Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील विटनेर गावातून मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी पशूधनाची चोरी केल्याची घटना सकाळी उघडकीला आली आहे. याबाबत पोलीसात अद्याप कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. याबाबत अधिक माहिती अशी , एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या म्हसावद पोलीस दुरक्षेत्र हद्दीच्या अतंर्गत असलेल्या जळगाव तालुक्यातील विटनरे गावातून मंगळवारी १६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १ ते२.३० वाजेच्या सुमारास गुरांची चोरी झाली. हा प्रकार बुधवारी १७ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीला आला. गेल्या अनेक दिवसांपासून विटनेगा गावासह म्हसावद पोलीस दुरक्षेत्र हद्दीत चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. विटनेर गावातील भवानी नगरात राहणारे सेवानिवृत्त पोस्टमन सुभाष गिरीधर जाधव यांच्या मालकीचे दोन गुरे चोरीस गेल्याचे निदर्शनास आले आहे. वारंवार होत असलेल्या…

Read More

महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण झाल्याने ज्येष्ठ नागरिकांनसाठी हा निर्णय घेण्यात आला. आज या मंत्रिमंडळाची बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यापैकीच एक निर्णय म्हणजे पंच्चाहतरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवास करता येणार आहे. तसेच राज्य सरकारमधील कर्मचाऱ्यांचा तीन टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. पंच्चाहतरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवास स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्याबसेस मधून मोफत प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

Read More

जळगाव प्रतिनिधी| औरंगाबाद शहरात एक धक्कादायक घटना समोर आली. एका युट्यूब पत्रकाराने तरुणीचा खून करून मृतदेह घेऊन जात असतांना परिसरातील नागरिकांनी घरात रक्ताचा सडा पाहता आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अंकिता श्रीवास्तव असे मृत महिलेचा नाव असून, सौरभ लाखे असे आरोपीचे नाव आहे. सौरभ आणि अंकिता यांचे प्रेमप्रकरण होते. सौरभ हा औरंगाबादच्या शिऊर गावी राहायचा. तसेच तो एका युट्यूब चैनलला पत्रकार म्हणून काम करायचा. प्रेम प्रकरणातून हा खून झाला असल्याचे बोलले जात आहे. सौरभ हा तीन दिवसांपूर्वी अंकिताच्या रूमवर आला होता. त्यावेळीच त्याने खून केला असल्याचा संशय आहे. कारण गेली तीन दिवस या रूमला बाहेरून कुलूप लावलेला होता.तरुणीची गळा चिरून…

Read More

जळगाव प्रतिनिधी | भुसावळ शहरातील सातारा चौकातील रस्त्याची अत्यंत बेकार अवस्था झाली आहे. या ठिकाणी प्रचंड खड्डे पडल्याने नागरिकांना वाहन काढण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागतो. यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. याकरिता धिरज पाटील यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्याकडे तात्कळ रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. जामनेर रोडवरून जळगाव रोडवर येण्यासाठी जुना सातारा मुख्य चौकातून वाहतूक होत आहे. भुसावळातील हंबर्डीकर चौक ते लोखंडी ब्रिज रस्ता काँक्रिटीकरण कामामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. सतत चालू असलेला वाहतूक मार्ग यावल, रावेरकडे जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने या रस्ते निकामी झाले. सर्व प्रकारची अवजड वाहनेसुद्धा याच चौकातून वाहतूक करीत आहे.…

Read More

नेहमीच वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चर्चेत असणारे अभिनेते शरद पोंक्षे यांनी नुकतेच व्याख्यानात आणखी काही वादग्रस्त विधानं केली होती. त्यावरून पोंक्षेंवर सर्वच स्थरातून टीका केली जात आहे. आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही टीका आज केली आहे. अमोल मिटकरी म्हणाले कि, शरद पोंक्षेंविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी देखील त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. शरद पोंक्षेंसारखे लोक अशी वादग्रस्त वक्तव्य फक्त प्रसिद्धी साठी करतात. “जो व्यक्ती राज्यभर नथुराम गोडसेच्या नाटकाचे प्रयोग करत फिरत असेल.तो हिंदूंना नपुंसक म्हणत असेल तरतो व्यक्ती मुळातच हिंसक असणार यात काही वाद नाही. हिंदू धर्म हा सहिष्णू धर्म आहे. हिंदू धर्माने सर्व जातींतील लोकांना सामंत…

