युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी धरणगावातील महाप्रबोधन यात्रेत पालकमंत्र्यांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेवर अतिशय खालच्या स्तरावर टिका केल्याच्या कारणावरून त्यांच्या विरोधात येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महाप्रबोधन यात्रा जळगाव जिल्ह्यात दाखल झाली आहे. परवा धरणगाव, काल पाचोरा आणि एरंडोल येथे यानिमित्त सभा झाल्या. यात सुषमा अंधारे यांच्यासोबत युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी अतिशय आक्रमक भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात शिंदे गटाच्या आमदारांवर अतिशय शेलक्या भाषेत टीका केली. याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी शरद कोळी यांना भाषण करण्यास बंदी घातली आहे. यानंतर त्यांच्या विरोधात धरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शरद कोळी यांनी आपल्या भाषणातून पालकमंत्री…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगावातील शहर पोलीस स्थानकात शिवसैनिकांमध्ये गोंधळ पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यातील गोंधळानंतर सुषमा अंधारे इतर पदाधिकाऱ्यांसह पायी पोलीस ठाण्यात गेल्या. या सर्व घडामोडींमुळे जळगावातील वातावरण चांगलंच तापलं आहे. जळगाव : जळगावात चोपडा येथील शिवसेनेच्या महाप्रबोधन सभेपूर्वीच गोंधळ झाला. महाप्रबोधन यात्रेनिमित्त शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासोबत असलेले ठाकरे गटाचे वक्ते तथा युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांना अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये झटापट झाली. त्यानंतर मोठा गोंधळ उडाल्याची माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे या गदारोळानंतर सुषमा अंधारे इतर पदाधिकाऱ्यांसह पायी पोलीस ठाण्यात गेल्या. या सर्व घडामोडींमुळे जळगावातील वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची…
धरणगाव प्रतिनिधी । शहराजवळ असलेल्या गट नं. १२४८/२ मधील वादग्रस्त अतिक्रमण शांततेत काढण्यात आले. दरम्यान, बुधवार २ नोव्हेंबर रात्री आठ वाजेपासून तर शुक्रवार नोव्हेंबर सकाळी ८ वाजेपर्यंत जमाव बंदी लागू करण्यात आले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. याबाबतचे आदेश प्रांतअधिकारी विनय गोसावी यांनी काढले आहेत. विनय गोसावी, उपविभागीय दंडाधिकारी, एंरडोल भाग एरंडोल, यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 (1) (2) (3) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून त्यांनी संपुर्ण धरणगांव शहरात दिनांक 02/11/2022 चे रात्री 08.00 वाजेपासुन दिनांक 04/11/2022 चे सकाळी 8 वाजेपावेतो संचारबंदी लागू करण्याचा आदेश…
जिल्ह्यातील गेल्या काही महिन्यापासून नेहमी चर्चेत राहणारी जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, दि. ३ नोव्हेंबरपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याला सुरुवात होणार आहे. दूध संघासाठी दि. १० डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांनी दिली आहे. राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणाच्या मंजुरीने दूध संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांनी दिली.या पद्धतीने असेल निवडणुकीचा कार्यक्रम – नामनिर्देशन पत्र दाखल करणे दि. ३ ते १० नोव्हेंबर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत, निवडणुक कार्यालय दूध संघ, नामनिर्देशन पत्रांची छाननी- दि. ११ नोव्हेंबर,…
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ट्वीट करत व्यक्त केले दु:ख गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला केबल पूल कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या पूलावर असणारे लोक नदीत पडल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये अद्याप कोणतीही जिवितहानी झाल्याचं वृत्त नाही. काही प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, केबल पूल कोसळल्यामुळे चारशे लोक नदीत बुडाले आहेत. मच्छू नदीत कोसळलेला पूल पाच दिवसांपूर्वीच दुरुस्त करण्यात आला होता. त्यानंतरही आज ही दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच बचवकार्य वेगानं सुरु करण्यात आले आहे. रुग्णवाहिका आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. गुजरातमधील मोरबी येथे माच्छू नदीवरील केबल पूल तुटल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. छठ पूजासाठी येथे शेकडो लोक उपस्थित राहिले…
