लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील गुजराल पेट्रोल पंप जवळ टपरीच्या आडोश्याला सट्टा जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून शामलाल चंदुमल कुकरेजा (वय-६२) रा. सिंधी कॉलनी आणि जगन्नाथ काकडू महाजन (वय-३८) रा. धानोरा ता.जि. जळगाव या दोघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील गुजराल पेट्रोल पंप जवळ बंद पडलेल्या टपरीच्या आडोश्याला काही जण मटका नावाचा सट्टा जुगार खेळत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पो.ना. किरण धनगर, पोहेकॉ दिपक पाटील, प्रमोद लाडवंजारी हे आज मंगळवारी ५ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील इच्छादेवी मंदीर समोरील खुबचंद साहित्या बिल्डिंगजवळ कल्याण मटका खेळणाऱ्या स्वप्निल तुकाराम तायडे (वय-२६) रा. जळगाव जामोद ह.मु. हरीविठ्ठल नगर आणि दिपक किसन बिऱ्हाडे (वय-२६) रा. आंबेडकर नगर आसोदा ता.जि.जळगाव या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. दोघांवर जिल्हा पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्गावरील इच्छादेवी मंदीर चौकात असलेले खुबचंद साहित्या बिल्डींगाच्या आडोश्यात कल्याण मटका खेळ असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार पथकातील पोहेकॉ निजामोद्दिन शेख, सुरज पाटील, पोकॉ. दिपककुमार शिंदे , पोकॉ हेमंद पाटील यांनी दुपारी १ वाजून ४० वाजता…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शेतात पाडलेले प्लॉट एन.ए. करण्याच्या मोबदल्यात १० हजाराची लाच मागणाऱ्या भुसावळ प्रांत कार्यालयातील महिला अव्वल कारकून यांना नंदूरबार लाचलुचपत विभागाच्या पथकाने आज रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे भुसावळ प्रांत कार्यालया खळबळ उडाली आहे.प्रतिभार मच्छिंद्र लोहार (वय-४०) असे १० हजाराचे लाच घेणाऱ्या अव्वल कारकूनचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, भुसावळ शहरातील एका तक्रारदाराने प्लॉट एन.ए. करण्यासाठी भुसावळ प्रांत कार्यालयात त्यांनी सादर केले होते. संशयित आरोपी अव्वल कारकून प्रतिभा लोहार यांनी कामाच्या मोबदल्यात १० हजार रूपयांची लाचेची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली होती. दरम्यान तक्रारदार यांनी थेट नंदूरबार लाचलुचपत विभागाकडे रितसर तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार १७ सप्टेंबर २०२१ रोजी…
धरणगाव लक्ष्मण पाटील : येथील अखिल भारतीय बडगुजर समाज मंगल कार्यालयात धरणगाव शहर बडगुजर समाजाची सर्वसाधारण सभा झाली. अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष मनोहर बडगुजर होते. समाजबांधवांचे मंगल कार्यालय बांधकाम, पंचवार्षिक कार्यकारिणी निवड आदी विषयांवर चर्चा झाली. यावेळी बडगुजर समाजाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्ष – वासुदेव तुकाराम बडगुजर, उपाध्यक्ष – घनश्याम बाबूलाल बडगुजर, सचिव – अनिल रमेश बडगुजर, सहसचिव – गणेश कोतवाल यांची तर सदस्यपदी सचिन बडगुजर, सुमित बडगुजर, ज्ञानदेव बडगुजर, बिंदीलाल बडगुजर, मिलिंद बडगुजर, जयेश बडगुजर, उमेश बडगुजर यांची एकमताने निवड करण्यात आली. वरील सर्व नवनियुक्त पदाधिकारी हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. बैठकीत समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी…
जळगाव प्रतिनिधी: जिल्हा पेठ पोलिसात नवरात्र उत्सव मंडळाच्या पदाधिकारी याची बैठक झाली यावेळी शासनाने दिलेल्या गाईड लाईन नुसार उत्सव पार पाडवा याबद्दल माहिती देण्यात आली.आज दिनांक 5 रोजी 11:15 ते 11.45 वाजे दरम्यान जिल्हा पेठ पोलीस स्टेशन, जळगाव येथे नवरात्र उत्सव 2021 संदर्भात पोस्ट हद्दीतील दुर्गा देवी मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी यांची सहाय्यक पोलीस अधीक्षक, कुमार चिंता उपविभाग, जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग घेण्यात आली. सदर मिटिंग मध्ये महाराष्ट्र शासन गृहविभाग यांचेकडून नवरात्र उत्सव 2021 बाबत covid-19 च्या अनुषंगाने देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. सदर मिटिंग आम्ही तसेच नवदुर्गा मित्र मंडळाचे 20 ते 25 पदाधिकारी यांची…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मुक्ताईनगर येथील नगरपंचायतीचे पाणी पुरवठा मुकादम भगवान वंजारी यांना नगरसेविकेचे पती बापू