सर्व शासकीय योजनांसह इन्शूरन्स आणि कॅसलेस सुविधा उपलब्ध जळगाव प्रतिनिधी । शिरसोली रोडवरील श्री. गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालीटी ॲण्ड आयुष हॉस्पीटलमध्ये अल्पदरात महत्वाच्या वैद्यकीय तपासणी व शास्त्रक्रीया उपलब्ल करून देण्यात आले आहे. यासाठी गरजूंनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पीटलच्या प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. अश्या राहणार सुविधा अतिदक्षता विभाग, स्त्री रोग व प्रसुती विभाग, अस्थिरोग विभाग, नेत्ररोग विभाग, सर्जरी विभाग, बालरोग विभाग, मुत्र रोग विभाग, सीटी स्कॅन, एक्स-रे, सोनीग्राफी, पॅथोलॉजी यांच्यासह अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे. मोठी शास्त्रक्रीया असल्यास शासकीय योजना, इएसआयसी, पंतप्रधान आरोग्य योजना, कॅसलेस सुविधा उपलब्ध करून देण्यात आले असल्याने रूग्णावर तातडीने उपचार केले जाणार आहे.…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
मुक्ताईनगर प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यात एका महिलेचा निर्घृण खून करून तिचा मृतदेह प्लॉस्टिकच्या पिशवीत बांधून फेकून दिल्याचा ध्ककादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसर हादरला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर ते बर्हाणपूर महामाार्गवर संतमुक्ताई साखर कारखान्याच्या पुढे कुंड गावाजवळ असणार्या पुलाच्या खालील बाजूला आज सोमवारी २९ ऑगस्ट रोजी एका महिलाचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. विशेष बाब म्हणजे तिची अतिशय क्रूरपणे हत्या केल्यानंतर त्या महिलेचा मृतदेह हा जाड प्लॅस्टीकच्या पिशवती भरून तिथे टाकल्याचे आढळून आले. संबंधीत महिलेची ओळख पटली नसून तिचे वय साधारणपणे ४० ते ४५ वर्षाच्या दरम्यान असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांना…
जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांची प्रचंड गर्दी जळगाव प्रतिनिधी । रेस लावलेल्या भरधाव कारने सायकलवर जाणाऱ्या ११ वर्षीय मुलाला उडविल्याची धक्कादायक घटना दुपारी साडेतीन वाजता मेहरूण ट्रॅकजवळ घडली आहे. या अपघातातील तीन जणांना एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, विक्रांत मिश्रा हा आई व वडील यांच्यासह एकनाथ नगर येथे रहायला होता. विक्रांत हा मेहरून तलावाजवळील विद्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता चौथीत शिकत होता. आज रविवार 28 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजता वाजेच्या सुमारास त्याचा काकाचा मुलगा सुनील जितेंद्र मिश्रा यांच्यासोबत मेहरून ट्रॅकवर सायकलवर फिरण्यासाठी गेला होता. दरम्यान त्याचवेळी मेहरून ट्रॅकवर दोन कार यांची रेस लावण्यात होती.…
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी झालेला राडा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. विधानभवनात अमोल मिटकरी आणि महेश शिंदे यांच्यात झालेल्या बाचाबाचीवरून बच्चू कडूंनी खोचक शब्दांत विरोधकांवर टीका केली आहे. बच्चू कडू यांनी विरोधकांवर निशाणा ५० खोके’ घोषणेवरून विरोधकांना थेट चॅलेंज दिले. अमोल मिटकरींना लक्ष्य करत बच्चू कडू म्हणाले, “मला तर वाटतं की काही लोक सभागृहात काहीच बोलत नाहीत आणि पायरीवर येऊन जोरजोरात बोंबलतात. पायऱ्यांवर कुणी बोललं आणि बॅनर छापले की त्याची ब्रेकिंग होते”. “५० खोके, एकदम ओके वगैरे घोषणा त्यांनी केली. तुम्हाला जर ५० खोके दिले असं वाटत असेल, तर कारवाई करा. असं नामर्दांसारखं वक्तव्य का करत आहात? मर्दानगी असेल,…
स्त्रिया आणि लहान मुलींवरीवरील लैंगिक अत्याचाराचे गुन्हे वाढत चालले आहे. गुन्हेगारांच्या मानसिकतेत कुठलाही बदल होत नसल्याचे दिसते. आजोबा आणि नातीच्या नात्याला काळीमा फासणारी अशीच एक घटना वर्धा शहरत 25 रोजी घडली आहे. 70 वर्षीय नराधम आजोबाने अवघ्या 7 वर्षीय चिमुकल्या नातीवर अत्याचार केला आहे.रामनगर पोलिसांनी याप्रकारणी नराधम आजोबाला अटक केली आहे. सात वर्षीय मुलगी रामनगर हद्दीत तीच्या आईच्या आई वडीलांकडे राहत आहे. महिलेच्या पतीचा दोन वर्षांपूर्वी सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला. 25 रोजी रात्रीच्या सुमारास सगळे घरी असताना अचानक चिमुरडीच्या आजीचा ओरडण्याचा आवाज आला. चिमुरडीच्या आईने धाव घेतली असता आपल्याच पोटच्या मुलीवर वडिलांना अत्याचार करताना पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. नराधम…
