Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

शहरातील शिव कॉलनी रेल्वे उड्डाण पुलाजवळ भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक देताच दुचाकीवर बसलेल्या तरुणीचा जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली आहे. जळगावकडून धुळ्याकडे जाणारा डंपर क्रमांक (एमएच १९ सीवाय ३३११) हा शिव कॉलनी कडून रेल्वे उड्डाणपुलाकडे जात होता. त्यावेळेस पुढे जाणारी मोपेड दुचाकी (एमएच १९ सी ७१६९) याला डंपरने मागून जोरदार धडक दिली. यात दुचाकीवर बसलेल्या मनस्वी उर्फ ताऊ सुभाष सोनवणे (२०) रा. खोटे नगर, जळगाव या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात तरुणीचा भाऊ नचिकेत सुभाष सोनवणे (२५) रा. खोटे नगर, जळगाव हा थोडक्यात बचावला आहे. ही दुर्घटना आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास…

Read More

दिल्ली हत्याकांड सध्या देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करून आफताबने ते फ्रीजमध्ये ठेवले होते. यानंतर आफताब एका डेटिंग App च्या सहाय्याने नवीन प्रेयसीच्या शोधात होता. या प्रकरणात आफताब पूनावाला या नावाच्या मुलाने त्याची गर्लफ्रेंड असलेली श्रद्धा वॉकरची निर्घृणपणे हत्या केली. तिची हत्या करून तो थांबला नाही. तर, हत्या केल्यानंतर अत्यंत क्रूर व निर्दयीपने मृतदेहाचे तुकडे करून काही दिवस फ्रीजमध्ये ठेवले. कुणालाही याबाबत माहित किंवा शंका होऊ नये या उद्देशाने तो हळू-हळू मृतदेहाचे तुकडे जंगलात फेकून दिले. या प्रकरणात सातत्याने नव-नवीन धक्कादायक महित् समोर येत आहेत. आफताबने मृतदेहाचे ३५ तुकडे करून अनेक दिवस फ्रीजमध्ये ठेवले होते. आफताब याने…

Read More

राष्ट्रवादीच्या नेत्यांतर्फे निवासस्थानी सत्कार…! लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ; दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनच्या संचालक मंडळ निवडणुकीत जळगाव जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांची नाशिक विभागातून बिनविरोध निवड झाली आहे. त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती, माजी खासदार वसंतराव मोरे, माजी आमदार दिलीप वाघ, राष्ट्रवादी सहकार विभागाचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील, संजय गरुड आदींनी श्री देवकर यांच्या निवासस्थानी त्यांचा सत्कार केला. राज्य सहकारी बँक असोसिएशनच्या संचालक मंडळासाठी 21 पैकी दहा संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित जागांसाठी 22 नोव्हेंबरला मतदान, तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मतदार संघातून नाशिक विभागाकडून जळगाव जिल्हा बँकेचे…

Read More

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जळगाव जिल्ह्यात घरफोडी, दुकान फोडीच्या गुन्ह्यांत वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक एम.राज कुमार व अपर चाळीसगाव पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना त्याप्रमाणे सूचना व मार्गदर्शन केले. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना दि. १३ रोजी गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, भडगाव तालुक्यातील कजगाव येथील मिथुनसिंग मायासिंग बावरी याने पाळधी ता, धरणगाव येथील एका पज्याचे दुकानाचे कुलूप तोडून त्यातील मोबाईलव इतर चार्जिंगवस्तु चोरी केल्या असून त्यातील रियलमो कंपनीचा मोबाईल हॅण्डसेट त्याचे ताब्यात असून तो मोबाईल तो वापरत असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोनी. किसन…

Read More

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सुरू झालेली शिवसेनीची पडझड अजूनही थांबताना दिसत नाहीये. उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला असून खासदार गजानन किर्तिकर हे देखील आता एकनाथ शिंदे गटात सामील होणार आहेत अशी चर्चा होती. त्यानंतर उद्दव ठाकरे यांना हा एक मोठा धक्का बसला असून, खासदार गजानन किर्तिकर यांनी एकनाथ शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे गजानन किर्तिकर यांनी प्रवेश केला, यानंतर आता शिंदे गटातील खासदारांची संख्या आता १३ वर गेली आहे. यामुळे ठाकरे गटाला एक मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी देखील किर्तिकर हे शिंदे गटात जाऊ शकतात असे बोलले जात…

