Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

पुन्हा पदभार घेणार, मनपात नाट्यमय घडामोडी लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : दोन दिवसांपूर्वी मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची शासनाने उचलबांगडी केली होती. त्यांच्या रिक्त जागेवर परभणीचे माजी आयुक्त देविदास पवार यांच्या नियुक्ती झाली होती. नूतन आयुक्त पवार यांनी बुधवारी पदभारही देखील स्वीकारला आणि आता नाट्यमयरित्या घडामोडी घडून नुतन आयुक्त पवार यांच्या नियुक्तीस स्थगिती मिळाल्याने आयुक्त विद्या गायकवाड परत जळगाव मनपाचा पदभार घेणार आहे. जळगाव महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची दोन दिवसापूर्वी झालेली बदलीची चांगलीच चर्चा आहे. राजकीय वादामुळे ही बदली करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. जळगाव महापालिकेच्या आयुक्तपदी देवीदास पवार यांची नियुक्ती झाल्याचे आदेश मंगळवारी २९ नोव्हेंबर रात्री उशिरा…

Read More

पाचोरा तालुक्याती वाडी येथे पुतण्याचा बैल शेतात शिरल्याचा राग येवून काकाने पुतण्यास काठीने डोक्यात वार केल्याने ४३ वर्षीय पुतण्या हा गंभीर झाल्यानंतर त्यांना जळगाव खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाल्याने पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला असुन पोलिसांनी मयताच्या चुलत भावास ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडुन मिळालेल्या माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील वाडी (शेवाळे) येथील प्रल्हाद मोतीराम भोसले व त्याचा पुतण्या पुनमचंद भोसले यांची शेत जमिन शेजारी असल्याने पुनमचंद भावराव भोसले यांचा मुलगा किरण पुनमचंद भोसले यांची बैलजोडी २७ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान प्रल्हाद मोतीराम भोसले यांच्या शेतात शिरल्याचा राग येवुन प्रल्हाद भोसले याने त्याच्या…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र: चंपाषष्ठी निमित्त जळगाव जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याच पद्धतीने मंगळवारी एरंडोल तालुक्यातील तळई येथे चंपाषष्ठी निमित्त बारागाडे ओढण्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात तळई गावातील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. या गर्दीत राहूल पाटील हा देखील त्यांच्या मित्रासोबत उभा होता. यावेळी बारा गाड्यांजवळून गर्दीत पळताना पायात पाय अडकल्याने राहूल बारागाड्यांच्या समोर आला. या दुदैवी घटनेत त्याच्या पोटावरून चाक गेल्याने राहुल गंभीररित्या जखमी झाला होता त्याला रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला आहे. एरंडोल तालुक्यातील तळई गावात हि धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता घडली. या तरूणाचा जळगाव जिल्हा शासकीय…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूजजिल्हा दुध संघाची निवडणूक गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापवून टाकले होते. त्यावर राजकीय नेते मंडळींनी बऱ्याच टिकाटिपण्णी केल्या पण  आज सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने काढलेल्या जीआरनुसार जिल्हा दुध संघाची निवडणूक 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात येत असल्याची खात्रीलायक वृत्त आहे. शासनाच्या परिपत्रकात म्हटले आहे की, राज्य निवडणूक आयोगाने दिनांक 09.11.2022 रोजीच्या आदेशान्वये दिनांक 18.11.2022 ते दिनांक 20.12.2022 या कालावधीत राज्यातील 7751 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहिर केला असून, यामध्ये निवडणूकीची नोटीस प्रसिद्ध करणे, नामनिर्देशन मागवून छाननी करणे, नामनिर्देशन मागे घेणे. मतदानाचा दिनांक, मतमोजणी व निकाल घोषीत करण्याचा दिनांक नमूद केला आहे. सदर 7751 ग्रामपंचायतींचा निकाला दिनांक 20.12.2022…

Read More

Live maharashtra: भरधाव अज्ञात वाहनाने मोटरसायकलला धडक दिल्याने मोटरसायकल वरील एक जण जागेवरच ठार झाला तर एकाचा जळगांव येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना भडगाव रोडवरील अंकीत काॅटन जिनिंग जवळ घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, गोपाल गोवर्धन पुजारी (वय – ४०) रा. बाहेरपुरा, पाचोरा व खुशाल अर्जुन सोनार (वय – २५) रा. संभाजी नगर, पाचोरा हे दि. २८ नोव्हेंबर रोजी आमडदे ता. भडगाव येथे यात्रेत व्यवसायासाठी जागा सांभाळण्यासाठी दि. २७ नोव्हेंबर रोजी आमडदे येथे गेले होते. २७ रोजी रात्री उशिरा आमडदे येथुन मोटरसायकलने पाचोरा येथे येण्यासाठी निघाले. दरम्यान रात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास भडगाव ते पाचोरा दरम्यान…

