लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मुलीला भेटण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याच्या बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून सोन्याचे दागिन्यांसह रोकड असा एकुण १ लाख ४२ हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना आज ३० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. सविस्तर माहिती अशी की, फारूख अब्दुल गफुर देशमुख (वय-६०) रा. नशेमन कॉलनी, केजीएन दुध डेअरी जवळ मास्टर कॉलनी हे पत्नी नाहीदाबी देशमुख यांच्यासह राहतात. घरातच किरकोळ किराणा विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात दरम्यान, मंगळवार २७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता भुसावळ तालुक्यात वरणगाव येथे राहत असलेली मुलगी हिना पटेल यांच्याघरी भेटण्यासाठी जळगावातील घराला कुलूप लावून गेले…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : खडसे साहेब अनेक दिवसांपासून बेछूट आरोप करीत आहे यापूर्वी सुद्धा त्यांनी विविध आरोप केले आहेत आर्थिक विषय असतील वेगवेगळ्या विषयांवर असतील नियमित त्यांचे बोट जामनेर कडे दाखविले आहे मात्र ते कधीच नाव घेत नसायचे त्यांचा इशारा सर्वांना समजायचं मात्र त्यांनी खोटे गुन्हे दुःख दाखल करण्यापर्यंत मजल गेली व मौका लावण्याचाही प्रयत्न केला गेला यामुळे मला त्यांचा राग नाही कीव येते त्यांची इतकी केविलवाणी परिस्थिती झाली की राष्ट्रवादीत गेले मंत्री होणार पण साधे आमदार होतानाही आले असाही टोलाआ गिरीश महाजन यांनी यावेळी लगावला.पत्रकारांशी संवाद साधताना आमदार गिरीश महाजन म्हणाले की त्याची परिस्थिती किती केविलवाणी झाले की मतदारसंघात…
प्रतिनिधी (प्रविण पाटील) सकाळी ४:.३०वाजता या परिसरात विजांच्या गडगडासह जोरदार झालेल्या पावसामुळे जळके विद्युत उपकेंद्राचा विज पुरवठा खंडीत झाला आहे.त्यामुळे या विद्युत उपकेंद्राअंतर्गत येणारे जळके, वसंतवाडी,विटनेर,वराड,सुभाषवाडी व लोणवाडी येथील विजपुरवठा बंद आहे तरी सकाळी ९वाजेपासुन महावितरण कंपनीचे विद्युत कर्मचारी शिवाजी काळे, दिनेश पाटील व अमोल भगत हे झालेला बिघाड शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.या कर्मचाऱ्यांना वनविभागाच्या हद्दीतील खांबावर काही पिनांची तुटफुट झालेली आढळून आली त्यांनी त्या पिना बदलल्या देखील मात्र तरीही विजपुरवठा सुरळीत झाला नाही हे कर्मचारी विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत मात्र नेमका बिघाड झाला कोठे हे समजु शकले नाही.त्यामुळे या विद्युत उपकेंद्राचा विज पुरवठा सुरळीत होण्यासाठी विलंब…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: 2 ऑक्टोंबर शनिवार रोजी महात्मा गांधी,व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त भाजपा जिल्हा महानगर तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर च्या वतीने 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोंबर पर्यंत सेवा समर्पण अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून उद्या दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री याची जयंती निमित्ताने सकाळी ८ वाजता महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळयाला माल्यार्पण करण्यात येईल फुले मार्केट परीसर येथे स्वछता अभियानाची सुरवात ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे (राजु मामा) महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी,स्थायी सभापती राजेंद्र घुगे पाटील, गटनेते भगत बालाणी व पदाधिकारी यांच्या उपस्थित सुरवात करण्यात येईल…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव तालुक्यातील 20 महिलांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत प्रत्येकी 20 हजार याप्रमाणे 4 लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात वाटप करण्यात आले. राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेतंर्गत दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील 18 ते 59 वर्षे वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटूंबियांना 20 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. त्यानुसार आज तालुक्यातील 20 महिलांना प्रत्येकी 20 हजार रुपये याप्रमाणे एकूण 4 लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. या अर्थसहाय्यतून मुलांच्या शैक्षणिक व आवश्यक बाबींवर खर्च करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी उपस्थित महिलांना केले.असे आहेत पात्र लाभार्थीदापोरा…
