प्रतिनिधी (भाईदास पाटील) धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथे ब्राह्मण एक कुटुंब राहते गेल्या दोन-तीन दिवसापासून जोरदार पावसाने हजेरी लावलेली असल्याने काल मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घराची भिंत मागील बाजूस पडली यामुळे जीवित हानी झाली नाही मात्र ब्राह्मणे कुटुंब उघड्यावर आले आहेत.सततधार पाऊसामुळे श्यामराव भागवत ब्राह्मणे (४५) यांच्या राहत्या घराची भिंत काल मध्यरात्री १.३० सुमारास कोसळली यात सुदैवाने संपूर्ण कुटुंब बचावले आहे.भिंत ही मागील बाजूस पडल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या घटनेत श्यामराव भागवत ब्राह्मणे यांचे मोठे भाऊ रामभाऊ भागवत ब्राह्मणे व आई हे सुदैवाने दुर्घटनेतून बचावले. श्यामराव ब्राह्मणे यांची परिस्थिती गरिबीची आहे त्यातच घराची मातीची भिंत कोसळली यात ते हवालदिल झाले…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जास्त नुकसानीच्या परिसरात सरसकट पंचनामे तर आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदतीचेही निर्देश !लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले असून याचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. जास्त नुकसानी झालेल्या परिसरात सरसकट पंचनामे करून आपत्तीग्रस्तांना शासकीय नियमानुसार मदत प्रदान करण्याचे निर्देशही ना.गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे.याबाबत माहिती अशी की, जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून बर्याच ठिकाणी अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने चाळीसगाव आणि पाचोरा तालुक्यात पुन्हा एकदा महापूर आला असून इतर तालुक्यांमध्येही मुसळधार पावसामुळे शेतीची मोठी हानी झाली आहे. जिल्ह्यातील वाघूर, बोरी आणि अंजनी ही धरणे…
प्रतिनिधी (अमोल पाटील) नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे चांदसर, रेल, लाडली या गावांत घरांची पडझड झालेली असून गावांमधील शेतीशिवारात पुराचे पाणी घुसलेले आहे. शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीची सर्व कल्पना पालकमंत्री यांनी दिला असून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे असल्याचे जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना शेतकरी ग्रामस्थ अस्वस्थ केले. अतिवृष्टी झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी भल्या पहाटे जिप सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील अधिकाऱ्यांना घेऊन त्या गावांमध्ये पोहोचले व तेथील ग्रामस्थांना धीर दिला. जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांना परिस्थितीबाबत अवगत केले असता त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळविण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू आहे .याप्रसंगी रेल येथील…
धरणगाव प्रतिनिधी: लाईव्ह महाराष्ट्र न्यूजचे धरणगाव तालुका प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल लक्ष्मण पाटील सरांचा येथील शहीद भगतसिंग मित्र मंडळातर्फे व GSA स्कुलमध्ये सत्कार करण्यात आला. शहीद भगतसिंग मित्र मंडळ व सर्व मित्र परिवाराने लक्ष्मण पाटील यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी शहीद भगतसिंग मित्र मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन भागवत, आनंद मानकर, खुशाल मांडगे, सुशांत सनानसे, अमोल सोनार, मयूर बागुल, प्रशांत जगताप, राज जगताप आदी सर्व उपस्थित होते.
