Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येऊन दीड महिना झाला तरीसुद्धा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. संपूर्ण राज्याचं लक्ष आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे लागून राहिलं आहे. आता प्रतिक्षा संपली असून उद्याच सकाळी 11 वाजता राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. राजभवनावर शपथविधी सोहळा पार पडणार असल्याचंही कळतंय. पहिल्या टप्प्यात 10 ते 15 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक सुरु असून बैठकीनंतर ते राजभवनावर जाण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात किती मंत्र्यांचा समावेश असेल हा अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे असणार आहे. सातत्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विचारला. मात्र लवकरच विस्तार होईल असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे…

Read More

एकनाथ खडसे यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांवर आता जोरदार निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर आता एकनाथ खडसेंनी बंडखोरांवर खोचक टीका केली आहे. “हम तो डुबेंगे सनम, तुमको भी साथ लेकर डुबेंगे” असं म्हणत हल्लाबोल केला आहे. “कोणी म्हणतं तुरुंगात जायचंय, जायचंय तुरुंगात तर तुरुंगात जाईन. माझं नेहमीच असं होतं की, हम तो डुबेंगे सनम, तुमको भी साथ लेकर डुबेंगे”” असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला आहे. आडवी उभी काहीतरी स्टोरी रचायची आणि त्याच्या माध्यमातून अडकवण्याचा प्रयत्न करायचा असे जे प्रकार होत आहेत ते निषेधार्ह आहेत” तुम्हाला काय हाटील, काय झाडी जे काही बघायचे असेल…

Read More

बेळगावहून हिरेकेरूरला निघालेली कर्नाटक महामंडळाची बस अचानक पलटी झाल्याने अपघात घडला आहे. बसमध्ये असलेल्या 35 प्रवाशांपैकी 5 जण जखमी झाले. बस सावकाश असल्या कारणाने प्रवाशांना फारशी इजा झाली नाही. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बडेकोळ्ळमठ येथे रविवारी बसचा अपघात घडला. बागेवाडी विशाळगडहून राणेबेन्नूर निघालेली बस बेळगावात थांबा घेऊन पुढे जात होती. बडेकोळ्ळमठाच्या पुढील बाजूला असलेल्या कमकारहट्टीच्या बाजूला उतारीला लागलेल्या बसवरील चालकाचा नियंत्रण ठेवणे शक्य झाले नाही. याचवेळी जोराचा पाऊस सुरू असल्याने चालकाने वेग कमी केला होता. तरीही बस बाजूला असलेल्या दुभाजकाला धडकली आणि पलटी झाली. बसमध्ये बसलेले पाच प्रवाशी जखमी झाले. उर्वरित प्रवाशांनाही कसलीही इजा झाली नाही. घटनेची माहिती मिळताच हिरेबागेवाडी पोलिसांनी…

Read More

मुंबईविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱया राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्यभरातून अनेक पिकाचा सामना करावा लागतो. उगाच बाष्कळ बडबड करू नका, सेल्फ गोल करू नका अशा शब्दांत वरिष्ठांकडून कोश्यारींना समज देण्यात आली आहे. आता अक्षरशः राज्यपाल कोश्यारी नजर चोरात पळ काढण्याची वेळ आली आहे. गुजराती आणि मारवाडी लोक निघून गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असे वक्तव्य करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वाद ओढवून घेतला होता. या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. राज्यपाल दोन दिवस दिल्ली दौऱयावर असून त्यांनी आज पक्षातील वरिष्ठांची भेट घेतली. तेव्हा त्यांना वरिष्ठांनी चांगलीच तंबी दिल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे राज्यपालांनीही तशी कबुली दिली. महाराष्ट्र सदनात…

