चोपडा (प्रतिनिधी) – घरगुती भांडणाच्या वादातून पतीने आपल्या पत्नीची संतापाच्या भरात हत्या केल्याची घटना घडल्याने शहरासह तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातल्या फुले नगरातील रहिवासी संजय पुंजू चव्हाण (वय ४८) याचे रविवारी सायंकाळी पत्नी मीराबाई चव्हाण हिच्यासोबत भांडण झाले. त्याने संतापात पत्नीवर विळ्याने वार केले. तिच्या मांडीला जखम झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला . जखमी मीराबाई चव्हाण (वय ४०) यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मीराबाईंचा मृत्यू झाला. या दाम्पत्याचा मुलगा सागर चव्हाण याच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र: तालुक्यातील खेडी येथील तरुणांचा वाढदिवस असल्याने रावेर तालुक्यातील पाल ठिकाणच्या काही अंतरावर पोहण्यासाठी उतरले असता दोन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे याबाबत वृत्त असे की, अक्षय उर्फ उज्ज्वल राजू पाटील (वय २४, रा. खेडी) या तरूणाचा 5 रोजी वाढदिवस असल्याने त्याचे सर्व मित्र हे रावेर तालुक्यातील पाल येथे गेले होते. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास हे तरूण पाण्यात पोहण्यासाठी उतरले. यात उज्ज्वल पाटील आणि त्याचा एक मित्र हे पाण्यात बुडाले. यामुळे भेदरलेल्या त्याच्या मित्रांनी तातडीने ही माहिती घरच्यांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, या तरूणांच्या नातेवाईकांनी देखील घटनास्थळी धाव घेतली असून त्यांचा शोध सुरू केला. रात्री उशीरापर्यंत या…
जळगांव प्रतिनिधी : अखिल भारतीय जिवा सेना जिल्हा जळगाव याच्या कडून 4रोजी संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली. जळगाव शहरात पॉपूलर मेन्स पार्लर टॉवर चौकात 4 रोजी 11.30वाजेला संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी समाजातील मान्यवर म.ना.म.चे राज्य संपर्क प्रमुख किशोर भाऊ सूर्यवंशी ,म.ना.म.चे जिल्हा कार्या अध्यक्ष. व माजी नगरसेवक पृथ्वीराज भाऊ सोनवणे,अखिल भारतीय जिवा सेना जिल्हा अध्यक्ष देविदास भाऊ फुलपगारे, जनता बँकेचे गणेश कॉलनी शाखा मॅनेजर बापूसाहेब महाले , पॉप्युलर मेन्स पार्लर चे बापूसाहेब जगताप , बारा बलुतेदार शहर अध्यक्ष चंद्रशेखर जी. कापडे , अखिल भारतीय जिवा सेना जिल्हा निरीक्षक…
लाईव्ह महाराष्ट्र | मध्यस्थ व दलालांच्या मार्फत नागरिकांना परस्पर भेटून रेशन कार्ड तयार करून देण्यासाठी अतिरिक्त पैशाची मागणी करून लुबाडत असल्याचा प्रकार धरणगाव तहसील कार्यालयात घडत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. या संबंधात धरणगाव तहसीलदार नितीन कुमार देवरे यांनी रेशन कार्ड बनवण्यासाठी तसेच धान्य विषयक इतर कामकाजासाठी नागरिकांनी प्रत्यक्ष धरणगाव पुरवठा शाखा अथवा माझी भेट घ्यावी. तसेच अतिरिक्त पैशांची मागणी करत असलेल्यांची तात्काळ तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.स्वस्त धान्याच्या मिळकतीसाठी नागरिक रेशन कार्ड तयार करून घेण्यास तहसील कार्यालयात येत असतात. मात्र त्या ठिकाणी मध्यस्थ व दलालांमार्फत गरजू नागरिकांची पैसे घेऊन आर्थिक लुबाडणूक केली जात असल्याचा प्रकार घडत आहे. याविरोधात तहसीलदार…
धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील चमगाव शिवारात मध्यरात्री बिबट्याने गायीवर हल्ला करून फडशा पडला आहे. हा प्रकार सकाळी उघडकीला आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील चमगाव येथील शेतकरी हनुमंतराव सावंत याचे चमगाव शिवारात शेत असून त्यांनी शेतात काल शनिवारी ४ सप्टेंबर रोजी गाय बांधली होती. दरम्यान मध्यरात्री बिबट्याने गायीवर हल्ला करून फडशा पाडला आहे. दोन दिवसांपुर्वी देखील परिसरातील काही शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले होते. आज सकाळी गायीचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर हनुमंतराव सावंत यांनी तलाठी आशिफ शेख आणि एरंडोल वनविभागाचे अधिकारी राजकुमार ठाकरे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. हा हल्ला बिबट्यानेच केल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे परिसराती शेतकऱ्यांमध्ये…
