चित्रकार दुर्गा तायडे यांच्या डॉट असलेले चित्र ठरले आकर्षक जळगाव येथील प्रतिष्ठीत पु.ना. गाडगीळ आणि सन्सच्या कलादालनात गुरुवार १ सप्टेबर २०२२ पासून ६३ व्या १५ दिवसीय कलाप्रदर्शनीची दिमाखदार सुरवात करण्यात आली. या कलाप्रदर्शनीने कला जगतात रमणाऱ्या सर्व कलाप्रेमीं मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष बाब म्हणजे चित्रकार दुर्गा तायडे यांनी अजिंठा लेणीवर काढलेले चित्र आकर्षण ठरले आहे. या कलाप्रदर्शनीच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ चित्रकार सतीश वर्मा, प्राचार्य रागिणी कला एवं संगीत महाविद्यालय, बुऱ्हाणपूर, श्री. अतुल मालखेडे प्राचार्य सप्तपुत ललितकला भवन, खिरोदा, मिलन भामरे, विभाग प्रमुख फाईन आर्ट डिपार्टमेंट मू.जे. महाविद्यालय, जळगाव, तसेच संदीप पोतदार, व्यवस्थापक पु.ना. गाडगीळ आणि…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव प्रतिनिधी : गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी चोपडा तालुक्यातील धानोरा येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या लाठीमारच्या निषेधार्थ सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना सोमवारी ५ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता देण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील धानोरा येथे गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी रविवारी ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी विसर्जन मिरवणुका निघाल्या. या मिरवणुकीत सहायक पोलीस निरिक्षक किरण दांडगे यांनी गावातील पाच तरूणांना किरकोळ कारणावरून गाडीत बसवून ठेवल्याने ग्रामस्थ नाराज झाले. यानंतर रात्री दहाच्या सुमारास किरण दांडगे यांनी मंडळांना वाजंत्री बंद करण्याचे निर्देश दिल्यानंतर मंडळाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी ठिय्या आंदोलन…
खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त देवकर रुग्णालयासोबत उपक्रम मुक्ताईनगर प्रतिनिधी : माजी महसूल मंत्री व राष्ट्रवादीचे नेते आ. एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (ता. ४) श्री गुलाबराव देवकर मल्टी स्पेशलिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालय तसेच राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर झाले. शिबिरात 525 जणांची तपासणी करण्यात आली. यावेळी ऍड रोहिणीताई खडसे यांनी शिबिरात आढळून आलेल्या रुग्णांवर देवकर रुग्णालयात 50 टक्के सवलतीच्या दरात उपचार केले जातील, असा शब्द रुग्णालयाचे संचालक व जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी दिला आहे. त्यामुळे शासकीय योजनांमध्ये न बसणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. रुग्णालयाचे जनरल सर्जन डॉ. रोहन पाटील म्हणाले की, आता कोणत्याही अवघडाने गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी…
कोसगावात गुलाबभाऊंचे अभूतपुर्व स्वागत ! यावल प्रतिनिधी: आपल्या आजवरच्या वाटचालीत हिंदुत्व हाच आधारभूत विचार राहिलेला असून याच राष्ट्रीयत्वाच्या विचारावर आपली वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. यावल तालुक्यातील कोसगाव येथे सत्कारासह विकासकामांच्या भूमिपुजनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांचे कोसगावात अतिशय भव्य स्वागत करण्यात आले. तर कोसगाव ते पाडळसे या गावाच्या डांबरीकरणासह गावात व्यायामशाळेला निधी देण्याची घोषणा ना. पाटील यांनी याप्रसंगी केली. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे आज यावल तालुक्यातील कोसगाव येथे अतिशय भव्य स्वागत करण्यात आले. गुलाब फुलांचा मोठा हार घालून त्यांचे…
जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील हरी विठ्ठल नगर येथे राहणाऱ्या २० वर्षे तरुणांनी राजमार्ती नगरातील एका अपार्टमेंटच्या सातव्या मजल्यावरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली आहे याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते कृष्णा सुधीर अहिरे लवय-20) राहणार हर विठ्ठल नगर असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कृष्णा अहिरे हा मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान आज रविवार ४ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास राजमालती नगरातील संस्कृती अपार्टमेंटच्या सातव्या मजल्यावरून ओळी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, कृष्णा अहिरे यांनी आत्महत्या…
