लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शहर महानगरपालिका व हॉकी जळगावच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिका स्तरीय आंतरशालेय नेहरू हॉकी चषक स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले. महापालिका स्तरीय आंतरशालेय नेहरू हॉकी चषक स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक तथा कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू नितीन बरडे यांच्याहस्ते करण्यात आले. या स्पर्धेत १५ वर्षातील मुलांच्या स्पर्धेत गोदावरी इंग्लिश स्कूल विजयी तर विद्या इंग्लिश स्कूल उपविजेते ठरले, तर १७ वर्षे मुलांच्या गटात गोदावरी स्कूल विजयी तर अँग्लो उर्दू हायस्कूल उपविजय ठरले, आणि १७ वर्षा आतील मुलींच्या गटात जी.डी. बेंडाळे महाविद्यालय विजयी तर गोदावरी इंग्लिश स्कूल…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भगवे मफलर गळ्यात टाकून हल्ला केल्याचा आरोप केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप आमदार व गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक झाली असून. पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली गेली पडळकर हे वारंवार बिनबुडाचे आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाची बदनामी करत आहेत. याबाबत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणीही पोलिस आयुक्तांकडे निवेदनातून पक्षाकडे करण्यात आली आहे.आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून अनेक वेळा जयंत पाटलांच्या वर जहरी टीका करण्यात…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: रिंगरोडवरील सीएमएस कंपनीच्या जळगावच्या शाखा मॅनेजरने कंपनीच्या खात्यात रक्कम न भरता तब्बल ३३ लाख २९ हजार १८१ रूपयांचा अपहार करून फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात अडीच वर्षांपासून फरार असलेल्या संशयिताला जिल्हापेठ पोलीसांनी पुण्यातून अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील रिंगरोडवर नाशिक येथील सीएमएस नावाची कंपनीची शाखा आहे. या शाखेत २०१८ मध्ये शाखा व्यवस्थापक म्हणून महेंद्र पांडूरंग झोंबाडे (वय-३४) रा. चाकण आगरवाड, पुणे हा काम पाहत होता. जळगाव शाखेचे कामकाज झोंबाडे कामकाज पाहत होता. कंपनीचे पुण्यातील वरीष्ठ व्यवस्थापक मुकुंद ओव्हळ हे सप्टेंबर २०१९ मध्ये कंपनीचे खात्याची तपासणी करत असतांना त्यांना रेल्वेकडील येणाऱ्या रकमेपैकी ३३ लाख २९ हजार…
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर सेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेनेचा 39 आमदार शिंदे गटात डदाखल झाले आहेत. काही माजी आमदारासह खासदार ही शिंदे गटात दाखल होत आहेत. आता शिवसेनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. हा मनसेसाठी मोठा हादरा मानला जात आहे. शिंदे गटाने पनवेलमध्ये मनसेला खिंडार पाडल्याचे दिसून येत आहे. पनवेल, उरणमधील मनसेच्या 100 पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. मुंबईतील मलबार हिल येथील नंदनवन बंगल्यात रात्री उशिरा मुख्यमंत्रीच्या उपस्थितीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.पनवेल, उरण,खारघरमध्ये मनसेला खिंडार पडले आहे. माजी जिल्हाध्यक्षांसह 65 जणांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मनसेचे माजी रायगड…
बंडखोर ४० आमदारांनी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सोबत गद्दारी केल्याचा आरोप करत, त्या ४० आमदारांनी राजीनामा देवून पुन्हा निवडून येवून दाखवावं असं खुलं आव्हान आदित्य यांनी दिलं आहे. ठाकरे यांच्या आव्हानाला प्रतिउत्तर देताना आमदार शहाजी पाटील यांनी आदित्य ठाकरेना चांगले खडसावले आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना रविवारी रात्री उशिरा ईडीने अटक केली. पत्राचाळ घोटळाप्रकरणी ईडी सध्या राऊतांची चौकशी करत आहे. शहाजी बापू पाटील यांनी राऊतांचा समाचार घेतला. राऊत म्हणजे भोंगा नाही, तर राज्याला लागलेली किरकिर होती, असा टोला त्यांनी लगावला आहे. यासोबतच त्यांनी आदित्य ठाकरेंनाही सल्ला दिला. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आदित्य ठाकरेंनी राज्यातील अनेक…
