80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण हेच ब्रीद वाक्य घेऊन आम्ही वाटचाल करणार प्रतिनिधी – पाळधी येथील दिनांक 4 मार्च रोजी मेनरोड येथील गुरव समाजाच्या होतकरू कार्यकर्ते टेलर दुकानाला रात्री आग लागून त्याचे प्रचंड नुकसान झाल्या असता पालकमंत्री.ना.गुलाबरावजी पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या प्रयन्तनानाने त्या गरीब तरुणास सामाजिक बांधिलकी म्हणून त्याच आर्थिक मदत करून त्याला पुन्हा व्यवसाय उभे करण्यासाठी मदत केली. या मदतीत रोटरी स्टार क्लब तर्फे धनराज कासट यांनी शिलाई मशीन उपलब्ध करून दिले तसेच जि. प.सदस्य प्रतापराव पाटील यांनी रोख स्वरूपात मदत केली असेच गावातिल व्यवसाय धारकांनी आप आपल्या परी ने आर्थिक मदत करून…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
शहरातील हरिविठ्ठल नगरातील हरीविठ्ठल नगरातील १६ वर्षीय मुलाचा जळगाव ते शिरसोली रेल्वेलाईन दरम्यान धावत्या रेल्वेखाली आल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास समोर आले आहे. रोहित लक्ष्मण मोरे (वय-१६) असे मृत मुलाचे नाव आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेली माहिती अशी की, शहरातील हरीविठ्ठल नगरातील तडवी गल्लीत आई किरणबाई व वडील लक्ष्मण मोरे यांच्यासोबत रोहित मोरे हा आपल्या परिवारासह रहायला होता. रामानंद नगरातील बहिणाबाई चौधरी माध्यमिक विद्यालयात दहावीचे शिक्षण घेत होता. सोमवारी २८ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता रोहित हा घरात कुणाला काहीही न सांगता घराबाहेर पडला. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास…
बिलखेडे ग्रामस्थांच्या प्रेमाने भारावले पालकमंत्री मराठा समाजाचा मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही हा उठाव केला बिलखेडे येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन करतांना राज्याचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव आणि बुलढाणा जिल्हा ना.श्री गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते बिलखेडे येथे जलजीवन योजना अंतर्गत भूमिपूजन संपन्न झाले. ना.पाटील – आपल्या गावची सून आपल्या गावाच्या समस्या मांडू शकते, ते गाव विकासाच्या दिशेने जात आहे हे लक्षात येते. गावाच्या अंतर्गत वाद मी पाहत नाही, मी फक्त गावाचा विकास कसा होईल हेच उद्धिष्ट डोक्यात ठेवतो.मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना साथ दिली आणि मुख्यमंत्री केले मग आम्ही काय चुकलो की आम्ही मराठा…
ना.गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर ठेवला विश्वास धरणगाव : प्रतिनिधीराज्यात शिवसेनेच्या शिंदे गट आपले संघटन मजबूत करीत आहे तर दुसरीकडे जिल्ह्यात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज नगरसेवक सुरेश महाजन यांच्यासह कार्यकर्ते दाखल झाले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थित नगरसेवक सुरेश महाजन , विजय महाजन, आय्यस शेख, जयेश महाजन, साबर शाहा,राकेश महाजन,महेश पाटील,किरण चौधरी, सोपण महाजन,विक्की निकम, वासुदेव महाजन, अजय महाजन यांचा प्रवेश झाला आहे. यांच्या उपस्थिती झाला प्रवेश यावेळी गटनेते विनय भावे, शहर प्रमुख विलास महाजन, अहमद खान पठाण, नगरसेवक, बुट्ट्या पाटील, प्रशांत देशमखु, अद्दम आली,तैसिप पटेल, प्रताप पाटील व पदाधिकारी उपस्थिती होते.