Read More

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत बंड केला आहे. एकनाथ शिंदेसह 55 पैकी 40 आमदार , खासदार यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. आमदारांच्या या पाठिंब्यामुळे तर राज्यातलं महाविकासआघाडी सरकार पडलं. राजकारणात सत्ता संघर्ष सुरू असताना एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसणार आहे. राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्यांचा गद्दार म्हणून वारंवार उल्लेख करत आहेत. याच्या दोन महिन्यांनी शिंदे आणि ठाकरे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 21 ऑगस्टला नवी मुंबईमध्ये बालाजी मंदिराच्या भुमीपुजनाचं निमंत्रण मंदिराच्या विश्वस्तांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह ठाकरे कुटुंबालाही दिलं आहे. नवी मुंबईमध्ये उभारण्यात येणाऱ्या तिरुपती बालाजी मंदिराच्या भुमीपूजनाला…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: एकनाथ शिंदे गट आणि भाजपने राज्यात सरकार स्थापन केलं आहे. शिवसेना आणि शिंदे गटात वादप्रतिवाद आणखी वाढले आहेत. पार्श्वभूमीवर आमदार दीपक केसरकर शिंदे गटाची बाजू घेत शिवसेनेच्या टीकांना प्रत्युत्तर दिले. अनेक गौप्यस्फोटानंतर त्यांची शिंदे गटाच्या प्रवक्तेपदावरून उचलबांगडी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. केसरकर यांनी अनेक खुलासे केले होते. आदित्य ठाकरेंची बदनामी करण्याचा कट नारायण राणे यांनी आखल्याचा गंभीर आरोप दीपक केसरकर यांनी केला. याविरोधात आपण भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडे तक्रारही केल्याचं त्यांनी म्हटलं होतं. या आरोपानंतर नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. किरण पावसकर शिंदे गटाची बाजू मांडणार असल्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरेंबद्दल जे बोललं…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मयूर कॉलनी परिसरातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने फुस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत शुक्रवार ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता एकावर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर कॉलनी परिसरात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. गुरुवार शुक्रवार ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मुलगी ही घरात असताना संशयित आरोपी सागर भरत भोई रा. जळगाव याने अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याचे घटनाउघडकीला आली आहे. याबाबत पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तातडीने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील एका भागात राहणारी 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने फुस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत शुक्रवारी 5 ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सुप्रीम कॉलनी परिसरात १५ वर्षीय मुलगी ही आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. गुरुवार ४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता अल्पवयीन मुलगी ही घरी असताना कुर्बान शेख (पूर्ण नाव माहित नाही) याने अल्पवयीन मुलीला पोस्ट लावून पळवून नेले. दरम्यान तिच्या कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला असता ती कुठेही मिळून आली नाही ). अखेर शुक्रवार ५ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शिंदे- फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे मंत्री आणि राज्यमंत्र्यांचे अधिकार संबंधित विभागाच्या सचिवांना देण्यात आले आहेत.राज्यात शिवसेना आणि भाजप सरकारचा होणारा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला आहे. त्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत आदेश दिले आहेत.  30 जूनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.मंत्रिमंडळ स्थापन न झाल्याने त्याचा परिणाम आता विभागांवर होत आहे.त्यामुळे,मंत्र्यांचे सर्व अधिकार सचिवांना देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही.  मंत्र्यांकडे अनेक प्रकारचे अधिकार असतात. पण राज्यत मंत्रीच नसल्याने  विविध विभागांची कामे अडली आहेत. मंत्रीच नसल्याने हे अधिकार अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव तसेच सचिवांकडे…

Read More

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील सोनवद येथील तलाठी दत्तात्रय पाटील यांची मुलगी प्राजक्ता हिच्या दहाव्या वाढदिवसानिमित्त जुवार्डी येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जुवार्डी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र आणि स्मशानभूमी परिसरात चिकू, सिताफळ, जांभूळ, मोसंबी यांचे एकुण २५ पर्यावरण पुरक झाडे लावण्यात आले. गेल्यावर्षी याच परिसरात २० झाले लावण्यात आले होते. त्यापैकी १५ झाडांचे संगोपन वृक्षमित्र भालेराव पाटील करीत आहे. वृक्षारोपण करून नवीन कार्यास प्रारंभ केल्याने सर्वत्र उपक्रमाचे कौतूक होत आहे.

Read More