गट शिक्षणाधिकारी यांची शाळेला सदिच्छा भेट !धरणगांव प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: येथील महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेत दीड वर्षानंतर शाळेत किलबिलाट ऐकू आली त्यानंतर शाळेची घंटा वाजली शाळेत येणाऱ्या मुलांसाठी रांगोळ्या घाण्यात आल्या होत्या याच्यासह विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन जल्लोषात स्वागत करण्यात आले. तब्बल दीड वर्षानंतर शाळेची घंटा वाजली. त्यामुळे आज शाळेत दिवाळी दसरा प्रमाणे शाळेला तोरण बांधुन सजावट करण्यात आली. शालेय परिसरात गेटसमोर रांगोळी काढण्यात आली. शाळेत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका . पी.आर. सोनवणे मॅडम, पर्यवेक्षक जे.एस.पवार व संपुर्ण स्टॉफ यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.सर्वप्रथम शाळेचे सेवक अशोक पाटील यांनी विद्यार्थ्यांचे हात सॅनटाईझ केले. यानंतर क्रिडाशिक्षक हेमंत माळी…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
धरणगांव प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात शासनाच्या आदेशानुसार कोरोना नियमांचे काटेकोर पणे पालन करून 4 रोजी सोमवार सकाळी ११:३० वाजता मोठया उत्साहात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाच्या पहिल्या दिवसी ३२४ विद्यार्थी (३५%) विद्यार्थी यांनी उपस्थितीदिली. विद्यार्थ्यांवर पुष्प वर्षाव तसेच गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी पालक रविंद्र धनगर सपत्निक हजर होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरूणजी कुळकर्णी, उपाध्यक्ष व्ही. टी. गालापूरे सर, संस्थेचे सचिव डॉ. मिलिंदजी डहाळे, संस्थेचे आदर्श संचालक अजयजी पगारीया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एस. बिराजदार यांनी शुभेच्छा दिल्या.संचालक अजयशेठ पगारीया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन…
प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: धरणगाव येथील योगिता हॉटेल जवळ झालेल्या कार व मोटारसायकलच्या अपघातात होळ येथील लक्झरी ड्रायव्हर छोटूलाल आधार पाटील (वय – ४७) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.याबाबत सविस्तर माहिती अशी की, MH 19 AX 0890 या क्रमांकाच्या इंडिका व्हिष्टा या कारने MH 19 F 2283 क्रमांकाची 4 S कावासाकी या मोटारसायकल ची समोरासमोर धडक झाली. या अपघातात गंभीररीत्या जखमी झालेल्या छोटूलाल पाटील यांना ग्रामीण रुग्णालय धरणगाव येथे आणले असता येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीष चौधरी यांनी तपासणी करून मृत घोषित केले. या अपघातात कार व मोटारसायकल यांचे जास्त नुकसान झालेले नाही परंतु एका व्यक्तीच्या जीव मात्र गेला.या घटनेचा पुढील तपास…
प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: धरणगाव येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये आज इयत्ता ८ वी ते १० वी चे वर्ग सुरू झाले. शाळेच्या पहिल्या दिवशी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन व विद्यार्थ्यांचे स्वागत करून पहिल्या दिवसाची उत्साहात सुरवात झाली.याबाबत सविस्तर वृत्त असे की, शासन निर्देशांचे पालन करून शहरी भागात इयत्ता ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या. यानुसार आज गुड शेपर्ड स्कुल धरणगाव येथे शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात उत्साहात झाली. सर्वप्रथम शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावित यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे पूर्व प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज:- जामनेर तालुक्यातील तळेगाव आणि गाडेगाव परिसरातील हातभट्टींवर आज पोलीस निरिक्षक किरण शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापे टाकून तब्बल २ लाख ७४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील तळेगाव व गाडेगाव या गावाच्या परिसरात अवैध हातभट्टी दारू बनवत असल्याची तक्रार नागरिकांनी पोलिसांना केली होती त्याआधारे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालीसहाय्यक फौजदार संजय पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल रमेश कुमावत, पोलीस कॉन्स्टेबल निलेश घुगे, तुषार पाटील, रामदास कुमार यांच्या पथकाने जितेंद्र नथु कोळी व प्रकाश नथु कोळी राहणार तळेगाव या दोघांना ताब्यात घेतले असता यांच्याकडे १४० लिटर हातभट्टी दारू किंमत दहा हजार रुपये व दोन…
