शुक्रवारी (२९ जुलै) रोजी मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात ते म्हणाले होते की, ‘ गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही. मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही’. या वक्तव्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे…
पक्ष संघटन महत्वाचे; पक्षादेश आल्यास विचार करू- सुरेशनाना चौधरी धरणगाव प्रतिनिधी । बंडखोरीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. धरणगाव शहराचे माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी हे जळगाव लोकसभेसाठी आगामी उमेदवार होणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. पडतीच्या काळात आपण पक्षासोबत असून पक्ष बांधणीला अधिक प्राधान्य दिल, पक्षाने आदेश दिला तर निवडणूक लढू अशी प्रतिक्रिया सुरेश चौधरी यांनी दिली. जळगाव लोकसभा मतदार संघात सध्या राजकीय वातावरणात मोठे बदल झाले आहे. शिंदे गट आणि शिवसेना अशी दरार निर्माण झाली आहे. एकीकडे अडचणीत सापडलेल्या शिवसेना पक्षासाठी मोर्चे बांधणीला सुरूवात झाली आहे. दुसरीकडे शहरातील उद्योगपती तथा माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी हे लोकसभेसाठी संभव्य उमेदवार…
गोव्यातील एका रेस्टॉरंट आणि बारसंदर्भात भाजपच्या स्मृती इराणी आणि त्यांच्या मुलीवर अनेक ट्विट्स करण्यात आले होते. काँग्रेसच्या तीन नेत्यांना २४ तासांच्या आत ट्विट हटवण्याचे आदेश आज दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. केंद्रीय मंत्र्यावरील आरोपांवर दिल्ली उच्च न्यायालयानेही नेत्यांना समन्स बजावले. जयराम रमेश, पवन खेरा आणि नेट्टा डिसूझा यांना स्मृती इराणी यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात त्यांचे ट्विट हटवून 18 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्यास आदेश दिले आहे. अद्याप असे केले नाही उच्च न्यायालयाने म्हटले, तर सोशल मीडिया कंपनी किंवा ट्विटरला ट्विट काढून टाकावे लागतील.”माझी मुलगी १८ वर्षांची असून, महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहे. ती बार चालवत नाही. राजकारणात नाही,” असे सांगत,…
जळगाव प्रतिनिधी जळगावात नळाचे पाणी भरण्याच्या कारणावरून भाडेकरूंमध्ये हाणामारी झाली. त्याचा राग मनात ठेवून दोन बहिणींचा विनयभंग केल्याची प्रकार घडला आहे. याबाबत शनीपेठ्यातील पोलीस ठाण्यात दोन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात दोन बहिणी ह्या भाड्याच्या घरात राहून जीवन जगत होते. त्यांच्या घराच्या शेजारी मनिषा मनोज कोळी आणि मनोज कोळी हे दाम्पत्य राहते. गुरूवार २८ जुलै रोजी सायंकाळी घरात पाणी भरण्याच्या कारणांमुळे दाम्पत्या बरोबर वाद झाला. वाद वाढल्याने हाणामारी झाली. यातील मनोज कोळी याने दोन्ही बहिणींशी धक्काबुक्की करून त्यांचा विनयभंग केला. याबाबत रात्रीच्या वेळी दोन्ही बहिणींनी शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार…
पुणे शहरात गेली अनेक दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. हत्येचे प्रमाण देखील वाढल्याचे समोर आले, असाच पुण्यात एका हाणामारीच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. येरवड्यात दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. येरवडा येथील शिवराज चौक रस्त्यावर दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाली.हातात काठ्या घेऊन एकमेकांना हाण्यात आले. भर रस्त्यातील फ्री स्टाईल हाणामारी प्रकार घडला असून घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. येरवड्यातील दृश्य पाहून हे पंजाब असल्याचे वाटत होते. या प्रकाराणे येरवडा पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. येरवड्यात भर रस्त्यात गुन्हेगारांचा लाठी आणि काठ्यांचा नंगानांच सुरु…
अर्जुन खोतकर या दिवशी करणार शिंदे गटात प्रवेश , पहा माहिती शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर आता शिंदे गटात दाखल होणार आहेत, हे आता अधिक स्पष्ट झाले आहे. दिल्लीत खोतकर यांनी अब्दुर सत्तार यांच्या उपस्थित भेट घेतली. त्यामुळे राजकारणात चर्चेला उधाण आले.अर्जुन खोतकर हे आपण शेवटपर्यंत शिवसेनेसोबत राहणार असल्याचे म्हटले होते. यावर अनेक प्रश्न निर्माण झाला आहे. शिंदे गटातील नेत्यांच्या गाठीभेटी घेण्याचा सपाटा लावला आहे. खोतकर यांनी EDची नोटीस आल्यानंतर त्यांनी आपला निर्णय बदल्याची चर्चा आहे. ईडीची कारवाई वाचविण्यासाठी खोतकर हे आता शिंदे गटात सामील होणार आहे . राज्याच्या राजकारणामध्ये कधी काय होईल याचा आता नेम नाही. एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले…
नागपुरात खळबळ उडाली आहे. एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. अंत्यसंस्कारावेळी अग्नी देताना आगीचा भडका उडाला. यावेळी तिथे असलेले तीन जण जखमी झाले. मात्र त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला. तर एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. गुरुवारी सायंकाळी नागपूर कामठीच्या राणी तलाव मोक्षधाम येथे स्थानिक रहिवासी सिद्धार्थ हुमणे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गेलेले असता त्यावेळी अग्नी देताना हा प्रकार घडला. आगीत तीन जण गंभीर होरपळले. अग्नी देण्यासाठी डिझेलचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे डिझेलचा भडका उडाल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. दिलीप गजभिये आणि…
जळगाव प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे सरकार कोसळले. या बंडातील सर्व आमदारांनसह खासदारांनी हिंदुत्वाचं कारण देत शिंदे गटात सामील झाल्याचं म्हटलं होतं. बंडखोरांमध्ये तत्कालीन ठाकरे सरकरमधील मंत्री अब्दुल सत्तार देखील सामील होते. सत्तार देखील हिंदुत्वासाठीच बंडखोरांसोबत गेले का, असे खोचक प्रश्न विचारण्यात येत होते. सत्तार यांचे नाव नव्या मंत्रींडळाच्या यादीतून वगळल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्यातील अनेक नेते मंत्रीपदासाठी लॉबिंग करण्यासाठी दिल्लीत दाखल झाले असून सत्तार देखील त्यासाठीच गेल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तार हे मंत्री होते मात्र, आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये ते मंत्री होणार का? असा प्रश्नही निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघे जे निर्णय घेतात, त्यांना…

