• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

प्रशिक्षण  केंद्राच्या नावाखाली  महिलेची ९४ लाखात फसवणूक

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
September 5, 2021
in क्राईम, जळगाव
0
प्रशिक्षण  केंद्राच्या नावाखाली  महिलेची ९४ लाखात फसवणूक

जळगाव प्रतिनिधी : येथील एका व्यवसायिक महिलेला निती आयोगाचे बनावट कागदपत्रे दाखवून प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याच्या नावाखाली  ९४ लाख १४ हजार ८५३ रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सविस्तर माहिती अशी की, शहरातील पिंप्राळा भागातील दांडेकर नगरात खासगी व्यवसाय करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करणारी योगीता उमेश मालवी (वय-३८)  ही महिला राहते. व्यवसाय करत असल्याने त्यांची अविनाश अर्जून कडमकर रा. देहठेणे ता. पारनेर जि. नगर यांच्याशी डिसेंबर २०१८ मध्ये ओळख झाली. कडमकर यांनी योगीत मालवी यांना निती आयोगाचे बनावट कागदपत्र दाखवून व बनावट नोंदणी प्रमाणपत्र दाखविले. प्रशिक्षण केंद्र चालविण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार मालवी यांना बनावट खाते क्रमांक पाठविले. अविनाश अर्जून कडमकर, प्रिती विनायक खवले, प्रमिला अर्जून कडमकर, कांचन दादाभाऊ दंगे, शिवराम आप्पाजी जासूद, संगिता शिवराम जासूद, अर्जून माधवराव सर्व रा. देहठेणे ता. पारनेर जि. नगर यांनी प्रशिक्षण केंद्र चालविण्याचे आमिष दाखवून योगीता मालवी यांच्याकडून वेळोवेळी १५ जानेवारीपर्यंत बनावट खात्यावर सुमारे ९४ लाख १४ हजार ८५३ रूपये मागवून घेतले. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर योगीत मालवी यांनी शनिवारी ४ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास रामानंद नगर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात वरील सात जणांसह इतर अनोळखी ३ जण असे एकुण १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि संदीप पाटील करीत आहे.

Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक महानगर आघाडीतर्फे शिक्षकांचा सत्कार

Next Post

चामगाव येथे बिबट्याने पाडला गायीचा फडशा; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Next Post
चामगाव येथे बिबट्याने पाडला गायीचा फडशा; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

चामगाव येथे बिबट्याने पाडला गायीचा फडशा; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ते विधेयक जनतेच्या नव्हे, तर भाजपच्या सुरक्षेसाठी ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल !
राजकारण

ते विधेयक जनतेच्या नव्हे, तर भाजपच्या सुरक्षेसाठी ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल !

July 12, 2025
सात वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य ; गुन्हा दाखल !
क्राईम

अल्पवयीन मुलाचे अश्लील व्हिडीओ काढले : दोघांवर गुन्हा दाखल !

July 12, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

बंद घराचा कडीकोयंडा तोडून ६०  हजारांचा मुद्देमाल लंपास !

July 12, 2025
१५ वर्षीय विद्यार्थ्याचा शाळेत दुर्देवी मृत्यू !
क्राईम

१५ वर्षीय विद्यार्थ्याचा शाळेत दुर्देवी मृत्यू !

July 12, 2025
मोठी बातमी : माजी मंत्री देवकर आप्पांच्या अडचणी वाढणार ; चौकशी अहवालात दोषी !
क्राईम

मोठी बातमी : माजी मंत्री देवकर आप्पांच्या अडचणी वाढणार ; चौकशी अहवालात दोषी !

July 12, 2025
जुन्या समस्येपासून या लोकांना आज मिळणार आराम !
राशीभविष्य

तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या वागण्यामुळे तुम्ही दुःखी होऊ शकता

July 12, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group