लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: गिरणा धरण आज दि. 29 रोजी दुपारी 11 वाजे पर्यंत 90 टक्के भरले असून, वरून येणार पुराच्या पाण्याचं येवा बघता आज दुपारनंतर धरण पूर्ण भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्तीचे पुराचे पाणी खालच्या बाजूस गिरणा नदीत सोडण्यात येईल, तरी नदी काठावरील नागरिकांनी नदीत जाऊ नये, तसेच गुरे ढोरे नदीजवळ नेऊ नयेत ,पुराचे पाणी 20ते 25 हजार cusecs सोडण्याची शक्यता आहे, या आधी मन्याड धरणातून 19हजार cusecs पाणी गिरणा नदीत चालू आहे, तरी सर्व नागरिकांनी सावध रहावे असे आवाहन गिरणा पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: धरणगाव तालुक्यातील कंडारी बु १४ वित्त योजने अंर्तगत झालेली सर्व काम हे कागदोपत्री झालेली असुन,वित्त योजने अंतर्गत आलेल्या पैश्याचा कुठल्याही प्रकारचे काम आमच्या ग्रामपंचायतीत झालेले नाही गावातील मजूर झालेली घरकुले सुद्धा गावात दिसत नाही ग्रामपंचायतीला आलेला सामान देखील गहाळ आहे. याबाबत सरपंच, प्र, सरपंच व ग्रामवसेक याच्यावर कठोर कार्यवाही होऊन याच्याकडून सदर कामकाज तपासून व झालेल्या भ्रष्टाचारांची चौकशी व्हावी व संबधीत लोकांनकडून ग्रामपंचायतीचे झालेल्या नुकसान भरपाई वसुल करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य मुसा सरोवर पटेल, दगा रहेमान पटेल यांनी जिल्हाधिकारी ,मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. जळगांव.,गटविकास अधिकारी पंचायत समिती, धरणगांव. याना लेखी निवेदनातून केली आहे. दगा पटेल व…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: धरणगाव तालुक्यात आलेल्या पंचायत राज समितिला पावसा अभावी व झुरखेडा गावात जाता आले नसल्याने धरणगाव पंचायत समिती येथे झालेल्या सभेत झुरखेडा गावातील विविध विकास कामांमध्ये झालेला भ्रष्टाचार सुरेशआप्पा पवार (पाटील) यांनी मांडला. याची पंचायत राज च्या समितीने दाखल घेतली आहे. याबाबत माहिती अशी की, गावातील ग्रामपंचायत मार्फत केलेल्या काम व त्यावरील खर्च, शौचालयात केलेला भ्रष्टाचार,१४ वा वित्त आयोगाच्या पैश्याची अफरातफर, मागील ग्रामसेवक यांचेकडून दप्तर गहाळ कसे झाले, दलित वस्तीत व गावातील वस्तीत केलेल्या निकृष्ट कोक्रेटिकरण याची चौकशी,भूमीगत गटार यामध्ये केलेले निकृष्ट दर्जाचे गावात केलेली कामे,गावात बांधलेल्या जिममधील सामानच गायब होणे, चौकशी,लेखा परीक्षण अहवाल,अपंग व्यक्तीसाठी किती निधी खर्च…
प्रतिनिधी:(प्रवीण पाटील) वाकडी येथे स्वर्गीय राजु भाऊ वाघ यांच्या धर्मपत्नी श्रीमती राधाबाई वाघ सरपंच ग्रुप ग्रामपंचायत मार्फत भव्य आरोग्य शिबिर आयोजित केले आहे. व गावातील नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्या असेही आव्हानकरण्यातआले आहे.म्हसावद येथील आरोग्य केंद्राचे वैद्यकी अधिकारी डॉ.सागर वनाशिककर व डॉ.प्रशांत गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसावद येथील उपकेंद्र आरोग्य सेविका वर्षा लढे, आरोग्य सेवक पि.एम.गढरी व आशा सेविका सौ.आशाबाई ईश्वर पाटील हे सर्व कर्मचारी काम करतील यांना ग्रामपंचायत उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य हे सहकार्य करीत आहे. लसीकरण यशस्वी व्हावे यासाठी बबन राजु वाघ , ईश्वर पाटील, प्रविण पाटील,राजु मोरे व रतिलाल सोनवणे हे मेहनत घेत आहेत सदर लसीकरण हे वाकडी…
प्रतिनिधी (अमोल पाटील) पाळधी येथे लांब पल्याच्या गाड्या थांबविण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पाटीॅच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतिने विभागीय नियंत्रक याना दिले.धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे नाशिक धुळे सुरत व अकोला शेगांव नागपुर कडे जाणार्या लाब पल्यांच्या बसेस पाळधी येथिल बायपास च्या पुढील प्रिटीग प्रेस जवळ दोन्ही बाजुचा बसेस यांना थांबा मिळण्यांसाठी रा.काॅ.पाटीॅ.सामाजिक न्याय विभागाचे जळगांव जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी यांचा निवेदनाद्वारे शिष्टमंडळाने विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांना केली या वेळी अशोकभाऊ लाडवंजारी अशोक आप्पा सोणवने सुनिल माळी यांनि भेट घेऊन दिली.यावेळी जळगांव विभाग नियंत्रक भगवान जगनोर यानी तात्काळ प्रश्न मागीॅ लावण्यांचे आश्वासन दिले.