लाईव्ह महाराष्ट्र : जळगाव शहरातील उद्योजन खुबचंद साहित्या यांनी गणेश मुर्तीकारांकडे कोणताही प्रकारे घासाघीस न करता शिल्लक राहिलेल्या सर्व गणेश मुर्ती खरेदी करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिला आहे. त्याच्या या उपक्रमामुळे सर्वत्र कौतूक होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील उद्योजक खुबचंद साहित्या यांनी विविध मूर्तीकारांकडे कोणत्याही प्रकारे किंमतीची घासाघीस न करता शिल्लक राहिलेल्या सर्व मूर्ती खरेदी केल्या. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी याआधी कधीही गणेशाची स्थापना केलेली नसतांना त्यांनी १००८ लहान, मध्यम व मोठ्या मूर्तींची रक्कम त्या-त्या विक्रेत्याला अदा केली. या प्रसंगामुळे काही विक्रेत्यांना अश्रू अनावर झाले. कारण, अनेकांनी व्याजावर रक्कमांची उचल केली होती. वॉटरप्रुफ टेंट, वाहतूक इत्यादीवर…
जळगाव प्रतिनिधी : शहरातील भाऊंच्या उद्यानासमोरून एकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामानंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास शेषराव देशमुख (वय-४९) रा. चंद्रमा अपार्टमेंट रामानंदनगर पोलीस स्टेशनसमोर जळगाव हे आपल्या कुटुंबीयांचा वास्तव्याला आहे. दरम्यान २७ ऑगस्ट रोजी विलास देशमुख हे त्यांची दुचाकी (एमएच २८ वाय ९३७७) ने काव्यरत्नावली चौकातील भाऊंचे उद्यानासमोर आले होते. त्यांनी भाऊंच्या उद्यानासमोर दुचाकी पार्किंग करून कामानिमित्त निघून गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांची ८ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली. त्यांचे काम आटोपून विलास देशमुख हे परत आल्यानंतर त्यांना जागेवर दुचाकी मिळाली नाही, गुरुवार १ सप्टेंबर…
लाईव्ह महाराष्ट्र : खासगी क्लासचा होमवर्क न केल्याने एका नऊ वर्षाच्या बालकाला शिक्षिकेने अर्धनग्न करून मारहाण केल्याचा भयंकर प्रकार शुक्रवार २ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता बळीरामपेठ येथील कोठारी क्लासेस सकाळी घडला आहे. याबाबत शिक्षिकावर शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. शनीपेठेतील गुरूनानक नगरातील रहिवाशी योगेश गणेश ढंढोरे (वय-३७) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचा ९ वर्षाच्या मुलाला बळीरामपेठ येथील कोठारी क्लासेस येथे खासगी क्लास लावलेला आहे. या ठिकाणी पल्लवी जितेंद्र इंदाणी रा. मगर पार्क वाघ नगर या शिक्षिका म्हणून नोकरीला आहे. दरम्यान, ढंढोरे यांच्या मुलाने क्लासमध्ये दिलेला अभ्यास…
पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्यासह पथकाची कामगिरी मुक्ताईनगर प्रतिनिधी: मलकापूर नगरपरिषदेच्या सेवानिवृत्त महिला कर्मचारी प्रभा फाळके याचा क्रुरपणे हत्या करून त्यांचा मृतदेह जाड प्लॉस्टीकच्या पिशवीत भररून मुक्ताईनगर बऱ्हाणपूर महामार्गावरील पुला खाली फेकून दिल्याची प्रकार उघडकीला आला होता. या गुन्ह्यातील शेजारी राहणारे बापलेकाला पोलीसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मलकापूर च्या सेवानिवृत्त कर्मचारी श्रीमती प्रभा माधव फाळके (वय-६३) रा.गणपती नगर भाग २ ह्या २७ ऑगस्ट रोजी परिसरातच असलेल्या मंदिरामध्ये पुजेची थैली घेवून दर्शनासाठी जात असल्याचे मुलाला व सुनेला सांगून घरून निघून गेल्या होत्या. २९ ऑगस्ट रोजी जळगाव खांदेश जिल्ह्यातील मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर महामार्गावर संत मुक्ताबाई साखर कारखान्याच्या पुडे…
भडगाव तालुक्यातील पीडितेचे जिल्हाधिकारी ,पोलीस अधीक्षकांना निवेदन जळगाव (प्रतिनिधी) भडगाव तालुक्यातील माहेर असणाऱ्या पीडितेच्या सासरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला पतीसह सासरच्या १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप तीन महिने गुन्हा दाखल होऊनसुद्धा आरोपींना अटक करण्यात आली नसून त्यांना त्वरित अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी पिडीताने निवेदनाद्वारे जळगावच्या जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. दरम्यान या गुन्ह्यात सासऱ्याला पोलिसांनी अटक केली असून इतर आरोपी फरार असून त्यांनी जळगाव जिल्हा न्यायालय आणि औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केले होते. मात्र ते न्यायालयांनी फेटाळले आहे. निवेदनात म्हटले आहे ,…

