लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. पोटच्या मुलीवर नराधम बापाने अत्याचार केल्याचा प्रकार खेड तालुक्यात घडला आहे. राजगुरूनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने शुक्रवारी (दि. १२) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. खेड तालुक्यातील दुर्गम गावात १३ वर्षीय मुलीवर वडिलांनी अत्याचार केल्याची घटना घडली होती.पीडित मुलगी इयत्ता आठवीत शिकत आहे. कुटुंबातील आई भाऊ बाहेरगावी गेले असताना दारूच्या नशेत रात्री नराधम वडिलांनी आपल्या मुलीवर अत्याचार केला. लहान भावाशेजारी झोपलेल्या मुलीला दुसऱ्या खोलीत नेऊन नराधम पित्याने जीवे मारण्याची धमकी देत मुलीवर अत्याचार केला. मुलगी व आईच्या तक्रारीनंतर ११ फेब्रुवारीला आरोपीला खेड पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून तो येरवडा तुरुंगात आहे. खेड…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल चोपडा- प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील वेले येथे वेल्डिंग दुकानदाराची ३० हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनमचंद गुलाबचंद बडगुजर (वय-५५) रा. अरुण नगर, ता. चोपडा हे वेल्गिकचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे तालुक्यातील वेले येथे वेल्डिंगचे दुकान आहे. दुकानावर जाण्यासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ एबी ४२०९) आहे. नेहमीप्रमाणे ११ ऑगस्ट रोजी पुनमचंद बडगुजर हे कामावर दुचाकीने गेले. त्यांनी दुचाकी त्यांच्या दुकानासमोर पार्किंगला लावली होती. अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी चोरून नेली, त्यांनी सर्वत्र शोध…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील ट्रान्सपोर्ट नगरातील प्रीतम पार्क येथे मोकळ्या जागेतील भंगाराला अचानक आग लागल्याची घटना शुक्रवार १२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता घडली. अग्निशमन पथकाच्या वतीने ही आग विझविण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील ट्रान्सपोर्ट नगरातील प्रीतम पार्क हाटेलच्या बाजूला जुन्या गाड्या रिपेअरींगचे कामे केली जातात. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर भंगार ठेवण्यात आले आहे. शुक्रवार १२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास येथील भंगाराला अचानक आग लागली. आग लागल्याचे कारण समजू शकले नाही. या आगीची माहिती मिळाल्यानंतर जळगाव महापालिकेचे अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाले. काही वेळात ही आग विझविण्यात आली. आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाचे चालक विक्रांत…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: इतर विद्यापीठाप्रमाणे पदवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट गुण देवून पास करण्यात यावी या मागणीसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा समोर युवा सेनेच्यावतीने शुक्रवार १२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ठिय्या आंदोलन करण्यात आले. कुलगुरू व्ही.एल. माहेश्वरी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा नुकत्याच पार पडल्या आहेत. या सत्रात प्रश्नपत्रिकेमध्ये अनेक प्रकारे त्रुटी आढळून आल्या, प्रश्नपत्रिकेच्या छपाईमध्ये घोळ, या त्रुटींबाबत विद्यार्थ्यांनी युवा सेनेमार्फत निवेदन दिले होते. मात्र, विद्यापीठ प्रशासनाकडून याचे कोणतीही दखल घेण्यात आली नाही. यामुळे शुक्रवार १२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता युवा सेनेतर्फे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारात ठिय्या…
जामनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल जामनेर प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील एका १८ वर्षीय तरुणीची बदनामी होईल असे नाव गोंदलेले दाखवून तिची बदनामी व विनयभंग केला. तर याचा जाब विचारला असता तरूणीसह तिच्या कुटुंबीयांना धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. यासंदर्भात जामनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामनेर पोलीस यांनी दिलेल्या माहितीनुसार. तालुक्यातील एका गावात १८ वर्षीय तरुणी ही आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. दरम्यान गावातील अभय संभाजी वंजारी याने अंगातील शर्ट काढून त्याचे छातीवर पीडित मुलीचे नाव गोंदलेले दाखवले व असा फोटो स्टेटसवर ठेवून तिची बदनामी केली आणि विनयभंग केला. पिडीत तरूणीने याचा जाब विचारला पीडित तरूणीसह तिच्या…