Read More

शिरूर तालुक्यातील अपघातात काळाने कुटुंबावर केला घाला, पुणे-नगर महामार्गावर शिरूर तालुक्यात येथे भीषण अपघात झालाय यात एकाच कुटुंबातील पाच जण जागीच ठार तर एकजण जखमी झालाय. विरुद्ध दिशेने आलेल्या कंटेनर ने चारचाकी धडक दिली अपघातात मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातात सर्व कुटुंबातील अहमदनगर जिल्ह्यातील आवाने बुद्रुक येथील रहिवासी आहेत. अपघातात संजय मस्के(वय-५३)रामा मस्के(वय -४५)राजू मस्के-(वय ०७) हर्षदा मस्के (वय -०४),विशाल मस्के (वय-१६) मृत झाले असून साधना मस्के जखमी झाल्या आहेत. या मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. पुणे-अहमदनगर मार्गावर एक ट्र चुकीच्या बाजूने आला. ट्रक अचानक रस्त्याच्या मधे…

Read More

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. राज्यातल्या नव्या शिंदे फडणवीस सरकारचे हे पहिलंच अधिवेशन आहे. गेली अडीच वर्षे विरोधी बाकावर बसणारं भाजपा आता सत्ताधारी बाकावर बसलेलं पाहायला मिळाले. तर शिवसेनेतल्या अभूतपूर्व बंडानंतर शिंदे आणि ठाकरे दोन्ही गट आमनेसामने येणार आहेत. चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षाने टाकलेला बहिष्कार, वादग्रस्त नेते, आमदार, निर्णयांना दिलेली स्थगिती, ओल्या दुष्काळाची मागणी अशा सगळ्या कारणांमुळे यंदाचं अधिवेशन वाद होण्याची शक्यता आहे.एकनाथ शिंदे अधिवेशनासाठी दाखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिवेशनासाठी विधिमंडळात दाखल झाले आहेत. विरोधी पक्षनेते आदित्य ठाकरे येणार नसल्याच्या चर्चांदरम्यान त्यांनी विधिमंडळात हजेरी लावली आहे. आजपासून पावसाळी अधिवेशनात खरा मुख्यमंत्री कोण हे जनतेला दिसून आलंय, असा टोला…

Read More

माजी आमदार आणि शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाने पुन्हा एकदा नवीन धक्कादायक घटना घडलीय. महाराष्ट्रातील कामगीरी करणारा साहसी नेता गमावल्याने नव्या सरकार नाराज झाले आहेत. विनायक मेटेच्या गाडीला अपघात लवकर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं माहिती समोर आहे. विनायक मेटेच्या गाडीच्या अपघात झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. चालकाने ही लवकर मदत न मिळाल्याचं माहिती दिली. एक्सप्रेस वे वर एअर एम्ब्युलन्सची सुविधा लवकरच उपलब्ध आशक्यता आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे यंत्रणेची देखील कसून चौकशी केली जाणार आहे.मंत्री मंडळात देखील चर्चा झाली. राज्य सरकार लवकर या घटनेनंतर महत्त्वाचा निर्णय जाहीर करणार आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर…

Read More

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा हजरजबाबी विधानांमुळे अडचणीत देखील सापडल्याची उदाहरणं दिसून येतात. शिवसैनिकांना ठोकून काढा. शिवसैनिकांचे हात तोडा, तंगडी तोडा, आरेला कारे म्हणा, कोथडा काढा. अरे काय ही पद्धत?, असं अजित पवारानी टीका केली आहे. उद्यापासून होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार बोलत असताना अशाच एका प्रश्नावर त्यांनी दिलेलं उत्तरावर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. “शेतीच्या नुकसानाचे पंचनामे अनेक ठिकाणी प्रलंबित आहेत. विरोधी पक्ष कमकुवत असल्यामुळे शेतकऱ्यांना मदतीसाठी एवढी वाट पाहावी लागत आहे का?” असा पवारांनी टोला लगावला. “तुम्हाला कुणी सांगितलं विरोधी पक्ष कमकुवत आहे? त्यांच्यावर प्रभाव पाडायला आम्ही आता काय केलं…

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे वरिष्ठ आमदार आणि विधीमंडळाचे पक्षप्रतोद सुनील प्रभू यांना पत्र पाठवल्याने एकच खळबळ उडालेली आहे.प्रथमच शिवसेना नेत्यांशी संपर्क साधला आहे, तोही पत्राद्वारे. अनेक प्रश्न निर्माण झाले असून नक्की काय होणार र याकडे लक्ष लागले आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या चहापानाचे निमंत्रण या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला दिले आहे. शिवसेनेत उभी फूट पाडली असताना हे दोन्ही गट गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर अक्षरशः तुटून पडत आहेत. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. मात्र, अचानक मुख्यमंत्री म्हणून बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांनी प्रथमच पत्राद्वारे शिवसेना नेत्याशी संवाद साधला आहे. शिवसेनेचे पक्षप्रतोद प्रभू यांना अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथिगृहावर…

Read More