Read More

शहरातील सराफ बाजारातील ज्वेलरी शॉप फोडणाऱ्या गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने अवघ्या चोवीस तासांच्या आत जेरबंद केले आहे. पुढील चौकशीसाठी त्याला शनीपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या चोरीमध्ये संशयित आरोपी विशाल उर्फ ॲस्टीन युवराज सोनवणे असे अटक करण्यात आलेल्या नाव आहे. सविस्तर वृत्त असा कि, शहरातील सराफ बाजारातील मनिष ज्वेलर्स या दुकानातून सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज चोरी झाला होता. या घटने प्रकरणी शनीपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगाव शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार विशाल उर्फ ॲस्टीन युवराज सोनवणे (रा. पावर हाउसनजीक भिलवाडी जळगाव) याने आपल्या साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केला असल्याची गोपनीय माहिती…

Read More

50 ‘खोके’ नाही तर तब्बल… एवढे खोके पळवून नेले लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : ते म्हणता ना चोरी करायची तर मोठी करा छोटी नको म्हणजेच आली लहर आणि केला कहर याच प्रमाणे नाशिक महामार्गावर चोरटयांनी डायरेक फिल्मी स्टाईल बिअरचा ट्रक लुटला आहे. नाशिक महामार्गावर लुटीचा थरार पहायला मिळाला आहे. चोरट्यांनी बिअरच्या बॉटल्स घेवून जाणारा कंटेनर लुटला आहे. बिअर बॉटलचे 2200 बॉक्ससह जवळपास 63 चोरट्यांनी अगदी फिल्मी स्टाईलने ही लुट केली आहे. यामुळे या बियर चोरीची नाशिकमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. औरंगाबाद येथे असलेल्या किंगफिशर कंपनीचा एक कंटेनर बियरच्या बॉटल घेऊन निघाला होता. या कंटेनकर मध्ये बिअर बॉटलचे 2200 बॉक्स होते. बिअरचे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी २०१७ मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लढवलेले रमेश माणिक पाटील यांनी आज ठाकरे गटात प्रवेश करीत सर्वानाच मोठा धक्का दिला आहे. रमेश माणिक पाटील यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे जळगाव ग्रामीण मतदार संघात आता विधानसभा ठाकरे गटाला सोपी जाणार असल्याचीही चर्चा रंगत आहे. यावेळी त्यांच्यासोबत उमेश रावसाहेब पाटील, प्रवीण कौतिक पाटील, शेतकरी नेते छोटू सुकदेव पाटील, जिल्हा अध्यक्ष कोळी सेल कॉग्रेसभाऊसाहेब सुकदेव सोनवणे, प्रहार जिल्हा नेते डॉ०.जुबेर खान, चेतन पुंडलिक सोनवणे ग्राम पंचायत सदस्य भोकर यांनी प्रवेश केला आहे. तर यावेळी जळगाव जिल्हा…

Read More

दोन जणांवर गुन्हा दाखल; एरंडोल पोलीसांची कारवाई एरंडोल- प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील खडकीसिम शेतशिवारामध्ये अवैधरित्या गांजाची शेती केल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये ६१ लाख ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत एरंडोल पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एरंडोल पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील खडकीसिम येथील दिगंबर पंडित पाटील यांच्या शेतात आणि नितीन डिगंबर पाटील यांच्या तुर पिकाच्या शेतामध्ये गांजा या मादक पदार्थाची लागवड करून संगोपन होत असल्याची गोपनीय माहिती एरंडोल पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना समजले. त्यानुसार पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या सूचनेनुसार पोलीस कर्मचारी सहाय्यक पोलीस निरीक्षक…

Read More

आम्ही पण वक्ते, भाषणं आम्हीही करतो, पण असे कधी बोलत नाही- पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगाव प्रतिनिधी । सभेचे आम्ही पण वक्ते आहोत, भाषणं आम्हीही करतो पण असे खालच्या पातळीवर आम्ही कधीच बोलत नाही. दबावाचं राजकारण आम्ही कधीच केलं नाही अशी प्रतिक्रिया ‘लाईव्ह महाराष्ट्र न्यूजशी’ पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. धरणगाव सभेत युवासेने राज्य विस्तारक शरद कोळी यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह शिंदे गटाच्या आमदारांबद्दल पातळी सोडून खालच्या शब्दात टिका केली. त्याबद्दल धरणगाव पोलीस ठाण्यात शरद काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. गुन्हा दाखल होत असल्याचे लक्षात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री यांच्यावर…

Read More