लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: राज्याच्या मंत्रीमंडळाचा विस्तार शपथविधीचा पार पडला. यात जळगाव जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्रीची निवड झाली आहे. यामुळे जिल्ह्यासाठी आता डबल इंजिन मिळाल्याने विकास वेगाने व्हायला हवा. असा टोला राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी लगावला आहे. मंत्रीमंडळ विस्तार मुहूर्त मिळाला आहे. या मंत्री मंडळात सहभागी झालेल्या मंत्रांचे आपण स्वागत करून आणि त्यांनी तातडीने विकास कामे हाती घेऊन जनतेच्या समस्या सोडवाव्यात ही अपेक्षा ठेवू असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे. राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार होवून कॅबिनेट मंत्री पदाच्या शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. या मंत्रीमंडळात जळगाव जिल्ह्यातील भाजपचे गिरीश महाजन व शिंदे गटातील गुलाबराव पाटील यांनी देखील कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली.…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: एका नऊ वर्षाच्या मुलीवर तिच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने शारिरिक अत्याचार कर लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध बलात्कार, पोस्को व अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रोसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी आरोपींला बेड्या ठोकल्या आहेत. अल्पवयीन पीडितेच्या कुटूंबियांतील ओळखीचा गैरफायदा घेत ज्ञानेश्वर त्र्यंबक पाटील (५६) आरोपीने पीडितेची वाट अडवून राहत्या घराच्या पाठीमागे नेऊन जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तिच्यावर शारिरिक, लैंगिक अत्याचार केले. ‘जर तु तुझ्या आईला सांगितला तर तुला आणि तुझ्या आईला मारून टाकण्याची धमकी दिली आहे. काही काळाने बालिकेला शारिरिक त्रास होऊ लागल्याने तिला उपचारार्थ दाखल…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । गुलाबराव पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्याकडे पुर्वीप्रमाणेच पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री या पदाची जबाबदारी देण्यात येत आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्याला दोन मंत्री मिळाल्याने विकास कामांना खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे असे जळगाव ग्रामीण मतदार संघात बोलले जात आहे. ना. गुलाबराव पाटील यांनी सकाळी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर धरणगाव मतदार संघातील समर्थक कार्यकर्त्यांमध्ये एकप्रकारे उत्साह संचारला आहे.
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवार, ८ ऑगस्ट रोजी दुपारी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी येथील वय १७ मुलगा हा त्याच्या घरी असतांना त्यास ७ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट दरम्यान अज्ञात व्यक्तीने काहीतरी फूस लावून पळवून नेले. मुलगा उशीर होवून पुन्हा घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबियांनी शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही. अखेर एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून सोमवारी ८ ऑगस्ट रोजी दुपारी अज्ञात व्यक्तीविरोधात एमआयडीसी पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.
भुसावळकडून जळगावकडे येत असतांना राष्ट्रीय महामार्गावर पार्श्वनाथ पेट्रोलपंपासमोर अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना २९ जुलै रोजी घडली होती. या अपघातप्रकरणी नऊ दिवसानंतर रविवार, ७ ऑगस्ट रोजी नशीराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिओम धनाजी भुसारे वय ३८ रा. सावरगाव ता. नांदगाव जि. नाशिक हे २९ जुलै रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीने भुसावळकडून जळगावकडे येत असतांना महामार्गावर नशीराबादजवळ पार्श्वनाथ पेट्रोलंपपासमोर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात होवून दुचाकीवरील हरिओम भुसारे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी नऊ दिवसानंतर रविवारी मयत हरिओम यांचे वडील धनाजी गंगाराम भुसारे वय ६२ रा. श्रध्दा कॉलनी, जळगाव यांच्या तक्रारीवरुन…
जळगाव शहरातील सिल्व्हर पॅलेज हॉटेलमधील लॉजिंग विभागाच्या काऊंटरमधून २ हजार १० रुपयांची रोकड चोरुन नेणाऱ्या तरुणाविरोधात रविवार, ७ जुलै रोजी जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसात दाखल तक्रारीनुसार असे की, हॉटेल सिल्व्हर पॅलेसच्या लॉजिंक विभागातील काऊंटरमधून ३१ जुलै रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास हॉटेलमधीलच भुषण फकीरा सुर्यवंशी याने मालकाच्या संमतीशिवाय २ हजार १० रुपये चोरुन नेले. चोरीची खात्री झाल्यानंतर याप्रकरणी हॉटेलचे सुपरवायझर सागर रत्नाकर झांबरे यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन रविवारी भुषण फकीरा सुर्यवंशी रा. शेंदुर्णी ता. जामनेर याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय निकुंभ हे करीत आहेत.