श्रावण महिन्यातील पहीला श्रावणी साेमवार. हिंदु धर्मात श्रावण महिना व सोमवारला महत्वाचे स्थान आहे. त्यामुळे नाशिक येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या ‘श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिराला’ आजच्या दिवशी विशेष महत्व प्राप्त होते. भारतातुन आज भाविक येथे दर्शनासाठी येतात. श्रावणी सोमवारला दिवसभर सुरु असलेल्या पूजा-अर्चेमुळे मंदिरातील वातावरण भक्तीमय आहे. नाशिक येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या ‘श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात’. आज पहाटेपासूनच महाभिषेक, श्रावणी अभिषेक, आरती अशा पूजाअर्चा सुरू असल्याने; मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने फुलून निघाला आहे. पहाटे पासून भाविकांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा दिसुन आल्या. नाशिकसह राज्यभरातून भाविक त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल झालेत. मंदिराच्या पूर्व दरवाज्याकडील मंडपात एकाच वेळी दहा ते पंधरा हजार…
भाजप-शिवसेनेचे हे सरकार सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी कार्यरत आहे. आता केंद्र सरकारचाही पूर्ण पाठिंबा असल्याने राज्याला विकासाच्या वाटेवर घेऊन जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. रविवारी पार पडलेल्या सभेत मुख्यमंत्री म्हणाले, आता विकासाची कामे फायलींमध्ये अडकणार नाहीत. त्यामुळे राज्याच्या विकास कामाला गती येईल. जनतेने भाजप-शिवसेना युतीला कौल दिला होता. अडीच वर्षे मुख्यमंत्री करण्याचा विषय असेल किंवा नसेल, पण चर्चा करून मार्ग काढू, असे सांगूनही युती करण्याची इच्छाशक्ती दिसत नव्हती. अडीच वर्षांत राष्ट्रवादीच्या आमदारांना दिला जाणारा निधी, शिवसैनिकांचे झालेले खच्चीकरणला वाचा फोडण्यासाठी वेगळा निर्णय घ्यावा लागल्याचे शिंदे म्हणाले. राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणारे रस्ते, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास…
जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील धानवड येथील तरूणीची विषारी औषध घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुर्गा पुरूषोत्तम वाघ (वय-२३) रा. धानवड ता. जि.जळगाव असे मृत तरूणीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दुर्गा वाघ ही तरूणी आपल्या कुटुंबियासह जळगाव तालुक्यातील धानवड येथे वास्तव्याला होती. शनिवारी ३० जुलै रोजी दुपारी घरी कुणीही नसतांना तरूणीने राहत्या घरात विषारी औषध घेतले. दरम्यान, हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने जळगावातील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याबाबत…
जळगाव प्रतिनिधी । जळगावात मुलीला भेटण्यासाठी आलेल्या नाशिक येथील वयोवृध्दाला तीन जणांना रिक्षात बसवून मेहरूण तलावाजवळ नेत चाकूचा धाक दाखवत रोकड आणि मोबाइल चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, उत्तमराव नामदेव वाघ (वय-७८) रा. द्वारका, नाशिक हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते रेल्वे विभागात सिनीयर सेक्शन इंजीनीयर या पदावरून सेवानिवृत्त आहेत. त्यांची लहान मुलगी जळगावातील संत गाडगेबाबा चौकात राहत असल्याने त्यांना भेटण्यासाठी उत्तमराव वाघ हे शुक्रवारी २९ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता जळगावात रेल्वेने आले. मुलीच्या घरी जाण्यासाठी ते रिक्षाने बसले. रिक्षात आगोदर दोन जण बसले…
रावेर प्रतिनिधी । निंभोरा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या तांदलवाडी गावातून पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निंभोरा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथे पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनिवारी ३० जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास मुलगी घरी एकटी असतांना गावातील आशिश सुनिल कोळी याने काहीतरी फूस लावून पळवून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोठेही आढळून आले नाही. याबाबत निंभोरा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी आशिश कोळी याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा…

