लाईव्ह महाराष्ट्र: जळगाव महानगर पालिका अंतर्गत काम करणा-या आशा-स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना कोवीड-19 प्रोत्साहन भत्ता पूर्ववत सुरू करण्यात यावा, नवीन आशा स्वयंसेविका यांना त्वरीत प्रशिक्षण देऊन 5 महिन्यांचे थकित मोबदला ईतर थकबाकी स्तवर आशांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात यावी.आशा आशयाचे निवेदन मनपा आयुक्त, महापौर, याना देण्यात आले.जळगाव महानगर पालीकेत आरोग्य विभागात आशा वर्कर्स व गट प्रवर्तक म्हणून काम करणाऱ्या महिलांना कोवीड १९, अंतर्गत शासनाने देय असतिल प्रोत्साहन भत्ता शासनाने बंद केले आहे तसेच नवीन आशा स्वयंसेविकांना प्रशिक्षण देणे अनिवार्य असतांना प्रशिक्षण दिले नाही व प्रशिक्षण अभावी सर्व आशांना त्यांना मिळणाऱ्या कामाच्या मोबदला मानधन, नाकारले आहे.महानगर पालिका अंतर्गत काम करणा-या…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव प्रतिनिधी : कौटुंबिक नैराश्यातून जिल्हा कारागृहातील बॅरेक क्रमांक २ मध्ये पंख्याला गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित अनिता राजा चावरे (वय ५०) या महिलेेने केला.धक्कादाकय घटना सोमवारी सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घडली.जिल्हा कारागृहातील बॅरेक क्रमांक २ मध्ये अल्पवयीन मुलीला पळवून तिच्यासोबत बनावट कागदपत्रांच्या आधारे लग्न केले तसेच तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्हयात भारत राजा चावरे या मुलासह अनिता चावरे या न्यायालयीन कोठडीत आहेत.न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित अनिता चावरे यांनी साडीचा पदरचा काठ कापून बॅरेकमधील पंख्याला गळफास घेण्याचा प्रयत्न केला. वेळीच प्रकार लक्षात आल्याने दुर्घटना टळली. याप्रकरणी जिल्हा कारागृहातील महिला रक्षक उषा…
जळगाव प्रतिनिधी: रविवारी सकाळी रस्त्यावर मुलांनी बापाचा खून केला तर दुसऱ्या दिवशी ही शहरातील जुने जळगावातील रथ चौकाच्या शेजारील आंबेडकर नगरातील आंबेडकर समाज भवन समोर राहणाऱ्या एका ५५ वर्षीय व्यक्तीचा डोकं ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून पोलीस घटनास्थळी पोहचले असून तपासला सुरवात झाली आहेशहरातील महत्वाच्या परिसर असलेला जुना जळगाव परिसरात असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भवन समोर राहणारे राजू पंडित सोनवणे वय-५५ यांचा ३० वर्षांपूर्वी रजिया सोनवणे यांच्याशी विवाह झाला होता. १५ वर्षांपासून दोन्ही पती-पत्नी आणि २ मुले असे लक्ष्मी नगरात स्थायिक झाले होते.राजू सोनवणे हे रिक्षा चालक होते परंतु गेल्या काही…
धरणगाव प्रतिनिधी: येथील तरडे येथे राहणारे विक्रम कौतिक पाटील याचे वृद्धपकाळाने निधन झालेविक्रम कौतिक पाटील याचे वृद्धापकाळाने दुःखद निधन 12 रोजी सायंकाळी ५ वाजता झाले. त्यांची अंत्ययात्रा आज 13 रोजी ( सोमवार) रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे.तालुका पोलीस पाटील संघटनेचे कार्याध्यक्षव तरडे गावाचे पोलीस पाटील कैलास पाटील याच्या वडील होते .