श्रावण वद्य अमावस्या बैलपोळा म्हणून ओळखला जातो. बैलपोळा, नंदी पोळा आणि बेंदूर असे तीन वेगवेगळे प्रकार आहेत. नंदी किंवा नंदीबैल पूजनिय असतो. त्याचे कारण म्हणजे तो शिवाचे वाहन आहे. शिवाचे वाहन असणारा नंदी हा पुढे मार्तंड भैरवरूप खंडोबाचे वाहन घोडा झाला. ग्रामीण भागात बैलपोळा हा शेतकर्यांच्या दृष्टीने अतिशय उत्साहाचा सण आहे. अमावस्येच्या आदल्या दिवशी खांदमळणीचा कार्यक्रम असतो. पळसाच्या द्रोणात कढी घेऊन ती बैलाच्या खांदयावर मळण्यात येते त्याला खांदमळणी असे म्हणतात. या दिवशी शिंगे साळून त्याला हुंगुळ लावण्याची प्रथा आहे. आंबाडीचे सुत काढून त्याची वेसन नविन बैलाच्या नाकात घातली जाते. नविन घुंगर माळा, नविन झुल वेगवेगळया प्रकारचे हिंगुळ बैलाच्या शिंगांना लावून…
नागपूरच्या बुट्टीबोरी ते गुमगाव येथे किरकोळ वादातून रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशाला धावत्या रेल्वेतून ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या शेख अकबर या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. अकबर नावाचा प्रवासी नागपूरकडे निघाला होता. जनरल डब्ब्यात मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने हे सर्व तरूण दराजवळ उभे होते. रेल्वे प्रवासात अकबरचा पाय दुसऱ्या प्रवाशाला लागला. बाचाबाचीत वाद टोकाला पोहोचला संतप्त प्रवाशाने अकबरला धावत्या ट्रेनमधून फेकून दिले. यामध्ये अकबर याचा मृत्यू झाला असून, अकोल्यातील काही तरूण नागपूर येथील उरुसासाठी गरिबरथ रेल्वेने निघाले होते. ही बाबत अकबर याच्या सोबत असलेल्या मित्रांनी रेल्वे पोलिसांना दिली असता पोलिसांनी…
उत्तर प्रदेशातील शाहजहापुरमध्ये डिलिव्हरी बॉयने फाटलेली नोट घेण्यास नकार दिला हा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेनंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे. सचिन कुमार हा टाऊन हॉलच्या विलंका कॅफैमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. कॅफेमध्ये काम करणाऱ्या पिझ्झा-बर्गरच्या ऑर्डरची डिलिव्हरी पोहोचविण्यासाठी तो ग्राहकाच्या घरी पोहोचला होता. यावेळी त्याच्यासोबत सहकारी रितिकदेखील होता. दोघेही बुधवारी रात्री 12 वाजता जलालनगर निवासी नदीमच्या घरी डिलिव्हरी देण्यासाठी पोहोचले. रितिकने दिलेल्या माहितीनुसार, सचिनला डिलिव्हरीचे 197 रूपये घ्यायचे होते. आरोप आहे की, नदीमने त्याला 200 रुपयांची फाटलेली नोट दिली. फाटलेली नोट घेण्यास नकार दिल्यानंतर नदीम आणि त्याचा भाऊ संतापले. दोघेही शिवीगाळ…
कोविडच्या निर्बंधानंतर राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन यशस्वीरित्या आणि पूर्णवेळ पार पडले आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशन आज अखेरीस संपले आहे. या अधिवेशनात राज्याच्या हिताचे विविध निर्णय झाले. . 9 दिवसांमध्ये 6 दिवसाचे कामकाज झालं. तसेच पुढील हिवाळी अधिवेशनाची तारीखही निश्चित झाली असून नागपूरमध्ये घेण्यात येणार आहे. अधिवेशनात महत्त्वपूर्ण अशी विधेयके मंजूर करण्यात आली. त्यानुसार, एकूण 10 विधेयके मंजूर करण्यात आली. तसेच विविध विभागांच्या 25 हजार 826.72 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी देण्यात आली. तसेच हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर येथे घेण्यात यावं अशी शिफारस राज्यपालांना करण्यात आली. 1) भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाबाबत अभिनंदन प्रस्ताव 2) नवनियुक्त राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील निवृत्ती नगर परिसरात रात्री १२ वाजेच्या सुमारास तरुणाचा खून करण्यात आला होता. त्या हत्येप्रकरणी दोन संशयीतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज सकाळी साडेसात वाजता पुणे येथून अटक करण्यात आली आहे. यात संशयित आरोपी मनिष नरेंद्र पाटील (रा. अहमदाबादवाडा आव्हाणे ता. जि. जळगाव आणि भुषण रघुनाथ सपकाळे (रा. डॉ. आंबेडकर पुतळयामागे खेडी खुर्द ता. जि. जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या दोन संशयीतांची नावे आहेत. सविस्तर वृत्त असे की, शहरातील निवृत्ती नगरात दि. २३ रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास वाळू व्यवसायिक असलेल्या भावेश उत्तम पाटील या तरुणाची तिक्ष्ण हत्याराने खून करण्यात आला होता. या हत्येप्रकरणी तपासात निष्पन्न झालेल्या दोघा संशयितांच्या…