प्रतिनिधी(लक्ष्मण पाटील) येथील पष्टाणे खु. गावात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवसाच्या निमित्ताने “कवयित्री बहिणाबाई चौधरी ग्राम वाचनकट्टा” चे उदघाटन २८ रोजी करण्यात आले.प्रसिद्ध कवी प्रा. वा. ना. आंधळे यांच्या हस्ते आणि डॉ. के. एम.पाटील, एन. एस. एस. चे विभागीय समन्वयक डॉ. एस. बी. शिंगाणे सरपंच शिवाजी देवचंद भिल, माजी सरपंच किशोर निकम यांच्या हस्ते करण्यात आले. वाचन म्हणजे केवळ पुस्तकं वाचन नाही तर आयुष्य जगण्यासाठी आवश्यक असणारे साधन असल्याचे प्रतिपादन प्रा. आंधळे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. सदर ग्राम…
प्रतिनिधी(प्रवीण पाटील) तालुक्यातील वावडदा येथील पुलाचे बांधकाम सुरू असल्याने कच्च्या रस्त्याने वाहतूक सुरू होती मात्र आज सायंकाळी झालेल्या पावसामुळे रस्ताच वाहून गेल्यामुळे पाचोरा जळगाव रोडावर ची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असल्याने नागरिकांचा खोळंबा निर्माण झाला आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की आज सायंकाळी ७:३०सुमारास वावडदा परिसरात जोरदार झालेल्या पावसामुळे बिलखेडा शिवारात भालाआबा यांच्या शेताजवळील पुलाचे बांधकाम सुरू होते. त्याठिकाणी वाहतुकीसाठी साइडला कच्चा रस्ता तयार केलेला होता तो या जोरदार पाऊसामुळे वाहुन गेल्याने पाचोरा जळगाव वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळें. नागरिकांची दोन्ही तालुक्यांमध्ये होणारी ये जा थांबली आहे.
प्रतिनिधी(प्रवीण पाटील) येथील सुनिल जगदेव बोबडे वय वर्षे ४० याने मानसिक तणावातून १० रोजी विश प्राशन केल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता त्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की सुनिल जगदेव बोबडे नैराश्यातुन १०सप्टेंबर रोजी विष प्राशन केल्याने त्यांना विटनेर पोलिस पाटील डॉ.साहेबराव धुमाळ व नातेवाईक यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते अखेर २७सप्टेबरला रात्री १२वाजेनंतर त्यांची मृत्यूशी झुंज संपली.सुनिल बोबडे यांचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झालेला होता त्याच्या पश्चात आई रुख्माबाई बोबडे मोठा भाऊ राजु बोबडे व एक लहान भाऊ असा परिवार आहे सुनिल बोबडे यांच्याकडे २एकर शेती आहे मात्र त्यांचेवर कोणतेही कर्ज…
अनेक तालुक्यांच्या पाण्याचा प्रश्न सुटणारजळगांव जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा पाणीपुरवठा सह शेती शिवार ज्या पाणीवर अवलंबून असलेले गिरणा धरण (Girna dam) रात्रीपासून सुरु असलेल्या सतत धार पावसामुळे आज ८० टक्के भरले असून जिल्यातील पाच तालुक्यासह शेतीचा देखील काही प्रमाणात पाणी प्रश्न मिटला आहे.चाळीसगाव, भडगाव, पाचोरा , एरंडोल ,धरणगाव व अमळनेर सह जळगाव जिल्ह्यातील काही गावांना पाणीपुरवठा करणारे गिरणा धरण शंभरीकडे वाटचाल करत आहे, काल नाशिक जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असल्यामुळे गिरणा धरण 80 टक्के भरले आहे. त्यामुळे प्रशासनातर्फे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
धरणगाव प्रतिनिधी(लक्ष्मण पाटील) महान क्रांतिकारक, शहीदे आजम भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त शहीद भगतसिंग गणेश मित्र मंडळाच्या वतीने भगतसिंग यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुष्पांजली अर्पण करण्यात आली.याप्रसंगी लोकसभा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र महाजन, नगरसेवक विनय भावे, नगरसेवक भागवत चौधरी, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, विकल्प ऑर्गनायझेशनचे लक्ष्मण पाटील सर, तृप्ती रेस्टॉरंट चे संचालक प्रथम सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते नामदेव मराठे, प्रफुल पवार, हेमंत चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रम प्रसंगी लक्ष्मण पाटील व गुलाबराव वाघ यांनी आपल्या मनोगतातून शहीद भगतसिंग यांना आदरांजली अर्पण केली. याप्रसंगी भानुदासआप्पा विसावे यांच्या कडून मंडळाला दिलेल्या स्पिकर सेट…