लाईव्ह महाराष्ट्र : वाढदिवसाचे बॅनर फाडल्याच्या प्रकरणात सेटलमेंट करण्यासाठी तब्बल सहा लाख रूपयांची खंडणी मागण्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत वृत्त असे की, राष्ट्रीय महामार्गावर भुसावळ ते साकेगावच्या दरम्यान बंटी पथरोड याच्या वाढदिवसाचे पोस्टर लावण्यात आले होते. यामुळे पथरोड व सहकार्यांनी साकेगाव येथील मयूर मदन काळे याला मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली. पथरोड व सहकार्यांनी त्याला पिस्तूल, चॉपर व शस्त्रांचा धाक दाखवून ५ लाख रूपये खंडणीची मागणी केली. मागणी मान्य झाल्यावर त्यास सोडले.यानंतर मयूर काळे याने सागर भोई याला ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी दोन लाख रूपये दिली. तर, या टोळक्याने मयूरला…
जळगाव प्रतिनिधी :दवाखान्यात जाण्याच्या क्षुल्लक कारणा वरून वादा झाला स्वतः च्या बापला त्याच्याच दोन्ही मुलांनी खूनकेल्याची धक्कादायक घटना शहरातील निमखेडी शिवारातील काताई नेत्रालय येथे आज १२ रोजी सकाळी घडल्याने खळबळ उडाली आहे.प्रेमसिंग अभिसींग राठोड (वय ५०) असे मृताचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निमखेडी शिवारात कांताई नेत्रालयाजवळ प्रेमसिंग राठोड हे पत्नी, दोन मुले, दोन मुली यांच्यासह वास्तव्याला होते. ते काही दिवसांपासून आजारी असल्याने आज सकाळी त्यांना त्यांची मुले दीपक आणि गोपाळ यांनी दवाखान्यात जाण्याचे सुचविले. मात्र प्रेमसिंग यांनी याला नकार दिला. यावर घरात वाद झाला. या वादातूनच प्रेमसिंग यांनी चाकू उगारून आपल्या मुलांना धमकावले.…
लाईव्ह महाराष्ट्र : रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नव्याने रुजू झाले आहे पोलीस निरीक्षक याना चोरट्यांनी घरफोडी करून आव्हान दिले असून बंद घरातून 50 हजाराची रोकड लंपास केली.याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे याबाबत पोलिस सूत्रा कडून मिळालेली माहीती अशी की , रावेर येथील शिक्षक कॉलोनी मध्ये रहिवाशी न्यना फत्तू तडवी हे बाहेर गावी गेल्या असल्याने त्यांचे घर बंद असल्याने दि .३ – ९ -२१ ते ११ – ९ -२१ च्या दरम्यान कोणी तरी अज्ञात चोरटयाने बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यानंतर त्यांनी घरातील कपाटातील पन्नास हजार रुपये रोख चोरून नेला याबाबत नयना फत्तू तडवी यांनी रावेर पोलिस…
लाईव्ह महाराष्ट्र : भुसावळ शहरातील झेडटीसी भागाजवळच्या तापी नदी पात्रात गणपती विसर्जनासाठी कुटुंबासोबत गेलेल्या मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून तिच्या भावाला वाचवण्यात यश आले आहे. झेडटीसी परिसरात मनीष यादव हे वास्तव्याला आहेत. दीड दिवसानंतर ते आज सकाळी गणेश विसर्जन करण्यासाठी झेडटीसी जवळच्या तापी नदी पात्रात पत्नी, मुलगा आणि मुलगी यांच्यासह गेले होते. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यांची मुलगी अनन्या पाण्यात गटांगळ्या खाऊ लागली. मुलगा आर्यनराज हा देखील पाण्यात उतरल्याने तो देखील बुडू लागला होता . त्यांनी आरडाओरडा केला असता परिसरातून काही जणांनी घटनास्थळी धाव घेतली. यात आर्यनराज याला वाचविण्यात यश आले असले तरी अनन्या मनीष यादव ही बालिका…
कृषी मंत्री भुसेंची संवेदनशीलतालाईव्ह महाराष्ट्र: ढगफुटीमुळे जामनेर तालुक्यात शेतीचे मोठे नुकसान झाले होते याच वादळी पावसात घरावरील पत्रे उडून बैल जखमी झाला होता. या बैलाला पशुवैद्यकांनी 30 टाके घालून त्याचे प्राण वाचविले. त्याला पाहणी कृषिमंत्री दादा भुसे थेट शेतकऱ्याच्या घरी झाले त्याला आश्वासन दिले की बैलाच्या उपचारावर होणारा खर्च शासन करेल असेही त्यांनी सांगितले. ढगफुटीसारख्या नैसर्गीक आपत्तीमुळे शेतातील पिकांचे होणारे नुकसान दुर्दैवी बाब आहे. शेतक-र्यांना त्यांच्या पीक विम्याचा मोबदला तातडीने मिळावा यासाठी कृषी व महसुल विभागाने सहकार्य करण्याच्या सुचना कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिल्यात.मंत्री दादा भुसे यांनी आज जामनेर तालुक्यातील ओझर, हिंगणे व सामरोद शिवारातील पिकांच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर…
लाईव्ह महाराष्ट्र: रेल्वे अडर पासमध्ये पाणी भरल्याने चाळीसगाव तालुक्यातील 7 ते 8 गावाचा संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे .शेतीचे नुकसान झाले त्यासाठी तात्काळ मदत मिळावी अश्या आशयाचे निवेदन कृषी मंत्र्याची गाडी अडवून भाजप कार्यकर्त्यांनी दिले. रोहिणी रेल्वे अंडर पासमध्ये पाणी तुबल्यामुळे सभोवतालच्या पिंपळगाव, राजदेरे, राजदेहरे तुका तांडा, राहदेहरे गावठाण तांडा, राजदेहरे सेटलमेंट, घोडेगाव, खराडी, शिंदी, जूनपणी,ओढरे, करजगाव, पाटणा इत्यादी गावांचा चाळीसगांव शहराशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. सभोवलच्या परिसारतील ग्रामस्थना व आजारी पेशन्टना अनेक अडचणी उद्भवत आहे. उपचराआभावी एखाद्या पेशन्ट चा जीव गेल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? त्यामुळे मंत्री मोहदयाना विनंती करण्यात आली व त्यांना रोहिणी रेल्वे गेट…

