जळगाव- धुळे येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री पवार हे धुळे येथे विमानाने जात होते. परंतु खराब हवामानामुळे विमानाला जळगाव विमानतळावर उतरावे लागले. त्यानंतर वाहनाने ते धुळे येथे रवाना झाले.
धुळे येथे आज शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दुपारी दोनच्या सुमारास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री धुळे येथे जात होते. परंतु जोरदार पाऊस व खराब हवामानामुळे त्यांचे विमान हे जळगाव विमानतळावर उतरावे लागले. त्यामुळे प्रशासनाची एकद धावपळ झाली. प्रशासनाला तात्काळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वाहनांच्या ताफ्याची व्यवस्था करावी लागले. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे धुळ्याकडे रवाना झाले.