लाईव्ह महाराष्ट्र न्यूज (प्रवीण पाटील) तालुक्यातील विटनेर शिवारात शेतात राहणाऱ्या १३ वर्षीय मुलीच्या अंगावर वीज कोसळल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना आज सायंकाळी घडली. सोनाली राजेंद्र बारेला (वय-१३) रा. विटनेर ता. जि.जळगाव असे मयत मुलीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील विटनेर येथील तरूणी विटनेर शिवारातील शेतात आपल्या कुटुंबियांसह राहायला आहे. आज २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास शेतात असतांना तिच्या अंगावर कोसळली त्यात तीचा जागीच मृत्यू झाला आहे. जळगाव येथील एस.यु.पाटील यांच्या शेतात राहणारा रविंद्र भिमसिंग बारेला यांच्याकडे साधारण एक ते दीड महिन्यापासून सोनाली राजेंद्र बारेला राहत होती. त्याच्या मृत्यूने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. विटनेर पोलिस…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भुसावल रस्त्यावर असलेल्या बोदवड शहरातील बिल्डिंग मटेरियल सप्लाय त्या दुकानातून शटर उचकटून रात्री अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सहा लाखांची रोकड घेऊन पसार झाले याप्रकरणी बोदवड पोलिसांमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.बोदवड शहरात चोरट्यांचा उच्छाद कायम असून बडगुजर यांचे भुसावळ रस्त्यावर बडगुजर ट्रेडर्स नाम बिल्डींग मटेरीयलचे दुकान असून सोमवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास तीन चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकावत दुकानात प्रवेश केला व ड्रावरमध्ये ठेवलेली तब्बल सहा लाखांची रोकड लांबवली. चोरट्यांची छबी सीसीटीव्हीत कैद झाली असून त्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. घटना सोमवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात बोदवड…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: आज दुपारच्या सुमारास रावेर तालुक्यातील विवरे खुर्द येथे विजेच्या धक्क्याने एका २५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून तिची दोन वर्षांची मुलगी जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत वृत्त असे की, आज दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन विजांच्या कडकडात पावसाला सुरुवात झाली रावेर तालुक्यातील विवरे खुर्द शेती शिवार मध्ये राजू पाटील यांच्या शेतात मजूरी करणारे वागले कुटुंब मजूरी करत होते.अचानक वातावरणात प्रचंड बदल होऊन विजा कडकड्याला लागले व मयत मुर्खी इडा वागले (वय २५) हीच्यावर विज पडून तिचा जागेच मृत्यु झाला तर तिच्या दोन वर्षीय रवीना किरकोळ जखमी झाली आहे.यामुळे वागले कुटुंबावर नैसर्गिक संकट कोसळलेले असून हातमजूरी करणारी…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज (प्रवीण पाटील) तालुक्यातील वसंतवाडी येथील नागरिकांसाठी ग्रामपंचायत मध्ये उद्या सकाळी८:३०वाजेला कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रम आयोजीत केला आहे.यासाठी नागरिकांनी आपल्या कागदपत्र सह उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.वसंतवाडी ग्रामपंचायत कार्यालयात कोरोना आजाराच्या पाश्र्वभूमीवर सकाळी ८:३०वाजेपासुन लसीकरणला सुरुवात होणार आहे .लसीकरण केंद्रावर २५०डोस उपलब्ध होतील ते सर्व लस प्रथम डोस वाल्यानसाठी असतील अशी माहिती आरोग्य विभाग आरोग्य सेवक पिंजारी यांनी दिली हे लसीकरण यशस्वी होण्यासाठी वसंतवाडी ग्रामपंचायत सरपंच वत्सलाबाई पाटील, उपसरपंच ईश्वर चव्हाण, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण सर्व ग्रामपंचायत सदस्य प्रयत्नशील राहतील. तरी आपल्या वसंतवाडीतांडा गाव व जळके येथील नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे यासाठी प्रत्येकाने…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: बाभोरी पुलावर दूचाकीने टँकरला ओव्हरटेक करताना आई व मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास घडली यात एक महिला जखमी झाली आहे.एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालय परिसरातील रहिवाशी चारुशीला राहुल पाटील , त्यांचा मुलगा निशांत राहुल पाटील आणि चारुशीला पाटील यांची बहीण रुपाली पाटील हे तिघे एम एच १९ – डी.क्यू – ३८९६ या क्रमांकाच्या ऍक्टिव्हा दुचाकीवरून एरंडोलहून जळगावला आई -वडिलांनकडे येत होते पुढे चालत असलेल्या टँकरला ओव्हरटेक करताना तोल जाऊन ते पडले आणि चारुशीला पाटील ( वय ४० ) व निशांत पाटील ( वय १२ ) हे दोघे आई व मुलगा टँकरच्या मागच्या…