प्रतिनिधी(लक्ष्मण पाटील) धरणगाव येथील पारधी वस्ती मधील अवैध दारु विक्री बंद व्हावी या मागणीसाठी पोलीस स्थानकात गेलेल्या नागरिकांनी पोलिसांनी त्यांच्या मागणीची दखल न घेतल्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे उपस्थित नागरिकांनी रात्री एकच्या सुमारास रस्ता रोको केल्याची घटना घडली. याबाबत वृत्त असे की, काल रात्री एक वाजेच्या सुमारास धरणगाव पोलीस स्टेशनच्या समोर महिला व नागरिक पारधी वाडा मधल्या महिला व पुरुष यांनी आपल्या भागातील अवैध दारू विक्री संदर्भात धरणगाव पोलीस स्टेशनकडे तक्रार देण्यासाठी आलेले होते.पोलीस स्टेशन मधील कर्मचार्यांनी त्यांची कोणतीही दखल न घेता सकाळी बघू असे सांगत याबाबत टाळाटाळ केली. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी शहरातून जाणार्या मुख्य रस्त्यावर ठिय्या मांडत ‘रस्ता रोको’…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 2 ऑक्टोबर शनिवारी सायंकाळी पाच वाजता देशव्यापी सार्वजनिक ऑनलाईन आत्मसाक्षात्कार कार्यक्रम 17 भाषांमध्ये विनामूल्यआयोजित केलेला आहेहा कार्यक्रम sahajayoga.org.in/live याच्यावर पाहू शकाल व लर्निंग सहयोग जगा यूट्यूब चैनल वर लाईव्ह प्रसारित होणार आहे.कार्यक्रमाची पाच सत्रांमध्ये विभागणीकार्यक्रम पाच सत्रांमध्ये विभागला गेलेला आहे सकाळी नऊ ते दहा या वेळामध्ये संस्कृत, आणि उर्दू भाषेत होईल , हिंदी, तेलगू, तमिल, आणि गुजराती या भाषेत दहा ते अकरा या वेळेत प्रसारित होईल, अकरा ते बारा बंगाला, कन्नड मल्यालम, अस्मि या भाषेत प्रसारित होणार आहे. 12 ते 1 मराठी, पंजाबी, भोजपुरी, उडिया या भाषांमध्ये प्रसारित होणार…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज:- शिवसेना ही बंडखोर संघटना आहे, घरातून ,कुटुंबातून ,पोलिसांकडून आणि इतर प्रस्थापित पक्षांकडून शिवसेना त्या काळात कशी संपेल असा सगळा प्रयत्न झाला. शिवसेनेचा एकही सरपंच, जि.प. व पं.स सदस्य किंवा आमदार की खासदार नसतानाही शिवसेना जिवंत ठेवली ती केवळ बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचारांनी.शिवसेनेला संपविण्याची वल्गना करणार्यांचे जनतेने गर्वहरण केले. मुक्ताईनगर तालुक्यात 30 च्या रात्री ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात आमदार चंद्रकांत पाटील यांनी सर्वांनी पुन्हा सक्रीय होण्याची साद घातली. मुक्ताईनगर शहरातील जुन्या काळात अतिशय खस्ता खाऊन शिवसेनेची ज्योत कायम तेवत ठेवणार्या जेष्ठ शिवसैनिकांची महत्वपूर्ण बैठक शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या शिवनेरी या निवासस्थानी काल रात्री ८ वाजेच्या सुमारास मोठ्या…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मुंबई-पुणे सारख्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध असल्यामुळे महिला पुरुष हे आपलं आत्मविश्वास दाखवू शकतात मात्र रुलर भागातील शहरांमध्ये सुंदरता आत्मविश्वास हुशारी या सर्व गोष्टी असल्यावरही ते दाखवण्यात ते सक्षम नसतात त्यामुळेच हे व्यासपीठ आपण निर्माण केले आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण काही चेहरे सिलेक्ट करणार असून त्यांना चित्रपट वेबसाईट मिस्टर इंडिया मिसेस इंडिया असे व्यासपीठावर पाठवणार असल्याचे गौरा मिसेस मिस्टर खानदेश चे आयोजन करणाऱ्या गौरी नाईक यांनी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज शी चर्चा करताना सांगितले. खानदेश मॉल येथे आज गौरा मिसेस मिस्टर खान्देश या बॅनरखाली एक फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी मिसेस इंडिया रनअप राहिलेल्या गौरी…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: अजिंठा चौकाजवळील एक भागात भाड्याच्या खोलीत सुरू असलेल्या कुटंनखान्यावर एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने आज छापा मारला. या ठिकाणाहुन एक महिला व दोन दलालांना ताब्यात घेण्यात आले. तीन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली.याबाबत महिती अशी की, अजिंठा चौफुलीजवळील एकाच्या घरात महिला भाड्याने राहत होती. महिलेने या घरात कुटंनखाना सुरू केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रमोद कठोरे, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, गफार तडवी, सुनिल सोनार, हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, नीलेश पाटील, महेश महाले, रवींद्र मोतीराया यांच्या पथकाने एक बनावट ग्राहकाच्या माध्यमातून कुंटनखान्यात प्रवेश केला. यावेळी तेथे तीन पिडीत महिला मिळुन आल्या. त्यांची सुटका करण्यात आली. तरअमोन…

