शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जळगाव शहरातील जोशी पेठ येथे दोन जणांना बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अखिल शहा रहीम शहा (वय-४३) रा.जोशी पेठ जळगाव हे आपल्या दोन मुलांचं वास्तव्याला आहे. शुक्रवार ९ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास काहीही कारण नसताना मोबीन शहा सलीम शहा आणि रईस शहा नसीर शहा यांना त्यांच्या गल्लीत राहणारे वसीम बागवान आणि शहादुल्ला बागवान (पूर्ण नाव माहित नाही) रा. जोशी पेठ यांनी शिवीगाळ व करून मारहाण करण्यास सुरुवात केली. याचा जाब अखिल शहा रहीम शहा…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव शहरातील असोदा रेल्वे गेट समोर तरुणाची २० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना ८ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सुरेश प्रकाश हजबन (वय-३८) रा. कला वसंत नगर आसोदा रेल्वे ₹गेट जवळ जळगाव हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गुरुवार ८ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते ४ वाजेच्या दरम्यान त्याची मोटरसायकल एमएच १९ बीटी ५६०४ ही दुचाकी अज्ञात चोट्याने चोरून नेल्याचे उघडकीला आले. दुचाकी चोरी केल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर सुरेश आजपण याने परिसरात दुचाकीचा शोध घेतला परंतु दुचाकी कुठेही आढळून न आल्याने…
जळगाव प्रतिनिधी : – तालुक्यातील शिरसोली येथील पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा मृत्यू झाला असून या दोन्ही कुटुंबियांची आज राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी भेट घेऊन सांत्वन केले. याप्रसंगी त्यांनी कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार रूपयांची वैयक्तीक मदत देखील केली. या संदर्भातील वृत्त असे की, तालुक्यातील शिरसोली येथील मुले हे जवळग असलेल्या धारागीर येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. यात निलेश राजेंद्र मिस्त्री (वय-१७) आणि श्रवण शिवाजी पाटील (वय-१५) या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे. या दोन्ही मुलांच्या पार्थिवावर काल सायंकाळी उशीरा अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ना. गुलाबराव पाटील हे काल मुंबईत…
जळगाव प्रतिनिधी : औरंगाबाद जिल्ह्यातील एकागावात झालेल्या सामूहिक बालात्कार संदर्भात चौकशी करून आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीचे निवेदन मुस्लिम शिष्टमंडळाने बुधवारी ७ सप्टेंबर रोजी दुपारी पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांना दिले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, औरंगाबाद जिल्ह्यातील एका प्रसार माध्यमातून जळगावात मुस्लिम मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची बातमी प्रसारित केली जात आहे. दरम्यान या बातमीची शहनिशा करून आरोपींवर कायदेशीर कारवाई करावी, जर सदरचे वृत्त खोटे असेल तर पोलीसी प्रशासनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देण्यात यावी अशी मागणी केली आहे. यासंदर्भात जळगाव शहरातील मुस्लिम शिष्टमंडळाने बुधवारी ७ सप्टेंबर रोजी दुपारी पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांना निवेदन दिले…
जळगाव (प्रतिनिधी) शहरातील राज वाईनमध्ये मुदतबाह्य (Expiry Date) बिअर आढळून आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कालबाह्य बिअर जप्त केल्या आहेत. या संदर्भात सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात अशोक किराणा जवळ राज वाईन नावाचे वाईन शॉप आहे. याठिकाणी काही तरुण दुपारी बिअर पीत होते. त्यातील एका तरुणाला बिअर पिल्यानंतर उलटी झाली. त्यानंतर त्यांनी बिअरच्या बाटलीवर बघितले तर ती मुदतबाह्य झालेली होती. त्यांनी लागलीच याची तक्रार केली. त्यानंतर भरारी पथकाचे सी.एच. पाटील, आनंदा पाटील, कर्मचारी दिनेश पाटील, धनसिंग पावरा, सत्यम माळी आणि मनोज मोहिती यांच्या पथकाने दुकानाची झाडाझडती घेतली. त्यात त्यांना अमस्टल…