धरणगाव प्रतिनिधी: येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुल चे उपशिक्षक लक्ष्मण पाटील यांची लाईव्ह महाराष्ट्र न्यूज च्या तालुका प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल शाळेत त्यांचा सत्कार करण्यात आला. गुड शेपर्ड स्कुल चे उपक्रमशील शिक्षक लक्ष्मण पाटील यांची लाईव्ह महाराष्ट्र न्यूज च्या तालुका प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे आणि शाखा व्यवस्थापक जगन गावित यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, माध्यमिक च्या मुख्याध्यापिका नाजनिन शेख, जेष्ठ शिक्षिका भारती तिवारी, अनुराधा भावे, स्वाती भावे, पूनम कासार, शिरीन खाटीक, ग्रीष्मा पाटील, गायत्री सोनवणे, सपना पाटील, लक्ष्मण पाटील, अमोल सोनार हे सर्व…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: वरणगाव नगरपरिषदेच्या मनमानी कारभाराला कंटाळलेल्या शिवाजीनगरातील नागरिकांनी आज नगरपरिषदेवर डफडी बजाव मोर्चा काढला होता. भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरातील शिवाजीनगर मधील खालील भागांमध्ये रस्ते, गटारी, पिण्याच्या पाण्याची समस्या आरोग्याची समस्या याकडे नगरपरिषदेने दुर्लक्ष केले आहे, सध्या पावसाळा सुरु असून रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे, त्यामुळे या ठिकाणच्या रहिवाशांना ये-जा करण्यासाठी अत्यंत हालअपेष्टा सहन करावा लागत आहेत. पिण्याचे पाणी वेळेवर येत नाही आरोग्यासाठी असणाऱ्या सुविधांचा याठिकाणी आभाव आहे, वारंवार नागरिकांनी नगर परिषदेला निवेदने देऊनही याकडे नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी मात्र दुर्लक्ष केले आहे. म्हणून आज स्थानिक रहिवाशांनी वरणगाव नगरपरिषदेवर डफली वाजवत मोर्चा काढला, आणि नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कोरोना मुक्त भारत अभियानास गती देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने लसीकरण शिबीर तिळवण तेली समाज मंदिर,तेली तलाव जवळ,धरणगाव येथे आयोजित केले होते.या शिबिराचे रामकृष्ण भगवान महाजन(माळी समाज अध्यक्ष),.भिका राजाराम चौधरी(चौधरी समाज माजीअध्यक्ष),.पांडुरंग माणिक मराठे(मराठे समाज अध्यक्ष),पुरुषोत्तम विष्णुसा सुतारे(स.क्षत्रिय समाज अध्यक्ष),.भिमराज अर्जुन पाटील(पाटील समाज अध्यक्ष),हरिश्चंद्र भगवान भावसार(भावसार समाज अध्यक्ष),सागर कासार(कासार समाज सचिव ) इत्यादी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर सर्व समाज बांधवांच्या हस्ते भारतमातेचे पूजन करण्यात आले. तसेच शिबिराच्या उदघाटनास आलेल्या मान्यवरांचा पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सुनिल भाऊ चौधरी मित्रपरीवाराने सत्कार केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर ठाकरे यांनी केले.यावेळी प्रमुख मान्यवर भाजप जिल्हाउपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील,जेष्ठ नेते सुभाष…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भुसावळ तालुक्यातील किन्ही येथे पावसामुळे घराचे नुकसान झाल्याने उघड्यावर आलेल्या कुटुंबाला जिल्हा परिषद सदस्य रविंद्र नाना पाटील यांनी स्वतः आर्थिक मदतीचा हात दिला असून प्रशासनाला देखील सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील यांनी दिलेल्या आधारामुळे रस्त्यावर आलेल्या या कुटुंबाला जगण्याचा आधार मिळाला आहे. याबाबत माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. भुसावळ तालुक्यातील किन्ही येथील बाळू चावदस कोळी यांच्या घराची भिंत कोसळली. त्यामुळे हे कुटुंब उघड्यावर आले. या घरातील कर्ता पुरुष बाळू कोळी हे असाध्य रोगाने त्रस्त असून त्यांची पत्नी दिव्यांग आहे. हे कुटुंब अत्यंत गरीब असून त्यांची हलाखीची परिस्थिती…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: चाळीसगाव तालुक्यातील गोरखपूर तांडा येथील २५ वर्षीय तरूण हा शेतात जात असतांना डोंगरी नदीत वाहून गेल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीला आली आहे. बेपत्ता झालेल्या तरूणाचा शोध कार्य प्रशासनाकडून केले जात आहे. याबाबत माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील गोरखपूर तांडा येथील सोमनाथ रामजी राठोड (वय- २५) हा तरूण सकाळी सुमारास शेतात गेलेला असताना गावालगत असलेल्या डोंगरी नदीच्या पात्रात वाहून गेल्याची घटना आज बुधवारी २९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सोमनाथ रामजी राठोड या तरूणाचा…
जिल्हाधिकारी अभिजित राऊत लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्ह्यातील गावे, वस्ती आणि रस्त्यांची नावे जातीवाचक असल्यास ती बदलून अशी सर्व गावे, वस्ती आणि रस्त्यांना महापुरुष व लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्याची कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत. सामाजिक न्याय विभागाने जातीवाचक नावे बदलण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर गठित जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील आदी बैठकीस उपस्थित होते. जिल्हाधिकारी राऊत म्हणाले, सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता…