यावल प्रतिनिधी । शहरातील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली १२ ऑगस्ट २०२२ रोजी ग्रंथालयाचे शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस’ साजरा करण्यात आला. यानिमित्त कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एम.डी. खैरनार, प्रा.ए.पी. पाटील व प्रा संजय पाटील यांच्या हस्ते डॉ.एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अपर्ण पूजन करण्यात आले. उपप्राचार्य प्रा.एम.डी. खैरनार यांनी ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या व्यक्तित्वावर व त्यांच्या कार्याबद्दल सखोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन संतोष ठाकूर यांनी केला. याप्रसंगी डॉ.एस.पी. कापडे, डॉ.आर.डी. पवार, डॉ.पी.व्ही. पावरा, मुकेश येवले, मिलिंद बोरघडे,…
मारवड पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल अमळनेर- प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील खेडी ते गोवर्धन रस्त्यावर एकाला रस्ता अडवून जुन्या भांडणाच्या कारणावरून बेदम मारहाण करून विषारी औषध घेऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या संदर्भात मारवड पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, योगेंद्र शिवाजी उदागे (वय-२८) रा.पाथर्डी जि. अहमदनगर ह.मु. मांडळ ता. अमळनेर हा आपल्या कुटुंबियांचे वास्तव्याला आहे. दरम्यान जेसीबीचे काम करून ती आपला उदरनिर्वाह करतो. ६ ऑगस्ट रोजी जुन्या भांडणाच्या कारणावरून रमेश रामचंद्र धनगर, दिपक दगडू धनगर, दगडू रामचंद्र धनगर सर्व रा. मांडळ ता. अमळनेर आणि किशोर धनगर…
माणुसकीला काळीमा फासणारी घटना लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगावमधील ग्रामीण रुग्णालयामध्ये घडली. नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेला प्रसूती काळात आलं.आधार कार्ड नाही म्हणून ग्रामीण रुग्णालयातून चक्क परत पाठवण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. महिलेला प्रसूतीसाठी नाकारणाऱ्या ग्रामीण रुग्णालयातील सरकारी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते. अर्चना सोळंके असं या गर्भवती महिलेचं नाव आहे. मंगळवारी ही घटना घडली यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात सदर महिला प्रसूती कळा सुरु झाल्या म्हणून दाखल झाली. पण आधार कार्ड नसल्यानं तिच्यावर उपचार करण्यास डॉक्टरांनी नकार दिला. तसंच गरिबीमुळे या महिलेकडे पैसेही नव्हते. अत्यंत गरीब आणि हलाखीच्या परिस्थितीत असताना या महिलेला मदत करायची सोडून या महिलेला…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज विशेष प्रतिनिधी : पुण्यात तळेगाव दाभाडे येथील इंद्रपुरीमध्ये राहणाऱया खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. महिलेच्या तिच्या शवविच्छेदनाच्या अहवालातून माहिती समोर आली आहे, अशी माहिती देहूरोड पोलिसांनी दिली. संगीता भोसले (वय 38, रा. मंत्रा सिटी, तळेगाव दाभाडे) असे मृत महिलेचे नाव आहे. संगीता भोसले या सकाळी साडेआठच्या सुमारास इंद्रपुरी येथील भंडारी व्हिला जवळ रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या आढळल्या. अपघात झाला असावा, असे समजून त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले होते. पण, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘संगीता भोसले या सकाळी आई-वडिलांच्या घरी जात असताना अज्ञात व्यक्तीने धारदार हत्याराने गळ्यावर वार केल्याचे दिसून येते. त्यानुसार…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: नाशिकमध्ये पवन नगर येथे एका चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे. पहिल्या मजल्यावरुन पडून १८ महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय. चिमुकलीच्या आईवडिलांवर मोठा आघात झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे. नाशिकच्या पवन नगर ज्योती अपार्टमेन्ट मध्ये हळहळ व्यक्त केली जाते. समृद्धी राहुल खैरनार असे मृत चिमुकलीचे नाव आहे. बाल्कनीत खेळत असताना समृद्धीचा तोल गेला आणि समृद्धी पहिल्या मजल्यावरुन खाली पडली. यावेळी तिचे आईवडील घटनास्थळी नसल्याचे बोलले जात आहे. यामुळे ती पडल्यानंतर लगेच तिला उपचार केले असते तर जीव वाचली असता. घटनेमुळे राहुल खैरनार आणि खैरनार कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या मुलाचे आई-वडील नेमके कुठे होते,…