ससाणे यांनी धक्काबुक्की करत धमकावल्याने खळबळ उडाली असून कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. पूर्णा नदीला पूर आल्यामुळे पाणीपुरवठा मुक्ताईनगर मध्ये आणि अनियमित होत आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक ८ मध्ये पाणी पुरवठा दोन तास उशिराने झाला. याच कारणाचा राग येऊन नगरसेविका साधना ससाणे यांचे पती बापू ससाने यांनी पाणीपुरवठा मुकादम भगवान वंजारी याना नगरपंचायत कार्यालय मध्ये येऊन धक्काबुक्की केली. आपल्या प्रभागात आता पाणी सोडल्यास हात पाय तोडून टाकेल अशी धमकी दिली. विशेष म्हणजे ही घटना पाणीपुरवठा अभियंते सोनवणे यांच्या समोर घडली.त्यामुळे सर्व पाणीपुरवठा कर्मचार्यांनी एकत्रित…
गट शिक्षणाधिकारी यांची शाळेला सदिच्छा भेट !धरणगांव प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: येथील महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेत दीड वर्षानंतर शाळेत किलबिलाट ऐकू आली त्यानंतर शाळेची घंटा वाजली शाळेत येणाऱ्या मुलांसाठी रांगोळ्या घाण्यात आल्या होत्या याच्यासह विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन जल्लोषात स्वागत करण्यात आले. तब्बल दीड वर्षानंतर शाळेची घंटा वाजली. त्यामुळे आज शाळेत दिवाळी दसरा प्रमाणे शाळेला तोरण बांधुन सजावट करण्यात आली. शालेय परिसरात गेटसमोर रांगोळी काढण्यात आली. शाळेत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका . पी.आर. सोनवणे मॅडम, पर्यवेक्षक जे.एस.पवार व संपुर्ण स्टॉफ यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.सर्वप्रथम शाळेचे सेवक अशोक पाटील यांनी विद्यार्थ्यांचे हात सॅनटाईझ केले. यानंतर क्रिडाशिक्षक हेमंत माळी…
धरणगांव प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात शासनाच्या आदेशानुसार कोरोना नियमांचे काटेकोर पणे पालन करून 4 रोजी सोमवार सकाळी ११:३० वाजता मोठया उत्साहात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाच्या पहिल्या दिवसी ३२४ विद्यार्थी (३५%) विद्यार्थी यांनी उपस्थितीदिली. विद्यार्थ्यांवर पुष्प वर्षाव तसेच गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी पालक रविंद्र धनगर सपत्निक हजर होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरूणजी कुळकर्णी, उपाध्यक्ष व्ही. टी. गालापूरे सर, संस्थेचे सचिव डॉ. मिलिंदजी डहाळे, संस्थेचे आदर्श संचालक अजयजी पगारीया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एस. बिराजदार यांनी शुभेच्छा दिल्या.संचालक अजयशेठ पगारीया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन…
प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: धरणगाव येथील योगिता हॉटेल जवळ झालेल्या कार व मोटारसायकलच्या अपघातात होळ येथील लक्झरी ड्रायव्हर छोटूलाल आधार पाटील (वय – ४७) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.याबाबत सविस्तर माहिती अशी की, MH 19 AX 0890 या क्रमांकाच्या इंडिका व्हिष्टा या कारने MH 19 F 2283 क्रमांकाची 4 S कावासाकी या मोटारसायकल ची समोरासमोर धडक झाली. या अपघातात गंभीररीत्या जखमी झालेल्या छोटूलाल पाटील यांना ग्रामीण रुग्णालय धरणगाव येथे आणले असता येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीष चौधरी यांनी तपासणी करून मृत घोषित केले. या अपघातात कार व मोटारसायकल यांचे जास्त नुकसान झालेले नाही परंतु एका व्यक्तीच्या जीव मात्र गेला.या घटनेचा पुढील तपास…
प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: धरणगाव येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये आज इयत्ता ८ वी ते १० वी चे वर्ग सुरू झाले. शाळेच्या पहिल्या दिवशी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन व विद्यार्थ्यांचे स्वागत करून पहिल्या दिवसाची उत्साहात सुरवात झाली.याबाबत सविस्तर वृत्त असे की, शासन निर्देशांचे पालन करून शहरी भागात इयत्ता ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या. यानुसार आज गुड शेपर्ड स्कुल धरणगाव येथे शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात उत्साहात झाली. सर्वप्रथम शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावित यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे पूर्व प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण…

