Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळा; मनोजसह तीन मराठा नेते SITच्या रडारवर?
    क्राईम

    बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळा; मनोजसह तीन मराठा नेते SITच्या रडारवर?

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 29, 2026Updated:July 29, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    विजय पाटील : लाईव्ह महाराष्ट्र न्युज : बहु चर्चित शालार्थी आयडी घोटाळ्यात मराठा समाजाचे नेते तथा शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय गरुड यांना अटक झाली आहे यांच्या पाठोपाठ सहकार क्षेत्रातील डॉन जळगाव शहरात व ग्रामीण वर हात ठेवणारे नेतृत्व म्हणजेच मनोज हा देखील लवकरच या घोटाळ्यात अडकणार आहेत. मनोज पाठोपाठ पारोळा व मुक्ताईनगर येथील मराठा समाजाच्या दोन मातब्बर नेत्यांची विकेट पडणार आहे.

    शालार्थ आयडी घोटाळा चौकशी एसआयटी मार्फत सुरू असून यात बहुतेक मराठा समाजाचे नेते मंडळी अडकलेले आहे. संजय गरुड यांनी लोकसभेच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर या शालार्थ या आयडी घोटाळ्यात संजय गरुड हे गळाला लागलेले आहेत. त्यांना सोलापूर येथील एका फार्म हाऊस मधून अटक करण्यात आली आहे आता दुसरी विकेट मराठा समाजाचे मनोज यांची पडणार आहे.

    मनोज यांनी गेल्या सहा महिन्यापासून किंवा वर्षभरापासून एका राजकीय नेत्याच्या स्वीय सहाय्यक ला हाताशी धरून अटकेची टांगती तलवार लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु या प्रकरणात खोलवर पाय अडकल्यामुळे मनोजची विकेट पडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

    माजी शिक्षणाधिकाऱ्याकडून या संदर्भात सर्व माहिती पथकाला मिळाली असल्याने अधिक या घोटाळ्याचे जाळे विणले गेले आहे. सहकारात नेते असलेले मनोज हे आता दक्षिण भारतात असल्याचे समजते. पारोळा व मुक्ताईनगर येथील मराठा समाजाचे दोन नेते या बहुचर्चित घोटाळ्यात अडकले असून त्यांचे पाय देखील खोलात जाण्याची शक्यता आहे व पाचोरा येथील देखील जे दोघं शिक्षण संस्थाचालक आहेत ते देखील मराठा समाजाचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    १६० कोटींच्या बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात माजी शिक्षणाधिकारी अटकेत; SITच्या तपासाला मोठे यश

    July 28, 2026

    भंगाळे गोल्डच्या नियमबाह्य जाहिरातींवर अखेर मनपाची कारवाई

    July 28, 2026

    शालार्थ आयडी घोटाळा; मास्टरमाईंड मनोज अडचणीत, कारवाईचे संकेत

    July 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.