लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतंर्गत जिल्ह्यातील प्राधान्य कुटूंब योजनेत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना प्राधान्याने रेशनकार्ड उपलब्ध करुन देणेसाठी नियोजनबध्द कार्यक्रम राबविण्याचे निर्देश ना. छगन भुजबळ यांनी आज दिलेत. येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात ना छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची आढावा बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, वैधमापन शास्त्र विभागाचे उपनियंत्रक बी. जी. जाधव, जिल्हा मार्केटींग अधिकारी एन. डी. मगरे, विभागीय आयुक्त कार्यालयातील तहसीलदार साहेबराव शिंदे, वैधमापनशास्त्र विभागाचे निरिक्षक सी. डी. पालीवाल, रविंद्रभैय्या पाटील आदि उपस्थित होते. यावेळी बोलतांना मंत्री भुजबळ म्हणाले की, अंत्योदय योजनेत…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता ओबीसी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे त्याचे स्वागत करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी ओबीसी पदाधिकारी उपस्थित होते.महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनराव भुजबळ हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असता त्याचे आज जळगावात स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, जिल्हाध्यक्ष एडवोकेट रवींद्र भैय्या पाटील, राष्ट्रवादी काँगेस जिल्हाउपाध्यक्ष पंकज महाजन, यांनी सत्कार केले.
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे सायंकाळी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता पारोळ्यात त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी चे पदाधिकारी उपस्थित होते.महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनराव भुजबळ हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असता त्याचे आज सायंकाळी पारोळा येथे स्वागत करताना महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालक व विभागीय अध्यक्ष संजय मुरलीधर पवार, जिल्हाध्यक्ष एडवोकेट रवींद्र भैय्या पाटील जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अण्णासाहेब डॉक्टर सतीश भास्करराव पाटील जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची युती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील यांनी सत्कार करून केले.
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: धरणगाव शहरातील प्रभाग क्रमांक 4 शिंपी समाज मंगल कार्यालया मधे आयोजित लसीकरण मोहीम घेण्यात आलीया कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष निलेश आबा चौधरी , उपनगराध्यक्ष ,विलास महाजन,नगरसेवक भागवत चौधरी वासुदेव चौधरी,सुरेश महाजन डाक्टर,आरोग्य अधिकारी किरण पाटील, डाँक्टर मयुर जैन, सिस्टर मोरवकर,सोनवणे,सहकारी भदाने,महेंद्र महाजन बडगुजर, इत्यादी, आरोग्य विभाग कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .शहरातील प्रभाग 4 मधील शिंपी समाज कार्यालयात लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजक, नगरसेवक, गट नेता विनय पप्पू भावे, नगरसेविका अंजली भानुदास विसावे,यांनी केले होते.या मोहिमेत पहिला डोस 492, दुसरा डोस 223…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव शहराला कोरोना मुळे बऱ्याच लोकांनी आपले आत्पेष्ट नातेवाईक गमावले या करणामुळे सगळ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहेडेंगू मलेरिया मोठ्या प्रमाणात पसरला आहे आणि लहान मुलांना जास्त प्रमाणात आहे आधीच आपण कोरोंना सारख्या महाभयंकर आजारातून नुकतेच बाहेर पडत आहोत.शहरातील स्वच्छता ही वॉटर ग्रेस कंपनीला दिला आहे तो कोट्यवधींचा असूनही शहराच्या पाहिजी तशी स्वच्छता होत नाही याची तपासणी सुद्धा होत नाही असा ही आरोप करण्यात आला आहे. त्यांना मनपा येवढाच पगार वॉटर ग्रेस कंपनीकडून दिला जात आहे हे सर्व जळगावकर शहरातील नागरिकांसाठी घातक आहे यासाठी आम्ही आयुक्त साहेबांना विनंती केली आहे की तुमच्याकडून आरोग्य यंत्रणा कार्यान्वित होत नसेल तर…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: आसोदा येथील ३६ वर्षीय शेतकऱ्याने दारूच्या नशेत राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घडली घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.