Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

अधिवेशनात आज शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार विरोधकांना टोले लगावले. शिंदे यांनी विरोधकांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तर दिले, टीकेलाही प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या ऑफरवरही शिंदे यांनी जोरदार उत्तर देत टोला लगावला जयंत पाटील यांनी बुधवारी सभागृहात चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासंबधी केलेल्या विधानाचा संदर्भ देत शिंदेंना डिवचले आहे. मनावर दगड ठेवून शिंदे यांना मुख्यमंत्री केले त्यावर जयंत पाटील म्हणाले होते, भाजपने शिंदे यांना मुख्यमंत्री केले असेल तर कुठलीही भानगड न ठेवता आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होण्याची संधी देऊ. तुमच्यातील गुण पाहता तसे करण्यास कोणीही नकार देणार नाही, असे मिश्किल भाष्य…

Read More

सोनके येथे पंढरपूरहून सकाळी १२ वाजता आटपाडीकडे जाणारी एसटी बसला ट्रकने जोराची धडक दिली. घडलेला अपघात तेवढा भयानक होता की, अपघातात एसटी बसमधील दोन प्रवाशी जागीच ठार झाले असून ६ जण जखमी झाले आहेत. अपघातात एसटी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंढरपूरहून आटपाडीकडे जाणाऱ्या एसटी बसला समोरून येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली. या अपघातात ट्रकच्या व एसटीच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात दोन प्रवाशी जागीच ठार झाले असून ६ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पंढरपूर ग्रामीण पोलिस दलाचे निरीक्षक धनंजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अपघातातील जखमींना उपचारासाठी रूग्णालयात हलविले. मागील काही…

Read More

विधानभवन परिसरात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या वादविवादामुळे चांगलाच गाजला. पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. यात आज शेवटच्या दिवशी सरकारमधील शिंदे गटाने थेट ठाकरे कुटुंबियांना टार्गेट केले आहे. घोषणाबाजीवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधीमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी शिंदे गटाच्या आमदारांनी थेट आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी आदित्य ठाकरे यांचे व्यंगचित्राचे बॅनर झळकवत शिंदे गटाच्या आमदारांनी घोषणाबाजी केली. बॅनरवर आदित्य ठाकरे यांचा परमपूज्य (प.पु) असा उल्लेख करत त्यांचा चांगलाच समाचार घेतल्याचे दिसून आले. शिंदे गटातील आमदारांनी आदित्य ठाकरेंचे कार्टून असलेला बॅनर सभागृहाबाहेर झळकवत जोरदार घोषणाबाजी केली होती. युवराजांची नेहमीच दिशा चुकली, महाराष्ट्राचे परमपूज्य…

Read More

मंत्रीपद मिळवण्यासाठी गद्दारांची माझ्याविरोधात घोषणाबाजी सुरू असल्याचे आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. मंत्र्यांना बंगले दिलेत जिल्हे का नाही? . पालकमंत्री आज गरजेचे पण गद्दार सरकारचं लक्ष स्वतःवरच आहे जनतेवर नाही, अशी सडकून टीका देखील आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. विधानभवनाच्या पायऱ्यांवर सुरू असलेल्या शिंदे गटाच्या बॅनेरबाजीवर आदित्य ठाकरे विधानभवनाच्या बाहेर पत्रकारांशी बोलत होते. आमच्या झालेल्या कामांच्या चौकशीवर भाष्य करताना दिलखुलासपणे चौकशी करा आनंद आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या गोष्टी करतात आणि दुसरीकडे मातोश्रीवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे. ज्या बाळासाहेबांच्या मुलाने सर्व काही दिलं त्याच्या पाठित खंजीर खुपसायचा. त्यामुळे यांच्यासाठी ‘गद्दार’हा शब्दच योग्य आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.…

Read More

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ट्रान्सजेंडरबाबत मोठा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत ट्रान्सजेंडरलाही आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे . केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी सांगितले की, देशभरात सुमारे ४लाख ८९ हजार ट्रान्सजेंडर असून या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी नियमांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. यासाठी नियमांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. पंतप्रधानांची विचारसरणी सर्वांच्या विकासासोबत असून समाजातील प्रत्येक घटकाला शासनाच्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, असे ते म्हणाले. योजना भारत सरकारची आरोग्य विमा संरक्षण योजना आहे. आयुष्मान भारत योजना केंद्र सरकारने 2018 मध्ये सुरू केली होती. परंतु आता यात बदल करून तृतीय पंथाना यांचा लाभ घेता येईल. 18 वर्ष पूर्ण…