शहरातील इच्छादेवी चौकात राहणाऱ्या तरुणाचा मेहरुण तलावामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवार ८ ऑगस्ट रोजी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी नोंद घेतली असून अकस्मात मृत्यू नोंद करण्याचे काम सुरू होते.नाना सुरेश सोनवणे (वय ३२, रा.इच्छादेवी नगर) असे मयत तरूणाचे नाव आहे. अधिक माहिती अशी की, नाना सुरेश सोनवणे हा सोमवारी ८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मेहरण तलाव येथे गेला होता. काही वेळानंतर तो तेथे बुडून मृत्यू पावल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान, त्याने आत्महत्या केली किंवा पाण्यात पाय घसरून पाडला याची कोणतीही माहिती मिळाली नाही. पोलीसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात…
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. पहिल्या टप्प्याच साधारणत: १५ ते १८ मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टोले बाजी केली आहे. “उद्या मंत्रीमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता वाटते आहे. मात्र, विरोधी पक्षनेता म्हणून मला अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही”, विधानसभेच्या विरोधीपक्ष नेता या नात्याने मला आज पत्र मिळाले आहे. उद्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी विरोधीपक्षांची नावे देण्यासाठी हे पत्र मला प्राप्त झाले आहे. त्यामुळे उद्या या समितीची बैठक होण्याची शक्यता आहे. पुढे अजित पवार म्हणाले, मला मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत माहिती मिळाली आहे. मात्र, विरोधीपक्ष…
धरणगाव प्रतिनिधी । राज्य मंत्री मंडळाची शपथविधीचा मुहूर्त ठरल्याने जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार गुलाबराव पाटील हे आज दुपारी मुंबई तातडीने रवाना झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळाच्या विस्तारासाठी मंगळवार ९ ऑगस्ट तारीख ठरली आहे. ९ ऑगस्ट हा क्रांती दिनी असल्याने पहिल्या मंत्री मंडळाचा विस्तार होत आहे. याबाबत आता बंडखोर आमदारांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. त्यासाठी जणू काही गुडघ्याला बाशींग बांधून होते. राज्य मंडळाच्या शपथविधीला मोजके मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. जळगाव जिल्ह्यात माजी मंत्री आमदार गुलाबराव पाटील आणि माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांची नावे निश्चित करण्यात आली आहे. आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ते रेल्वेद्वारे…
7 ऑगस्ट रोजी पुण्यात दारू पिलेल्या वादातून एकाने मित्राचा डोक्यात दगड मारून गंभीररित्या हत्या करण्यात आली. मात्र उपचारादरम्यान या तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपी प्रवीणला अटक केली आहे. अनिल राजू सासी (वय 33, रा. इंदिरानगर वसाहत) असे मृत तरुणाचे नाव आहे. अनिल हा बूट पॉलिशचे काम करून उदरनिर्वाह चालवत होता. प्रवीण आणि अनिल मागील 10 ते 12 वर्षांपासून मैत्री होती. दोघेही नेहमी सोबतच दारू पित असत. 2 ऑगस्टला दुपारच्या सुमारास अनिल व प्रवीण दारू पित बसले होते. यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यामुळे रागातून प्रविणने अनिलच्या डोक्यात दगडाने मारून त्याला गंभीर जखमी केले. प्रविण त्या…

