जळगाव प्रतिनिधी । शहरातील सिंधी कॉलनी परिसरात राहणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील सिंधी कॉलनी परिसरात २६ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनिवार ३० जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास रौनक रामकुमार कुकरेजा याने महिलेला फोन करून त्याच्या घरी काम असल्याचे सांगून घरी बोलावले. घरात कुणीही नसल्याचा फायदा घेत महिलेशी अंगलट करत हात पकडून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला. महिलेने तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रात्री ११.३० वाजता संशयित आरोपी रौनक रामकुमार…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
धुळे प्रतिनिधी । जिल्ह्यातील तामसवाडी येथून विवाहिता ही चौदा वर्षाचा मुलाला सोबत घेवून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोनगिर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दिनेश वसंत बोरसे (वय-४०) रा. तामसवाडी ता.जि.धुळे हे पत्नी सपनाबाई व मुलगा उदय यांच्यासोबत वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. २५ जुलै रोजी दिनेश यांची पत्नी सपनाबाई बोरसे ह्या घरात कुणालाही काहीही न सांगता मुंबई येथे बचत गटचा मोर्चा असल्याने मुलगा उदय बोरसे याला सोबत घेवून गेल्या. त्यानंतर त्यांच्या पतीने त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता काहीही माहिती मिळाली नाही व मोबाईल बंद असल्याचे दिसून आले. अधिक…
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीने छापा टाकला. पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी तब्बल ९ तासांच्या चौकशीनंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. काही महिन्यांपूर्वीच पत्राचाळ प्रकरणात ईडीने राऊत यांना समन्स बजावले होते. रविवारी चौकशीनंतर ईडीने राऊत यांना ताब्यात घेतले आहे. सलग 9 तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत ईडीच्या ताब्यात शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. संजय राऊतांची काल सकाळपासून चौकशी सुरु होती. संजय राऊत यांच्या घरातून 11.50 लाखांची कॅश सापडली आहे. ED ने छापेमारीदरम्यान ही कॅश जप्त केली आहे. या प्रकरणात ईडी संजय राऊत यांना प्रश्न विचारणार असल्याचं समोर आलं…
भारतासाठी वेटलिफ्टिंगमध्ये, लालरिनुंगा जेरेमी मेन्सने 67 किलो गटाच्या अंतिम फेरीत चमकदार कामगिरी केली. त्याने स्नॅच किलोमध्ये 140 किलो वजन उचलून विक्रम केला आहे. स्नॅच अँड जर्कमध्ये 165 किलो वजन उचलण्यात आले आहे. भारतीय वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगा याने पुरुषांच्या 67 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. बर्मिंगहॅममध्ये भारताचे दुसरे सुवर्ण पदक आहे. स्नॅच अँड जर्कमध्ये 165 किलो वजन उचलण्यात आले आहे. भारतीय वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगा याने पुरुषांच्या 67 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. बर्मिंगहॅममध्ये भारताचे दुसरे सुवर्ण पदक आहे. 19 वर्षीय जेरेमीने त्याच्या पहिल्याच प्रयत्नात 136 किलो वजन उचलले आणि पुढच्या प्रयत्नात 140 किलो वजन उचलण्याचा यशस्वी प्रयत्न केला.जेरेमीचे पहिले आणि आतापर्यंतचे…
जळगाव प्रतिनिधी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे भोसरी गैरव्यवहार प्रकरणात जेलमध्ये जातील, हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे, अशी टीका भाजप नेते गिरीश महाजन यांनी केली. राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्या भोसरी प्रकरणाची पुन्हा एकदा ईडीकडून चौकशी होणार आहे. याच प्रकरणावर गिरीश महाजन यांनी भाष्य केलं आहे. महाविकास आघाडी सरकारवर ईडी कायम आहे. चौकशीत त्यात स्पष्टता येईल आणि कोण स्वच्छ आहे, कोणाचे हात बरबटले आहेत, ते सुध्दा समोर येईल, असे महाजन यांनी सांगितले.भोसरी प्रकरणात प्रचंड अनियमितता आहे, त्यामुळं खडसेंची जेलवारी अटळ आहे.मध्यंतरी या प्रकरणात एकनाथ खडसे यांची ईडीने चौकशी केली होती.एवढंच नाहीतर खडसेंचे जावाई गिरीश चौधरी यांना अटकही करण्यात आली होती. भोसरी…