Read More

उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्याचे गृह विभाग लवकरच सात हजार पोलिसांच्या भरतीचे आदेश देणार आहे . विधानसभेत लक्षवेधी प्रस्तावावर फडणवीस म्हणाले की, राज्यातील विविध शहरांमध्ये पोलिस खात्यात मनुष्यबळाची उणीव भासत आहे. मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईतील अवैध धंद्यांबाबत लक्षवेधी सूचना मांडली. नवी मुंबई परिसरात सुरू झालेल्या अवैध धंद्याची चौकशी करून वरिष्ठ अधिकारी दोषी आढळल्यास त्यांना जबाबदार धरण्यात येईल, असे गृहमंत्र्यांनी सांगितले. कोणत्याही शहरातील कोणताही अधिकारी एकाच पदावर जास्त काळ राहू नये, याचीही काळजी घेतली जाणार असल्याचे समोर आले. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी फडणवीस सरकारने…

Read More

नाशिक शहरातील सिन्नर गावठा परिसरातील विठ्ठलेश्वर मंदिराजवळ जुगार खेळत असताना मंगळवारी (दि. 23)पोलिसांनी पाच जणांवर सिन्नर कारवाई केली. कारवाईत सुमारे 6 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. नाशिक मधे गावठा परिसरातील विठ्ठलेश्वर मंदिराजवळ पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले. या महेंद्र वायचळे यांच्याकडून 1700 रुपये, अविनाश गवळी यांच्याकडून 1200 रुपये, गणेश लोणारे यांच्याकडून 900 रुपये, विलास पाचोरे यांच्याकडून 1300 रुपये, आतिष भाटजिरे यांच्याकडून 1100 रुपये असा 6 हजार 200 रुपयांचा मुद्देमल, 52 पत्त्यांचे घोड्याचे चित्र असलेले मोकळे पाने पोलिसांनी जप्त केली. याबाबत पोलिस शिपाई बाळू साळवे यांनी…

Read More

नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी येथील आश्रम शाळेतील मुलांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. विषबाधा होऊन मतिमंद मुलांच्या आश्रम शाळेतील काही त्यातून दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. अन्य चार मतिमंद विद्यार्थी गंभीर असल्याचे समोर आले आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी येथील मतिमंदांचे निवासी आश्रमशाळेत काल रात्रीच्या जेवणात त्यांना खिचडी देण्यात आली होती. पहाटे पाच वाजण्याच्या सुमाराला तेथील विद्यार्थ्यांना अस्वस्थ वटू लागले. त्रास झालेल्या विद्यार्थ्यांना इगतपुरीच्या रूग्णालयात नेण्यात आले. तेथे दोन मुलांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही विषबाधा नेमकी कशातून झाली हे अजून समजलेले नाही. अन्न किंवा पाण्यातून त्यांना ही बाधा झाली असण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

Read More

पहिलेच पावसाळी अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकार आजचा चौथ दिवस असून, विधानसेभेच्या पायऱ्यांवर आंदोलनावेळी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये गदारोळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादीचे नेते महेश मिटकरी आणि महेश शिंदे यांच्यामध्ये हा राडा झाल्याने समोर आले आहे. सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात आंदोलन केले. त्याचवेळी विरोधकदेखील पायऱ्यांवर घोषणाबाजी चालू होती. अचानक एकनाथ शिंदे गटातील महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांच्या सुरुवातीला शाब्दीक वाद झाले आणि त्यानंतर हे प्रकरण थेट धक्काबुक्कीपर्यंत गेले. दरम्यान, अजित पवार यांनी समजुतीचा मार्ग काढत सुरू असलेला वाद थांबवला. या वादात अमोर मिटकरी यांनी महेश शिंदे यांची कॉलर पकडली असल्याचे दिसून आले. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मिटकरांनी…

Read More

अतिवृष्टी व पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील महानगरपालिका अंतर्गत रस्ते, ग्रामीण मार्ग व गावांतर्गत असणारे रस्ते अत्यंत खचले आहेत. करता हसनमुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे तर या जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर खच्चीकरण झाल्याने योग्य निधी उपलब्ध करून देण्याचे मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांचीही मोठी गैरसोय होत असल्याने सदर रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक आहे. आमदार पी. एन. पाटील, ऋतुराज पाटील, हसन मुश्रीफ, राजूबाबा आवळे, प्रा. जयंत आसगावकर यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन देण्यात आले. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाच्यावतीने कोल्हापूर महापालिकेसाठी ५० कोटी, इचलकरंजी पालिकेसाठी २५ कोटी आणि जिल्ह्यातील अन्य रस्त्यांसाठी १०० कोटी असा एकूण १७५…

Read More