खा संजय राऊत याचे नाव न घेता लगावला टोलालाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शिवसेनेचे खासदार ही विनोद वीरान सारखे बॅटिंग करीत आहेत त्यांना सांगायचे आहे की महाभारतात संजय बघितलं रंगभूमीचे युद्ध दिसत होते आणि ते निर्णय घेण्यात मात्र या संख्यांना फक्त वसुलीचा दृष्टांत पडते जमिनीचा विसर पडला आहे असा टोला आज खा संजय राऊत याचे नाव न घेता प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.जळगाव जिल्हा परिषदेला पंचायत राज कमिटी तीन दिवसीय दौऱ्यावर आलेली आहे यातील कमिटी सदस्य आमदार सदाभाऊ खोत हे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की महाविकासआघाडी मध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा विदुषकी चाळे करण्यात बरीचशी मंडळी दिसत आहे अलीकडच्या काळामध्ये…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील तडवी कॉलनी परिसरातून अज्ञात चोरट्याने मध्यरात्री घरात प्रवेश करत कपाटातील ६७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने लंपास केले. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्ताक रसुल तडवी (वय-५५) रा. तडवी कॉलनी रावेर हे खाजगी नोकरीला आहेत. २४ सप्टेंबर रोजी रात्री ११ ते २५ सप्टेंबर रोजी सकाळी ५ वाजेच्या दरम्यान सगळेजण घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने घरात शिरून घरातील लोखंडी कपाटातील सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण ६७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी मुस्ताक रसुल तडवी यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: चाळीसगाव परिसरात पावसाने २५ च्या रात्री जोरदार हजेरी लावली त्यामुळे पुन्हा कन्नड घाटामध्ये दरड कोसळली आहे. दरम्यान या घाटामधून कोणीही प्रवास करू नये, असे आवाहन महामार्ग पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.काल रात्री चाळीसगाव परिसरासह इतर अन्य भागांमध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे डोंगर भागातील तितुर व डोंगरी नदीला मोठा पूर आला आहे. दरम्यान, ३१ ऑगस्ट रोजी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे कन्नड घाटामध्ये दरड कोसळून रस्ता खचला होता. त्यामुळे काही दिवसांसाठी घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. जिल्हाप्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करून व पाहणी करून दुचाकी, हलक्या व छोट्या वाहनांच्या वाहतुकीसाठी हा घाट खुला केला होता. अवजड वाहनांना अजूनही हा घाट…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: दलित वस्ती विकास कामांची इ-निविदा प्रक्रियेत अनियमितता केली म्हणून रावेर तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या सरपंचांना व ग्रामसेवकांवर ठपका ठेवत सरपंचांना अपात्र करण्याची आणि ग्रामसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, अशी नोटिसा प्राप्त झाल्याची माहिती आहे. यामुळे चांगलीच खळबड उडाली आहे.जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य नंदकिशोर महाजन यांनी तालुक्यातील दलित वस्ती सुधार योजनेच्या इ -निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याची तक्रार केली होती. त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती नेमण्यातजामतीतील आली होती. त्या समिती मध्ये तालुक्यात झालेल्या अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांच्या वस्तीमधील विकास कार्यक्रमांतर्गत इ-निविदांमध्ये अनियमिततेबाबत चौकशीकेली गेली होती. या समितीचा…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतंर्गत जिल्ह्यातील प्राधान्य कुटूंब योजनेत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना प्राधान्याने रेशनकार्ड उपलब्ध करुन देणेसाठी नियोजनबध्द कार्यक्रम राबविण्याचे निर्देश ना. छगन भुजबळ यांनी आज दिलेत. येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात ना छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची आढावा बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, वैधमापन शास्त्र विभागाचे उपनियंत्रक बी. जी. जाधव, जिल्हा मार्केटींग अधिकारी एन. डी. मगरे, विभागीय आयुक्त कार्यालयातील तहसीलदार साहेबराव शिंदे, वैधमापनशास्त्र विभागाचे निरिक्षक सी. डी. पालीवाल, रविंद्रभैय्या पाटील आदि उपस्थित होते. यावेळी बोलतांना मंत्री भुजबळ म्हणाले की, अंत्योदय योजनेत…