Read More

एरंडोल : शहरातील रेणुका नगरात अंघोळ करताना गिझरमधून गॅसची गळती झाल्याने गुदमरून साई उर्फ यश वासुदेव पाटील (16) या मुलाचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना सोमवार, 21 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.गॅस गळतीमुळे जागीच झाला मृत्यूएरंडोल शहरातील रा.ती. कावरे विद्यालयाचा विद्यार्थी यश पाटील हा सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास अंघोळीसाठी गेला मात्र बराच वेळ झाल्यामुळे तो बाथरूममधून बाहेर न आल्यामुळे आई-वडिलांना चिंता वाटल्याने त्यांनी दरवाजा ठोठावला असता काही एक प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी दरवाजा तोडण्यात आला असता तो बेशुद्धावस्थेत आढळल्याने त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. यावेळी आई-वडिलांनी एकच हंबर्डा फोडला. हे वृत्त…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र :हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दीन निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते बाळासाहेब हे अमर राहितील त्याचे विचार आजही जिवंत आहे बाळासाहेब म्हणजे हिंदुत्व देशात बाळासाहेब ठाकरे यांचे वेगळे च वलय होते मराठी माणसाला न्याय मिळाव म्हणून ते लढत राहीले असे मत प्रतापराव पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी भाजपचे ओ बी सी सेल जिल्हा अध्यक्ष संजय महाजन भाजपचे मा गटनेते कैलास माळी सर माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी उपस्थित जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, अॅड.संजय महाजन, पी.पाटील, मोतीआप्पा पाटील, सुनील चौधरी, कैलास माळी, विजय महाजनविलास महाजन, कडू महाजन, अॅड.वसंतराव भोलाणे,…

Read More

धरणगाव प्रतिनिधी गौरव पाटील: तालुक्यातील विविध गावातून शहरात शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना आज दि.17 रोजी सांयकाळी 5 वाजेला शाळा सुटल्यानंतर ही बस उपलब्ध न झाल्याने घटनास्थळी ठाकरे गटाचे गुलाबराव वाघ व निलेश चौधरी यांनी बस आगार प्रमुखांशी चर्चा करून रात्री 7.30 वाजेच्या सुमारास बस आल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला होता. शाळेत शिक्षण घेण्यासाठी धरणगाव तालुक्यातील विविध गावातून विद्यार्थी हे धरणगाव शहरात येत असतात, तालुक्यातील विद्यार्थी हे बसने प्रवास करीत असून शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाण्याची ओढ लागले असतांनाच बस वेळेवर न आल्याने विद्यार्थी कंटाळून जात असतात. गेल्या काही दिवसापासून किमान दोन ते तीन दिवस बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांना बस…

Read More

शहरातील शिव कॉलनी रेल्वे उड्डाण पुलाजवळ भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक देताच दुचाकीवर बसलेल्या तरुणीचा जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली आहे. जळगावकडून धुळ्याकडे जाणारा डंपर क्रमांक (एमएच १९ सीवाय ३३११) हा शिव कॉलनी कडून रेल्वे उड्डाणपुलाकडे जात होता. त्यावेळेस पुढे जाणारी मोपेड दुचाकी (एमएच १९ सी ७१६९) याला डंपरने मागून जोरदार धडक दिली. यात दुचाकीवर बसलेल्या मनस्वी उर्फ ताऊ सुभाष सोनवणे (२०) रा. खोटे नगर, जळगाव या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात तरुणीचा भाऊ नचिकेत सुभाष सोनवणे (२५) रा. खोटे नगर, जळगाव हा थोडक्यात बचावला आहे. ही दुर्घटना आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास…

Read More

दिल्ली हत्याकांड सध्या देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करून आफताबने ते फ्रीजमध्ये ठेवले होते. यानंतर आफताब एका डेटिंग App च्या सहाय्याने नवीन प्रेयसीच्या शोधात होता. या प्रकरणात आफताब पूनावाला या नावाच्या मुलाने त्याची गर्लफ्रेंड असलेली श्रद्धा वॉकरची निर्घृणपणे हत्या केली. तिची हत्या करून तो थांबला नाही. तर, हत्या केल्यानंतर अत्यंत क्रूर व निर्दयीपने मृतदेहाचे तुकडे करून काही दिवस फ्रीजमध्ये ठेवले. कुणालाही याबाबत माहित किंवा शंका होऊ नये या उद्देशाने तो हळू-हळू मृतदेहाचे तुकडे जंगलात फेकून दिले. या प्रकरणात सातत्याने नव-नवीन धक्कादायक महित् समोर येत आहेत. आफताबने मृतदेहाचे ३५ तुकडे करून अनेक दिवस फ्रीजमध्ये ठेवले होते. आफताब याने…

Read More