जळगाव प्रतिनिधी : येथील एका व्यवसायिक महिलेला निती आयोगाचे बनावट कागदपत्रे दाखवून प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याच्या नावाखाली ९४ लाख १४ हजार ८५३ रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, शहरातील पिंप्राळा भागातील दांडेकर नगरात खासगी व्यवसाय करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करणारी योगीता उमेश मालवी (वय-३८) ही महिला राहते. व्यवसाय करत असल्याने त्यांची अविनाश अर्जून कडमकर रा. देहठेणे ता. पारनेर जि. नगर यांच्याशी डिसेंबर २०१८ मध्ये ओळख झाली. कडमकर यांनी योगीत मालवी यांना निती आयोगाचे बनावट कागदपत्र दाखवून व बनावट नोंदणी प्रमाणपत्र दाखविले. प्रशिक्षण केंद्र चालविण्याचे आमिष…
जळगाव (प्रतिनिधी) – डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शिक्षक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक महानगर आघाडी तर्फे आपले कर्तव्य पणाला लावून शाळा बंद पण शिक्षण सुरु या उपक्रमांतर्गत शिक्षण सुरु ठेवणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयत्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ के बी पाटील हे होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी पालकमंत्री सतिष पाटील, रवींद्रभैय्या पाटील जिल्हाध्यक्ष ग्रामीण, .कल्पनाताई पाटील उत्तर महाराष्ट्र महिला विभागीय उपाध्यक्ष, अभिषेक पाटील महानगराध्यक्ष,कुणाल पवार महानगर सचिव,स्वप्निल नेमाडे शहराध्यक्ष हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोगतामध्ये माजी कुलगुरू के. बी. पाटील यांनी शिक्षकांनी आपले कार्य जबाबदारी करावे.ऑनलाईन शिक्षणाला कर सामोरे जावे या सगळ्या…
कोरोना लॉक डाऊन नंतर दि. ०१ सप्टेंबर २०२१ पासून अंधत्व निवारणात जिल्ह्यातील अग्रगण्य बहुप्रतिक्षित केशव स्मृती प्रतिष्ठान व आर. सी. बाफना फाऊंडेशन ट्रस्ट संचालित मांगिलालजी बाफना नेत्रपेढी पुन्हा जन सेवेत हजर. फक्त ५० रुपयात नेत्रतज्ञ शल्य चिकित्सकांकरवी डोळ्यांची तपासणी व माफक दरात मोतीबिंदू व इतर शस्त्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत. ठिकाण – गोलाणी मार्केट समोर, मारोती मंदिरा जवळ, जळगांव वेळ सकाळी १० ते दुपारी ०२ पर्यंत. तरी गरजू रुग्णांनी सेवेचा लाभ घ्यावा, अशी विनंती केशव स्मृती प्रतिष्ठान, सी. बाफना फाऊंडेशन ट्रस्ट, तसेच नेत्रपेढी प्रकल्प प्रमुख व संचालक यांनी केली आहे.
नवी दिल्ली वृत्तसंस्था ;- पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत. त्यांनी जगभरातील १३ नेत्यांना मागे टाकत ही लोकप्रियता मिळवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता अमेरिका, युके, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स आणि जर्मनीसह १३ देशांमधील नेत्यांच्या तुलनेत जास्त असल्याचं सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे. अमेरिकतील ग्लोबल लीडर अॅप्रूव्हल ट्रॅकर मॉर्निंग कन्सल्टने हे सर्वेक्षण केलं होतं. या सर्वेक्षणात मोदींना ७० टक्के गुणांकन मिळालंय. दर आठवड्याला या सर्वेक्षणाचा डेटा अपडेट केला जातो. पंतप्रधान मोदी मेक्सिकोचे अध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर, इटालियन पंतप्रधान मारियो ड्रॅगी, जर्मन चान्सलर अँजेला मर्केल, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, यूकेचे…
धरणगाव प्रतिनिधी : तालुक्यातील नांदेड येथील शिवारात तापी नदीचे काठी अवैधरित्या गावठी हातभट्टी दारू निर्मित अड्डा आज उध्वस्त करण्यात आला आहे. नांदेड येथील शिवारात तापी नदीचे काठी अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायनचे २०० लिटर मापाचे १२ टाक्या रसायने भरलेल्या मिळून आल्याने रसायन पंचांसमक्ष जागीच नष्ट करण्यात आलेले आहे. सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक शंकर शेळके, फौजदार करीम सय्यद, पोलीस नाईक मिलिंद सोनार, पोलीस कॉन्स्टेबल विनोद संदांशिव, प्रवीण पाटील, वैभव बाविस्कर यांनी केली.

