Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » १६० कोटींच्या बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात माजी शिक्षणाधिकारी अटकेत; SITच्या तपासाला मोठे यश
    क्राईम

    १६० कोटींच्या बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात माजी शिक्षणाधिकारी अटकेत; SITच्या तपासाला मोठे यश

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 28, 2026Updated:July 28, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्युज : नाशिक विभागातील बहुचर्चित १६० कोटी रुपयांच्या बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी विशेष तपास पथकाने (SIT) आणखी एक मोठी कारवाई करत जळगावचे सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांना अटक केली आहे. त्यांना धुळे येथून ताब्यात घेण्यात आले असून, नाशिक रोड पोलिसांनी ही कारवाई केली.

    तपासानुसार, बनावट शालार्थ आदेश आणि बोगस शालार्थ आयडींच्या माध्यमातून शासनाची सुमारे १६० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अनेक बनावट शिक्षकांची नोंद करून वेतन आणि थकबाकीची रक्कम काढण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे.

    या घोटाळ्याचा तपास सुरू असून, आणखी काही शिक्षणाधिकारी, संस्थाचालक आणि संबंधित व्यक्तींची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे. SITकडून पुढील काळात आणखी मोठ्या कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    कष्टकरी कुटुंबातून मुंबई कोर्टापर्यंत; भगवान नन्नवरे यांची प्रेरणादायी वाटचाल

    August 11, 2026

    शालार्थ घोटाळ्याचा जळगाव कनेक्शन धक्कादायक! ६६ संस्था, ८४९ जण संशयाच्या भोवऱ्यात

    August 11, 2026

    राष्ट्रीय महामार्गांच्या हद्दीत नवीन ढाबे, हॉटेलला ब्रेक; अनधिकृत बांधकामे ६० दिवसांत हटवण्याचे आदेश

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.