जळगाव : प्रतिनिधीभादली येथील पाटावर दि ३ रोजी जळगाव येथील तरुणाची हत्या करून मयताची प्रेत त्या ठिकाणी मिळून आल्याने घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक श्री.चंद्रकांत गवळी यांनी भेट देवून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना सदर गुन्ह्या उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते. त्यावरुन पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि जालींदर पळे, पोउपनिरी अमोल देवढे, सफी रवि नरवाडे, पोह संजय हिवरकर, राजेश मेंढे, जितेंद्र पाटील, लक्ष्मण पाटील, महेश महाजन, अक्रम शेख, संदिप सावळे, पोना रणजीत जाधव, विनोद सुभाष पाटील, किशोर राठोड, नितीन बावीस्कर, प्रितम पाटील, ईश्वर पाटील, मुरलीधर बारी, रमेश जाधव यांचे…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
पाचोरा प्रतिनिधी । भाड्याने दिलेली बैलगाडी तक्रारदाराला मिळवून देण्यासाठी 4 हजाराची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला लाच लुचपत विभागाने पाचोरा शहरात सापळा रचून रंगेहात पकडले आहे. या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शेतकऱ्याने वर्षभरापूर्वी बैलगाडी भाड्याने दिल्यानंतर संबंधितानी ती परत दिली नाही, उलट या प्रकरणात तक्रारदारावरच पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर शेतकऱ्याने तक्रार दाखल केली. या सर्व प्रकरणानंतर तक्रारदाराला बैलगाडी परत मिळवून देण्यासाठी पिंपळगाव हरेश्वरातील पोलिस हवालदार राकेश खोंडे यांनी ५ हजारांची लाच मागितली. मात्र तक्रारदाराकडे चार हजार असल्याने त्यावर तडजोड झाली. तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर लाचेची मंगळवारी ४ ऑक्टोबर रोजी पडताळणी झाल्यानंतर पाचोरा…
शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा ; शिंदे गट-भाजपकडून तहसीलदारांच्या निलंबनाची मागणी ! धरणगाव (प्रतिनिधी) पत्रकार कल्पेश महाजन यांनी निर्भीडपणे प्रकाशित केलेल्या बातमीवरून भेदरलेल्या धरणगाव तहसीलदार यांनी अब्रूनुकसानीची नोटीस पाठवली आहे. या नोटीसचा धरणगावातील पत्रकार संघटना आणि सर्वपक्षीय नेत्यांनी निषेध नोंदवला आहे. पत्रकाराला नोटीस दिलेली नोटीस म्हणजे हा लोकशाहीचा खून आहे. लोकप्रतिनिधी किंवा कुणीही दिलेल्या माहितीच्या आधारे बातमी प्रकाशित करणे हा पत्रकाराचा अधिकार आहे. त्यावर कुणीही गदा आणू शकत नाही. तहसीलदार कुणाच्या इशाऱ्यावर नाचताय हे आम्हाला माहित आहे. त्यामुळे भविष्यात आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. गुलाबराव वाघ (शिवसेना सहसंपर्क प्रमुख, जळगाव ) पत्रकारांच्या व्यक्ती स्वातंत्राच्या अधिकारावर हा मोठा हल्ला आहे. खरं…
पाणीपुरवठामंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांची संकल्पना मुंबई / जळगाव प्रतिनिधी : शिवसेनेचा (शिंदे गट) दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार असून या मेळाव्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. या मेळाव्याची उत्सुकता केवळ राज्यात नसून देशभरात आहे. त्याच पार्श्वभूमीवर या गटाचे नेते आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून या मेळाव्यासाठी खास शिवसेना स्फुर्तिगीत तयार करण्यात आले आहे. आज हे गीत सर्वासाठी रिलिज करण्यात आले. “हे गीत म्हणजे आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या महान जीवनकार्याला निष्ठावंत शिवसैनिकानं अंतःकरणातून दिलेली मानवंदना आहे. इतकंच नव्हे तर बाळासाहेबांचा शिवधर्माचा, हिंदुत्त्वाचा वारसा पुढे नेण्याचं वचन आहे, अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी…
गांधी जयंतीनिमित्त चेतना व्यसनमुक्ती केंद्राचा उपक्रम जळगाव प्रतिनिधी : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज चेतना व्यसनमुक्ती केंद्रातर्फे नशामुक्त व व्यसनमुक्त अभियानाला शहरात रॅलीने सुरुवात झाली. यावेळी आमदार राजूमामा भोळे व राष्ट्रवादीचे नेते तथा जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांची प्रमुख उपस्थिती होती. रॅली निघण्यापूर्वी श्री देवकर यांनी अशा अभियानाची समाजाला गरज असून, व्यसनमुक्ती केंद्राचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. आमदार भोळे यांनी देखील या उपक्रमाचे कौतुक केले. यावर्षी व्यसनमुक्त व गांजामुक्त महाराष्ट्र हा संदेश महाराष्ट्रभर देण्यात येणार असून, राज्यात वर्षभर हे अभियान चालू राहणार असल्याचे यावेळी चेतना व्यसनमुक्ती व उपचार केंद्रातर्फे स्पष्ट करण्यात आले.