जळगाव तालुक्यातील आसोदा येथील रहिवाशी शेतकरी रमेश अशोक पाटील (वय-३६) आपल्या पत्नी व दोन मुलीसह राहतात. शेतीकाम करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. २३ सप्टेंबर रोजी त्यांची पत्नी ह्या शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. तर दोन्ही मुली कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. सायंकाळी ७ वाजेच्या पुर्वी रमेश पाटील यांनी राहत्या घरातील पुढच्या खोलीत दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांची पत्नी सायंकाळी शेतातून घरी आल्या त्यावेळी हा प्रकार समोर आला. त्यांचा मृतदेह खाली…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्ह्यात अलीकडच्या काळातील वाढलेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमिवर पोलिसांनी ‘मास्टर प्लॅन’ आखला आहे यासाठी संवेदनशील भागात पोलीस चौक्या उभारण असून शहरात सीसीटीव्ही लावण्यासाठी 7 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे तसेच गुन्हेगारांचे मॅपींग करण्यात येणार आहे. यानंतर त्यांच्यावर मोक्का, एमपीडीए, हद्दपारी आदींसारखी कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती आज नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक बी.जी. शेखर यांनी दिली. वर्षातील गुन्हेगारांच्या हालचाली आणि गुन्ह्यांचा आढावा घेणे सुरू असून गुन्ह्यांच्या व्याप्तीनुसार यापुढे त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. गुन्हेगारी संपविण्यासाठी नागरिकांकडून देखील सहकार्य अपेक्षित आहे. जळगावात यापुढे सजन्नांना सलाम आणि दुर्जनांवर प्रहार अशी पोलीस प्रशासनाची भूमिका असणार असल्याचे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: आज सकाळी कांचन नगरात थेट घरात घुसून गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात हल्लेखोरांना यश आले नाही. या प्रकरणी शनीपेठ पोलिस स्टेशनला गु.र.न.208/21 भा.द.वि. 307, 324, 323, 504 व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काही तासातच अटक केली आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांनी पथक नेमूनदिले होते. या पथकात सहायक फौजदार अशोक महाजन, हे.कॉ. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, जितेंद्र पाटील, लक्ष्मण पाटील, सुरज पाटील, राहुल पाटील, पोलिस नाईक प्रितम पाटील, अविनाश देवरे यांनी संशयीत तिनही आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आहे.मिलींद शरद सकट रा. गेंदालाल मिल जळगाव…
धरणगाव प्रतिनिधी: भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसाच्या औचित्याने सेवा समर्पण अभियान अंतर्गत सौरभ देसले यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा धरणगाव तालुका व आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने लसीकरण शिबीर भोद बु|| येथे ५०० कोविशिल्ड लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते.कोविड प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आज देशभरात व राज्यभरात कोविड लसीकरण करून नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी आरोग्य यंत्रणा जोरदार कार्य करत असून , गावा गावातील नागरिकाना लसीकरणाची उपलब्धता करून देण्यात येत आहे.त्या प्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पि.सी.आबा पाटील, जि. प.सदस्या माधुरीताई अत्तरदे, ओबीसी जिल्हाध्यक्ष संजय महाजन,भाजपचे तालुकाध्यक जिजाबराव पाटील जगन्नाथ पाटील, भगतसिंग आप्पा, भाजप तालुका सरचिटणीस…
मुंबई वृत्तसंस्था: मागील काही दिवसांपासून राज्यात चर्चेत असलेले ओबीसी राजकीय आरक्षण अखेर सत्यात उतरताना दिसू लागले आहे.राज्य सरकारने यासंदर्भात अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर, तो राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. पण, तो अध्यादेश राज्यपालांनी काही सूचनांसह परत पाठवला होता. यानंतर त्यात राज्य सरकारने आवश्यक ते बदल करून राज्यपालांकडे पाठवल्यानंतर आज त्यावर राज्यपालांनी स्वाक्षरी करून आपल्या मंजुरीची मोहोर उमटवली आहे.ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळादरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे अध्यादेशावर स्वाक्षरी केल्याबद्दल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आभार मानले आहेत. मंत्रिमंडळाने पाठवलेला अध्यादेश राज्यपालांनी मंजूर केला, यासाठी आम्ही सगळे राज्यपालांचे आभारी आहोत. अनेकदा काही शंका असतील, तर राजभवन त्याची…