शहरातील गणेश कॉलनी परिसरातून नांद्रा येथील दोन सख्ख्या बहिणींना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी मंगळवारी ६ सप्टेंबर रोजी दुपारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील नांद्रा येथील दोन बहिणी सोमवारी ५ सप्टेंबर रोजी सकाळी जळगावात कामाच्या निमित्ताने आलेल्या होत्या. यातील एक १५ वर्षाची तर मोठी बहिण ही १८ वर्षाची आहे. दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास गणेश कॉलनीतील एसएनडीटी महाविद्यालयाच्या समोरून रिक्षात बसल्या. दरम्यान, त्या रात्री उशीरापर्यंत घरीच परतल्या नसल्याने पालकांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी दुसऱ्या दिवशी मंगळवारी ६ सप्टेंबर रोजी जळगाव शहरात येवून जिल्हापेठ…
निमखेडी शिवारातील पाणी पाऊच फॅक्टरीजवळून वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर जळगाव तालुका पोलीसांनी पकडले आहे. याबाबत मंगळवारी ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निमखेडी शिवारातील पाणी पाऊच फॅक्टरजवळून ट्रॅक्टरमधून वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळाली. त्यानुसार कारवाई करण्याच्या सुचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या. मंगळवारी ६ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता पोलीसांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर पकडले. वाळू वाहतूकीबाबत कोणताही परवाना नसल्याचे दिसून आले. पोलीसांनी वाळूने भरलेले ट्रक्टर…
जळगाव प्रतिनिधी : चाकूचा धाक दाखवून २० वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना शहरात उघडकीस आली आहे. विनोद सुकलाल भोळे (रा.सदोबा नगर, जळगाव) याच्याविरुद्ध मंगळवारी शनी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. १ सप्टेबर रोजी रात्री ११ ते १२ या वेळेत ही घटना घडली आहे. पोलिसात दाखल फिर्यादीनुसार, पीडित तरुणी एका महाविद्यालय पदवीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. पंधरा दिवसापूर्वीच आईचे आजारपणामुळे निधन झाले. वडील एका ठिकाणी कामाला आहेत. १ सप्टेबर रोजी वडिलांची रात्रपाळी ड्युटी असल्याने ते कामावर गेले होते तर पीडिता एकटीच घरी होती. विनोद भोळे याच्याशी पीडित कुटुंबाचे घरोब्याचे संबंध असल्याने येणंजाणं सुरु होते. या काळात त्याची…
जळगाव : येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयातील श्री गणेशाचे आज सातव्या दिवशी जल्लोषात विसर्जन करण्यात आले. यावेळी देवकर फार्मसी कॉलेज व नर्सिंग कॉलेजच्या श्री गणेशाचे विसर्जन देखील जल्लोषात झाले. विसर्जनापूर्वी देवकर रुग्णालयाचे कार्यकारी संचालक विशाल देवकर यांच्या हस्ते श्री गणेशाची पूजा करण्यात आली. त्यानंतर बी ए एम एस, फार्मसी व नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी डीजेच्या तालावर ठेका धरत श्री गणरायाला जल्लोषात निरोप दिला. मेहरूण तलावावर सायंकाळी तीनही महाविद्यालयांच्या गणरायाचे भक्तिभावात विसर्जन करण्यात आले.
जळगाव प्रतिनिधी: शिक्षण संस्थेमध्ये असो इतर कुठल्याही संस्थेमध्ये उणीवा निश्चीत आहेत, एक दोन शिक्षक वाईट काम करतो, म्हणून सर्वच शिक्षक वाईट काम करतात असं नाही, शिक्षक हा देशाचा आधार आहे, तो मार्गदर्शक आहेत, त्याच्याबाबत कुणीही चुकीचं बोललेल नाही अशी प्रतिक्रिया पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिक्षक पुरस्कार सोहळ्यात सोमवारी ५ सप्टेंबर रोजी बोलतांना व्यक्त केली आहे. काही आमदारांनी आज जळगावातील एका कार्यक्रमात भाषण करतांना आजच्या शिक्षण व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिले. आमदारांनी व्यक्तीगत कुणावरही टीका केलेली नाही. काही ठिकाणी चुकीचं काम होत, असे आमदारांनी भाषणात म्हटलंय… एक ते दोन शिक्षक…