मी ईडीला घाबरत नाही. मी फक्त कोर्टाला घाबरतो, खडसे लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भोसरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी चार्जशीट दाखल झाल्यामुळे आता ईडीचा विषय संपला आहे मी फक्त कोर्टाला घाबरतो असल्याचे सांगत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजप च्या नेत्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तुम्ही छळतात म्हणून मी पर्याय निवडला माझ्याकडे अनेक पर्याय होते परंतु मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश घेतला आणि माझा पक्ष माझ्या पाठीमागे भक्कम पणे उभा आहे गिरीश भाऊ म्हणतात ना करा चौकशी घाबरू नका चौकशी सुरू आहे असेही खडसे म्हणाले कार्यकर्त्यांनी सीडी बद्दल विचारले असता पोलीस चौकशी करत आहेत त्यांना त्यांचा वेळ घेऊ द्या माझ्या कडे अली होती सीडी…
जळगाव प्रतिनिधी: शहरातील रस्ते अमृत योजनेमुळे खड्डेमय झाले होते त्यात पुन्हा भूमिगत गटारीचे कामे सुरू आहे त्यात पावसाळा सुरू असल्याने रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे रेल्वे प्रशासनाला निवेदन देऊनही ही कामे होत नसल्याने आज आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महानगरपालिकेसमोर झोपा काढा आंदोलन करण्यात आले .शहरामध्ये जवळपास दोन ते तीन वर्षापासून रस्त्यांचे तसेच भूमिगत गटारीचे काम सुरु आहे. त्यामुळे संपूर्ण शहरातील रस्त्यांची पूर्णत: वाताहात झालेली आहे. त्यातच ऐन पावसाच्या दिवसामध्ये तर जनतेला खराब रस्त्यांमुळे नरक यातना सहन कराव्या लागत आहेत. याबाबत आम्ही आपणांकडे निवेदने दिले असता तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वेळोवेळी आंदोलने करून सुध्दा हे प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे.…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्र प्रदेश बाराबलुतेदार महासंघाच्या जळगाव शाखेतर्फे जळगाव जिल्ह्यातील नवनिर्वाचित बाराबलुतेदार समाज घटकातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व नगरसेवक यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.महाराष्ट्र प्रदेश बाराबलुतेदार महासंघाच्या जळगाव येथील बलुतेदार महासंघ जळगाव जिल्हा व महानगर जळगाव आयोजित जिल्ह्यातील नवनिर्वाचित भारत बाराबलुतेदार समाज घटकातील ग्रामपंचायत सदस्य व नगरसेवक यांचा नुकताच सत्कार करण्यात आला यावेळी सोनवद ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य सुकलाल कुंभार यांचाही मानचिन्ह देऊन जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे महापौर जयश्री जयश्री महाजन व बाराबलुतेदार महासंघाचे प्रदेश अध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: धरणगाव येथील वि. का. सोसायटी जवळ झालेल्या ट्रक च्या अपघाताने गंभीररीत्या जखमी झालेल्या वानरीचे दुपारी १२:१५ वाजता दुःखद निधन झाले.याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज सकाळी ९ वाजता विविध कार्यकारी सोसायटीजवळ एका ट्रक च्या धक्क्याने माकड (मादी) गंभीररीत्या जखमी झाली. ही सर्व घटना लहान माळी वाडा परिसरातील भागवत महाजन (आटो वाले) यांनी बघितली व त्यांनी त्या वानरीला आपल्या रिक्षातून ग्रामीण रुग्णालयात आणले. ग्रामीण रुग्णालयात तिच्यावर प्रथमोपचार करण्यात आले.त्यानंतर या घटनेची माहिती लहान माळी वाडा (मढी परिसर) येथील युवक मंडळाच्या सर्व मित्रांना कळली असता त्यांनी लगेचच ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. त्यानंतर वानरी ला लहान माळी वाड्यात भागवत महाजन…
प्रतिनिधी प्रविण पाटील: वावडदा तालुका जळगाव येथे उद्या ३अक्टो. रोजी जि.प.सदस्य पवनभाऊ सोनवणे यांच्या प्रयत्नातून म्हसावद जि.प.मराठी शाळा येथे लसीकरणास होणार आहे आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर नाशिककर, डॉ.प्रशांत गर्ग व डॉ.अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाने लसीकरण होणार आहे. या लसीकरनात जळके आरोग्य उपकेंद्राचे सि.एच.ओ.थोरात मॅडम,ए.एन.एम.सपकाळेमॅडम, आरोग्य सेवक सलीम भाऊ पिंजारी तसेच अनिता धनगर, अरुणा सपकाळे,वच्छला चव्हाण,सरिता पाटील,गोजर पाटील व जयश्री पाटील या सर्व आशा वर्कर लसीकरण केंद्रावरसकाळी ९ वाजले पासुन जि.प.मराठी शाळा येथे लसीकरणास सुरुवात करतील. या ठिकाणी कोविशिल्ड लस उपलब्ध असेल पहिला व दुसरा डोस असणार आहे तरी नागरिकांनी आपल्या सोबत लसीकरण केंद्रावर आधार कार्ड व ओ.टी.पि.साठी मोबाईल आणणे…