यावल शहरातील धक्कादायक घटना यावल ता प्रतिनिधीयावल शहरातील एका ३५ वर्षीय तरूणाने त्याची मुलं बाहेर खेळत असतांना राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शहरातील शिवाजी नगरातील रहिवासी शिवाजी शामराव गाढे (वय-३५) हे पत्नी व मुलांसह या वास्तव्याला होता. पत्नी शेतात कामाला गेलेली होती. मंगळवारी २१ फेब्रुवारी रेाजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शिवाजी गाढे हा तरूण घरीच होता. त्याची दोन लहान मुले घराबाहे खेळत असतांना राहत्या घरात जावून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. शिवाजी गाढे याने साधारण दिड वर्षांपुर्वी देखील…
शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचं नाव मिळालं आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच काल जळगाव जिल्हा दौरा झाला होता. त्यांना यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांना धनुष्याबाण देत सन्मान करण्यात आला होता. व लागलीच दुसऱ्या दिवशी शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळाले यावर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ना.पाटील म्हणाले कि,…
शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. एएनआयने याबाबतचं वृत्त दिलेय. निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्याशिवाय पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण हेही एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे. तत्पूर्वी जळगावात भोकर येथे दि १६ रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असता त्यांनी धनुष्यबाण हाती घेतले व आज धनुष्याबान चिन्ह त्यांच्या गटाला मिळाल्याने जळगावात एकच चर्चा सुरु आहे. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर त्यांनी दावा…
मध्य प्रदेशातील कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सीहोर स्थित कुबेरेश्वर धाममधील रुद्राक्ष महोत्सवाच्या पहिल्या दिवशी गर्दीमुळे स्थिती नियंत्रणाबाहेर गेली. रुद्राक्ष घेण्याच्या नादात अक्षरशः चेंगराचेंगरीसारखी स्थिती उद्भवली. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला. तर 3 महिला बेपत्ता झाल्या. घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, महोत्सवाच्या ठिकाणी एवढी गर्दी आहे की पायी चालणेही अवघड झाले आहे. रुद्राक्ष न मिळालेले लोक पंडित मिश्रांविरोधात नारेबाजी करत आपल्यापावली माघारी जात आहेत. येथे जवळपास 10 लाख जण जमल्याचा अंदाज आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही आपला येथील प्रस्तावित दौरा रद्द केला आहे. मंडी ठाण्याचे ASI धर्मसिंह वर्मा यांनी सागितले की, महाराष्ट्रातील नाशिकच्या मालेगाव येथील मंगला बाई (50) नामक महिलेची…
ई-भूमीपुजन होणार : वाहतूक व्यवस्था व कार्यक्रमाच्या नियोजनाची घेतली माहिती जळगाव प्रतिनिधी : चोपडा आणि जळगाव तालुका वासियांना वरदान ठरणाऱ्या निम्न तापी पाडळसरे मध्यम प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या तापी नदीवरील खेडीभोकरी ते भोकर दरम्यानच्या तापी नदीवरील मोठ्या उंच ऐतिहासिक पुलाचे १३ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असून या कार्यक्रमासाठी वाहतूक व्यवस्था, बैठक व्यवस्थेसह सर्व गोष्टीचे व्यवस्थित व सुक्ष्म नियोजन करण्याच्या सुचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी घेतलेल्या आढावा बैठकीत केल्या.* अजिंठा विश्राम गृहावर मुख्यमंत्र एकनाथजी शिंदे यांच्या दाैर्याच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी अमन मित्तल, जि.प.सीईओ डाॅ.पंकज आशिया,मनपा आयुक्त विद्या गायकवाड, अपर जिल्हाधिकारी प्रवीण…
एरंडोल शहरातील कंपनीत दोन वाहनातून आलेल्या पाच दरोडेखोरांनी रखवालादाराचे हातपाय बांधून कंपनीतून कॉईल व कॉपर चोरून नेल्याच्या गुन्ह्यातील तीन गुन्हेगारांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. यात वापरलेले एक वाहन जप्त केले आहे. पुढील कारवाईसाठी तिघांना एरंडोल पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मिळालेली माहिती अशी की, शहरातील अंगारक ट्रान्सफार्मर कंपनीत १८ जानेवारी रोजीच्या मध्यरात्री दोन वाहनातून आलेल्या पाच जणांनी रखवालदाराचे हातपाय बांधून कंपनीतून कॉईल व कॉपर चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या गुन्ह्यात वापरलेले वाहन हे धुळे शहरात असल्याची गोपनिय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन…

