Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जुन्या वादातून एकाला विषारी औषध देवून मारण्याचा प्रयत्न
    अमळनेर

    जुन्या वादातून एकाला विषारी औषध देवून मारण्याचा प्रयत्न

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 12, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मारवड पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल

    अमळनेर- प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील खेडी ते गोवर्धन रस्त्यावर एकाला रस्ता अडवून जुन्या भांडणाच्या कारणावरून बेदम मारहाण करून विषारी औषध घेऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या संदर्भात मारवड पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, योगेंद्र शिवाजी उदागे (वय-२८) रा.पाथर्डी जि. अहमदनगर ह.मु. मांडळ ता. अमळनेर हा आपल्या कुटुंबियांचे वास्तव्याला आहे. दरम्यान जेसीबीचे काम करून ती आपला उदरनिर्वाह करतो. ६ ऑगस्ट रोजी जुन्या भांडणाच्या कारणावरून रमेश रामचंद्र धनगर, दिपक दगडू धनगर, दगडू रामचंद्र धनगर सर्व रा. मांडळ ता. अमळनेर आणि किशोर धनगर रा. फागणे ता.जि. धुळे यांनी मिळून खेडीपासून ते गोवर्धन रस्त्यावर योगेंद्र याचा रस्ता अडविला. दरम्यान जुन्या भांडण कारणावरुन त्याला मारहाण करून विषारी औषध पाजून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात योगेंद्र उदागे यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलीस ठाण्यात ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    वनहक्कांच्या मागण्यांसाठी आंदोलन; जिल्हापेठ पोलिसांत तीन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद

    October 21, 2026

    टक्कल करून, वेश बदलून पोलिसांना गुंगारा; अखेर एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने संशयिताला पकडले!

    October 21, 2026

    अमळनेर हादरले : दोन वेगवेगळ्या घटनांत महिलांचा मृत्यू !

    October 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.