प्रतिनिधी प्रविण पाटील: तालुक्यातील जळके गावातील वसंत वाडी गावठाण येथील पंचर दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील साहित्य चोरून पसार झाले. तालुक्यातील जळगाव जळके येथे बुधवारी रात्री १:३०च्या सुमारास चोरट्यांनी जळके गावालगत वसंतवाडी गावठाण समोरील मन्साराम शिवराम पाटील यांच्या मालकीच्या पंचर दुकानांचे अज्ञात चोरट्यानी कुलुप तोडुन दुकानातील पिटर मशिन (डिझेल पंप),हिटींग मशिन व गाडीचे चाक खोलणयासाठी लागणारे पाहन्यांचा संच घन,हातोडा अशा वस्तू चोरट्यांनी लांबविल्या आहेत. याच रात्री चोरट्यांनी वसंतवाडी तांडा येथे देखील टपरी फोडल्याची माहिती मिळते पंचर दुकान मालकाने म्हसावद पोलिस दुरक्षेत्र गुन्हा दाखल केल्याचे समजते या घटनेची माहिती मिळताच पोलिस पाटील संजय चिमणकारे यांनी पाहणी केली.
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
प्रतिनिधी प्रवीण पाटील: तालुक्यातील जळके येथील बंधारा आहे त्या बंधाऱ्याला गेल्या दोन ते तीन झालेल्या अतिवृष्टी मुळे सिमेंट बांधच्या दोन्ही बाजु या कोरल्या गेल्या आहेत त्यामुळे पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने भविष्यात पाणी प्रश्न निर्माण होऊ शकतो. पाणी थांबविण्यासाठी मागणी होत आहे.जळके तालुक्यात जळगाव येथील नदिवर पाणी अडविण्यासाठी सन २००१/२००२च्या सुमारास सिमेंट बंधारा बांधला गेला आहे या बंधाऱ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतीतील विहिरीसाठी व जळके पाणीपुरवठा करणाऱ्या विहीरीसाठी चांगला फायदा होतो .मात्र दिनांक २७,२८सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे या सिमेंट बांधच्या दोन्ही बाजु या कोरल्या गेल्या आहेत एका बाजूचा भराव वाहुन गेला आहे त्यामुळे या साठवण बंधाऱ्यातुन पाण्याचा विसर्ग मोठ्या…
प्रतिनिधी लक्ष्मण पाटील : आणि पाणी या दोन शब्दांचा अतिशय जिव्हाळ्याचा संबंध नेहमीच पहायला मिळतो. एरवी पाण्यामुळे शितलता प्राप्त होते परंतु इकडे मात्र पाणी प्रश्नावरून अनेकदा वातावरण तप्त झाल्याचा अनुभव धरणगावकर जनता नेहमीच घेत असते. मात्र मागील काही दिवसांपासून ४ ते ५ दिवसांआड होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे धरणगावकर जनता सुखद अनुभव घेतेय. याबाबत सविस्तर माहिती अशी की दोन महिन्यांपूर्वी शहरात १५ ते २० दिवसात पाणी पुरवठा होत होता. घरातील अगदी शेवटच्या भांड्यातील पाणी संपेपर्यंत काटकसरीने पाण्याचा वापर करावा लागत होता. काही दिवसांपासून मात्र हाच पाणीपुरवठा ४ ते ५ दिवसांच्या आत होतोय. पाण्याची साठवण क्षमता असलेल्या भांडयांपैकी निम्मे भांडी सुध्दा खाली होत नाही…
प्रतिनिधी प्रवीण पाटील: जिल्ह्यात 27 व 28 रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं अनेकांचे नुकसान झाले आहे यात तालुक्यातील वसंत वाडी मोठ्या प्रमाणात मातीच्या घरांची पडझड झालेली आहे गावातील घरांचे पंचनामे व्हावे यासाठी पोलीस पाटील यांची वारंवार संपर्क करीत आहेत.वंसतवाडी या.जळगाव येथे दिनांक २७,२८ सप्टेंबर झालेल्या मुसळधार पावसामुळे या गावात मातीच्या घरांची पडझड झाली आहे. यासाठी येथील नागरिकांना प्रतिक्षा आहे शासकीय मदतीची या गावात मातीच्या काही घरांच्या भिंती कोसळल्या आहेत यात वसंतवाडी तांडा येथे अरुण काळु चव्हाण,सदा ज्योतीराम जाधव ,वसराम गणपत राठोड,राजु रतन राठोड,इंद्र हजारी चव्हाण, रामदास ताराचंद चव्हाण,ईंदल गोविंदा चव्हाण तर वसंतवाडी प्लांट भागात बालु पोपट पाटील, शोभाबाई प्रभाकर पाटील…
प्रतिनिधी (भाईदास पाटील) धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथे ब्राह्मण एक कुटुंब राहते गेल्या दोन-तीन दिवसापासून जोरदार पावसाने हजेरी लावलेली असल्याने काल मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घराची भिंत मागील बाजूस पडली यामुळे जीवित हानी झाली नाही मात्र ब्राह्मणे कुटुंब उघड्यावर आले आहेत.सततधार पाऊसामुळे श्यामराव भागवत ब्राह्मणे (४५) यांच्या राहत्या घराची भिंत काल मध्यरात्री १.३० सुमारास कोसळली यात सुदैवाने संपूर्ण कुटुंब बचावले आहे.भिंत ही मागील बाजूस पडल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या घटनेत श्यामराव भागवत ब्राह्मणे यांचे मोठे भाऊ रामभाऊ भागवत ब्राह्मणे व आई हे सुदैवाने दुर्घटनेतून बचावले. श्यामराव ब्राह्मणे यांची परिस्थिती गरिबीची आहे त्यातच घराची मातीची भिंत कोसळली यात ते हवालदिल झाले…