भडगाव पोलिसात तरुणीविरोधात गुन्हा दाखल जळगावातील एका परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने भडगाव येथील एका प्रियकरासोबत लग्न करून द्यावे, असे म्हणत एका तरुणीने सिनेस्टाइल पद्धतीने प्रियकराच्या घरी जात धिंगाणा घातल्याची घटना भडगावात घडली. तरुणाशी माझे लग्न करून द्या, असे सांगून तरुणाची आई आणि वहिनीलाही तरुणीने चापटाबुक्क्यांनी मारहाण करत घरासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. जळगावातील एका तरुणीचे संबंधित तरुणाशी प्रेमसंबंध आहेत. आपले लग्न तरुणाशी लावून द्या, अशी मागणी करत तरुणाच्या घरात घसून तरुणाच्या आईला आणि त्याच्या वहिनीला शिवीगाळ करत माहराणही केली. एवढेच नाही तर जोपर्यंत तुमचा मुलगा घरी परत येणार नाही तोपर्यंत मी येथून जाणार नाही. नाहीतर मी तुमच्या घरासमोर आत्महत्या…
फरार संशयिताच्या शोधार्थ तीन पथके रवाना लाईव्ह महाराष्ट्र न्युज: जळगावात मंगळवारी रात्रीच्या सुमारास फटाके फोडण्याच्या वादातून संजयसिंग प्रदीपसिंग टाक (वय-१९) या तरुणाचा चॉपर भोसकून खून झाल्याची घटना तांबापुरात घडली होती. याप्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली असून तिघांवर पोलिसात गंभीर गुन्हे दाखल आहेत.सविस्तर वृत्त असे की, दिवाळीच्या दिवशी फटाके फोडण्याच्या वादातून संजयसिंग टाक या त्यांच्या घराशेजारील मोनूसिंग, सोनूसिंग आणि मोहनसिंग यांच्यासोबत वाद झाला होता. यादिवशी बाचाबाची होवून वाद मिटला होता. मात्र मंगळवारी रात्री संजयसिंग हा घराबाहेर बसलेला असतांना मोहनसिंग व मोनूसिंग यांनी संजसिंगवर चॉपरने वार करुन त्याला जखमी केले. तसेच त्याला वाचविण्यासाठी त्याचे वडील प्रदीपसिंग टाक, भाऊ करणसिंग टाक, काका…
चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील रेल मारुती मंदिराजवळ आज दुपारी समोरून येणाऱ्या दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे मामा-भाची जागीच ठार झालेत. मयतांमध्ये सहा वर्षीय चिमुकलीचा समावेश आहे. या संदर्भात अधिक असे की आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास रेलच्या मारुती मंदिरासमोरील नागमोडी वळणावर चोपड्याकडून धरणगावकडे जाणारी दुचाकी (क्र.एमएच 19 सीएच 5174) ला समोरून येणारा ट्रक (क्र.एचआर 56 बी 4688) ने जोरदार धडक दिली. या अपघातात एक सहा वर्षीय विधी कोळी नामक बालिका जागीच ठार झाल्याचे कळते. तर दुचाकी चालक आबा कोळी (रा. दहिदुले ता.धरणगाव) आणि एक महिला गंभीर जखमी आहे तर दीड वर्षीय चिमुकला मात्र, सुखरूप असल्याचे कळते. अपघाताची माहिती मिळतात चोपडा पोलिसांनी…
चार जखमी तर घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल सर्वत्र दिवाळीचा उत्साह असताना आजमंगळवारी २५ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास शहरातील तांबापुरात एका कुटुंबावर चार अनोलखीनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. त्यात एका तरुण मुलाचा घाव लागल्याने खून झाला असून इतर पाच जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्यांचा तपास सुरू झाला आहे. दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गर्दी झाली आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील तांबापुरा भागातप्रदीप सिंग यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. मंगळवारी २५ रोजी ते घराजवळ असताना अचानक अज्ञात लोकांनी येऊन पूर्ववैमानस्यातून त्यांच्यावर चाकू आणि इतर अज्ञात शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला. यात संजय सिंग प्रदीप सिंग…
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे (SP Pravin Mundhe) यांची बदली झाली असून जळगाव पोलीस अधीक्षकपदी नागपूर लोहमार्ग पोलीसचे एम.राजकुमार (Jalgaon SP M Rajkumar) यांची वर्णी लागली आहे.जिल्ह्यातील राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या नुकतेच बदल्या करण्यात आल्या होत्या. आयएएस नंतर राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहेत. जळगाव पोलीस अधीक्षक पदी नागपूर लोहमार्गचे पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांची वर्णी लागली आहे.दरम्यान, जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांची बदलीने अद्याप पदस्थापना करण्यात आलेली नसून त्याचे स्वतंत्र आदेश पारित होण्याची शक्यता आहे.