धरणगाव प्रतिनिधी : येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्राचार्या चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावित यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. शिक्षक लक्ष्मणराव पाटील यांनी गांधीजी व शास्त्रीजी यांच्या कार्याची माहिती दिली. गांधीजींनी हिंदू मुस्लिम एकतेसाठी सदैव कटिबद्ध राहून देश एकसंध ठेवण्याचं कार्य केले. अहिंसेच्या मार्गावर चालून सुध्दा क्रांती घडू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे गांधीजी. शास्त्रीजींच्या चरित्रातून आदर्श काय घ्यावा तर उच्च पदावर राहून सुध्दा साधं राहणं. रेल्वेमंत्री, प्रधानमंत्री अशा उच्च पदावर असतांना देखील शासकीय सुविधांचा गैरवापर करू नये हे समजून घ्यायचे असेल तर शास्त्रीजींच्या चरित्राचा…
यावल प्रतिनिधी । प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलाने एका १९ वर्षीय तरूणीवर वारंवार अत्याचार करून गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील एका खेडेगावात १९ वर्षीय तरूणी ही आपल्या आईवडील व आजी सोबत वास्तव्याला आहे. शेतात मजूरीचे काम करून उदरनिर्वाह करते. गेल्या वर्षी किनगाव शिवारातील शेतात काम करत असतांना तरूणीची १६ वर्षीय अल्पवयीन मुलाशी ओळख झाली. त्यातून दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. दरम्यान, अल्पवयीन मुलाने तरूणीला शेतात बोलवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. या अत्याचारातून तरूणी गर्भवती राहिली. हा प्रकार तिच्या नातेवाईकांना…
पाळधी येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वर विश्वास ठेवून कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा धरणगाव प्रतिनिधी | पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत पाळधी येथील विश्रामगृह येथे धरणगाव शहरातील माजी नगरसेवक वासुदेव चौधरी यांच्या सहसेकडो कार्यकर्त्यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे धरणगाव शहरात शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे तर शिंदे गटाचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे शिंदे गटाची बैठक घेण्यात आली. यावेळी जळगाव जिल्ह्यातील किमान १० हजार शिवसेनेचे कार्यकर्ते दसरा मेळाव्याला जाणार असल्याची प्राथमिक माहिती…
एरंडोल उप विभागीय अधिकाऱ्यांनी स्थापन केली चौकशी समिती धरणगाव प्रतिनिधी : खोटे दस्तावेज सादर करीत टोकरे कोळीचे जात प्रमाणपत्र धरणगाव तहसील कार्यालयाने जारी करीत त्या प्रमाणपत्राच्या आधारे ग्रामपंचायतचे सदस्य पद भुषविण्यात आले असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. एरंडोल उपविभागीय अधिकाऱ्यांनी यासंदर्भात चौकशी पथक नेमून महिन्याभरात त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मुक्ताईनगर तालुक्यातील राजुरा ग्रामपंचायतच्या अनुसूचित जाती (एसटी) प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागी विद्यमान सदस्य अशोक शालिग्राम भोलाणकर यांनी खोटे दस्तावेज सादर करून धरणगाव तहसील कार्यालयाकडून मिळविलेल्या जात प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवून ग्रामपंचायतीचे सदस्यपद मिळविल्याची लेखी तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष श्री.संजय संतोष कांडेलकर, राजुरा यांनी जळगाव…
निमखेडी शिवारातील घटना,आरोपी पोलिसांच्या ताब्यात जळगाव शहरातील आहुजा नगर परिसरातील शिवधाम मंदिरासमोरील ब्रम्हांडनायक अपार्टमेंटमध्ये पतीने पत्नीचा मोबाईल चॉर्जरच्या वायरने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना आज शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली आहे. कविता जितेंद्र पाटील वय २० असे मयत विवाहितेचे नाव आहे. तर जितेंद्र संजय पाटील वय २५ असे संशयित पतीचे नाव आहे. जितेंद्र हा पत्नीला गळफास दिल्यानंतर स्वतःच तालुका पोलीस ठाण्यात हजर झाल्याची ही माहिती मिळाली आहे. पत्नीच्या अनैतिक संबंधाबाबत जितेंद्रला माहिती कळाली होती, त्याने स्वत:च पत्नीला तरुणासोबत रंगेहाथ पकडले होते. यावरुन जितेंद्र व कविता यांच्यात वाद होत होते, या वादातून कविता ही जितेंद्रला आत्महत्येची तसेच तुमचे सर्वांचे…