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आज सकाळीच ईडीचं पथक घरी दाखल झालं आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांची चौकशी होणार आहे. ईडीने काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. आज ईडीचं पथक थेट संजय राऊत यांच्या घरी पोहचलं आहे. ईडीचे काही अधिकारी आज सकाळीच संजय राऊत यांच्या घरी पोहोचले आहेत. दिवस ईडी कार्यालयाकडून हजर राहण्यासाठी वारंवार नोटीसा येऊनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्याचा शहाणपणा शेवटी त्यांच्याच अंगलट आला आहे. या पथकासोबत सुरक्षा रक्षक असून त्यांनी संजय राऊत यांच्या घराबाहेर पहारा सुरू ठेवला आहे. कुणालाही आत जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संजय राऊत हे सध्या त्यांच्या कुटुंबियांसोबत…
संजय राऊतांच्या मैत्री बंगल्यावर ईडीने छापा टाकला आहे. शिवसेनेचे उपनेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे शिवसेनेला पुन्ह अडचणीत वाढ झाली. अश्यात ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर चर्चा करत अर्जुन खोतकरांना सवाल विचारला आहे. अर्जुन खोतकरांना मी वाघ समजतोय, तो सुभाष देसाईंसारखा शेळी कधी झाला?”, असं टोला रामदास कदम यांनी लगावला आहे. तसे चइच्छा नसताना शिंदेगटात जावं लागतंय, असल्याचे अर्जुन खोतकर यांनी आपली झालेली कोंडी बोलून दाखवली. कदम त्याबाबत विचारलं आसता सर्वात आधी खोतकरांनी मला फोन केला होता, पण मला असं काही बोलेल नाहीत. हा एवढा…
जळगाव शहरातील शिवाजीनगर पुलाच्या रस्त्यावर डांबरीकरणाचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. लवकरच वाहतूकी करता हा रस्ता सुरू केला जाणार आहे. शिवाजीनगर पुलाच्या कामाबाबत आता जिल्हाधिकारी तसेच महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी अधिक लक्ष दिले आहे. महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी शुक्रवारी पुलाची पाहणी केली. कामगारांना ताबडतोब पुलाचे काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दोन दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे डांबरीकरणाचे कामही आता अंतिम टप्प्यात आलेले असल्याचे सांगण्यात आले. तसेच पुलाच्या कठड्याचे कामही आता पूर्ण होत आहे. पथदिवे लावण्याबाबत आलेल्या निविदा लवकरच उघडून त्याबाबतही आदेश देण्यात येत आहे. त्यामुळे पथदिवे बसविण्याचे कामही सुरू होणार आहे. उपप्रादेशिक…
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे सध्या नांदेड जिल्ह्यातील दौऱ्यावर आहेत. यावेळी ते शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेतलीयावेळी एका आजीबाईंनी तक्रार मांडताच अजित पवारांनी कपाळावर हात मारला आहे. आता हा किस्सा आहे तरी काय? नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी मुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी अजित पवार करत होते. अजित पवार नांदेड जिल्ह्यातील दौऱ्यावर आले असता एका आजीबाईंनी पंतप्रधान आवास योजनेत जिवंत व्यक्तीला मयत दाखवल्याची तक्रार केली. कारोडी गावातील एका आजीबाईनीं प्रधानमंत्री आवास योजनेत त्यांचे पती जिवंत असताना मयत दाखवल्याची तक्रार अजित पवारांकडे केली. ते ऐकताच अजितदादांनी कपाळावर हात मारला आणि आश्चर्य व्यक्त केलं. यावर अजित पवारांनी उपस्थितीत अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली व समस्या सोडवण्याची…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी अजिबात शत्रू मानू नये. त्या माणसांनं उरावर धोंडा ठेवून हा निर्णय घेतला आहे.एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या विरोधात बंड करायला तयार नव्हते. एकनाथ शिंदे कितीवेळा रडलं. शहाजी पाटील यांनी एका मुलाखतीत आमदार हा दावा केला आहे. निर्णय घेण्यासाठी आम्ही ४० ते ४२ आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या मोठ दबाव टाकला. त्यानंतर त्यांनी ही निर्णय घेतला, असे आमदार पाटील यांनी या वेळी नमूद केले. शिवसेना ताब्यात घेण्याबाबतच्या वादावरही आमदार पाटील यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, आज महाराष्ट्रात चालेला वाद दुर्दैवी आहे. बहुधा एकनाथ शिंदे हा निर्णय घेण्यासाठी तयार होत नव्हते, सूरतमध्ये , गुवाहाटीमध्ये रडलं. काय…