जास्त नुकसानीच्या परिसरात सरसकट पंचनामे तर आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदतीचेही निर्देश !लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले असून याचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. जास्त नुकसानी झालेल्या परिसरात सरसकट पंचनामे करून आपत्तीग्रस्तांना शासकीय नियमानुसार मदत प्रदान करण्याचे निर्देशही ना.गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे.याबाबत माहिती अशी की, जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून बर्याच ठिकाणी अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने चाळीसगाव आणि पाचोरा तालुक्यात पुन्हा एकदा महापूर आला असून इतर तालुक्यांमध्येही मुसळधार पावसामुळे शेतीची मोठी हानी झाली आहे. जिल्ह्यातील वाघूर, बोरी आणि अंजनी ही धरणे…
प्रतिनिधी (अमोल पाटील) नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे चांदसर, रेल, लाडली या गावांत घरांची पडझड झालेली असून गावांमधील शेतीशिवारात पुराचे पाणी घुसलेले आहे. शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीची सर्व कल्पना पालकमंत्री यांनी दिला असून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे असल्याचे जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना शेतकरी ग्रामस्थ अस्वस्थ केले. अतिवृष्टी झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी भल्या पहाटे जिप सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील अधिकाऱ्यांना घेऊन त्या गावांमध्ये पोहोचले व तेथील ग्रामस्थांना धीर दिला. जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांना परिस्थितीबाबत अवगत केले असता त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळविण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू आहे .याप्रसंगी रेल येथील…
धरणगाव प्रतिनिधी: लाईव्ह महाराष्ट्र न्यूजचे धरणगाव तालुका प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल लक्ष्मण पाटील सरांचा येथील शहीद भगतसिंग मित्र मंडळातर्फे व GSA स्कुलमध्ये सत्कार करण्यात आला. शहीद भगतसिंग मित्र मंडळ व सर्व मित्र परिवाराने लक्ष्मण पाटील यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी शहीद भगतसिंग मित्र मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन भागवत, आनंद मानकर, खुशाल मांडगे, सुशांत सनानसे, अमोल सोनार, मयूर बागुल, प्रशांत जगताप, राज जगताप आदी सर्व उपस्थित होते.
धरणगाव प्रतिनिधी: येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुल चे उपशिक्षक लक्ष्मण पाटील यांची लाईव्ह महाराष्ट्र न्यूज च्या तालुका प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल शाळेत त्यांचा सत्कार करण्यात आला. गुड शेपर्ड स्कुल चे उपक्रमशील शिक्षक लक्ष्मण पाटील यांची लाईव्ह महाराष्ट्र न्यूज च्या तालुका प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे आणि शाखा व्यवस्थापक जगन गावित यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, माध्यमिक च्या मुख्याध्यापिका नाजनिन शेख, जेष्ठ शिक्षिका भारती तिवारी, अनुराधा भावे, स्वाती भावे, पूनम कासार, शिरीन खाटीक, ग्रीष्मा पाटील, गायत्री सोनवणे, सपना पाटील, लक्ष्मण पाटील, अमोल सोनार हे सर्व…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: वरणगाव नगरपरिषदेच्या मनमानी कारभाराला कंटाळलेल्या शिवाजीनगरातील नागरिकांनी आज नगरपरिषदेवर डफडी बजाव मोर्चा काढला होता. भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरातील शिवाजीनगर मधील खालील भागांमध्ये रस्ते, गटारी, पिण्याच्या पाण्याची समस्या आरोग्याची समस्या याकडे नगरपरिषदेने दुर्लक्ष केले आहे, सध्या पावसाळा सुरु असून रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे, त्यामुळे या ठिकाणच्या रहिवाशांना ये-जा करण्यासाठी अत्यंत हालअपेष्टा सहन करावा लागत आहेत. पिण्याचे पाणी वेळेवर येत नाही आरोग्यासाठी असणाऱ्या सुविधांचा याठिकाणी आभाव आहे, वारंवार नागरिकांनी नगर परिषदेला निवेदने देऊनही याकडे नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी मात्र दुर्लक्ष केले आहे. म्हणून आज स्थानिक रहिवाशांनी वरणगाव नगरपरिषदेवर डफली वाजवत मोर्चा काढला, आणि नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

