Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भारत मातृसत्ताक असल्याचे ऐतिहासिक संदर्भ दीपस्तंभा समान आहेत.त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत छत्रपती शिवरायांनी जिजाऊंच्या नेतृत्वात हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तर, स्वातंत्रोत्तर काळात भारताने स्व.इंदिराजींच्या रूपाने जगाचे नेतृत्व करून दाखविले आहे. म्हणून इतिहासातून बोध घेऊन स्त्री शक्तीचे संवर्धन करून मानवजातीचे अधिक कल्याण साधता येईल असे मत प्रा.संदीप भास्कर पाटील यांनी व्यक्त केले.महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील मानसमित्र समुपदेशन केंद्र आणि मानसशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्त्री शक्तीचा जागर’ या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून पुढे बोलतांना प्रा.संदीप पाटील यांनी विविध क्षेत्रात प्रभावी कार्य करण्यासाठी सावित्रीमाई फुलेंचा आदर्श ठेऊन शिक्षणाची कास धरून तिमिरातून तेजाकडे…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जामनेर तालुक्यातील पाळधी येथे कपासाची गाडी भरत असतांना विजेचा धक्का लागल्याने २५ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाला तर दोन जणा जखमी झाल्याची घटना घडली. जखमींना जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे.अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील पाळधी येथे आज १३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास व्यापाऱ्यानं ट्रक्मध्ये कापसाची गाडी भरत असतांना टपावर बसलेले तिघे जण ट्रकवरून खाली उतरत असतांना विजेच्या तारांचा जबर धक्का लागल्याने विशाल बाबुराव श्रीखंडे (वय-२५) रा. माळपिंप्री या मजूराचा जागीच मृत्यू झाला.तर सोबत असलेले तर ज्ञानेश्वर श्रावण काळे व ज्ञानेश्वर सिताराम भजे रा. माळपिंपरी हे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने  जळगाव येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: धरणगाव ते चावलखेडा स्टेशन दरम्यान रेल्वे खांबा २८२/१३ च्या दरम्यान दोन्ही रेल्वे रुळाच्या मध्ये एक ईसम रेल्वे अपघात मृत्यू  झाला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यु नोंद झाली आहे .स्टेशन मास्टर चावलखेडा रेल्वे स्टेशन यांनी मेमो द्वारे धरणगाव पोलीस स्टेशनला कळविले कि, धरणगाव ते चावलखेडा स्टेशन दरम्यान रेल्वे खांबा २८२/१३ च्या दरम्यान दोन्ही रेल्वे रुळाच्या मध्ये एक ईसम रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. असे कळविल्यावरून धरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यु रजी नं. ६९/२०२१ C.P.C. १७४ प्रमाणे दाखल असून घटनास्थळावर धरणगाव पोलीस स्टेशनचे पो.उप नि गवारे , पोहेकॉ संतोष थोरात  यांनी तपासणी केली.   मयत इसमाची तपासणी केली…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज:  क ब चौ उ म विद्यापीठ मध्ये बऱ्याच प्रकरणात अधिकारी वर्ग टाळाटाळ करण्याचे काम करीत असून काही लोक अधिकारी वर्गाला हाताशी धरून संगनमत करून जाणीव पूर्वक  विद्यापीठात भ्रष्टाचार करत आहेत व विद्यापीठाची बदनामी करत आहेत त्याबाबत चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात यावे असे निवेदन आज अँड कुणाल बी पवार, भूषण भदाणे, गणेश निंबाळकर, गौरव वाणी,चेतन चौधरी यांनी इमेल व्दारे राज्यपाल भगतसिंह कोश्यायरी कडे केली आहे. आज विद्यापीठाच्या कारभाराबाबत राज्यपाल भगतसिंग कोशायरी ई-मेल द्वारे निवेदन पाठवण्यात आले यात कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा मध्ये अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत आहेत यामुळे विद्यापीठाला बदनाम करीत आहे या सर्व प्रकरणाची सखोल…

Read More

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या मते  भाजपचे गटनेते भगत बालाणीलाईव्ह महाराष्ट्र न्यूज: महापालिकेत गटनेता पदावरून पेच निर्माण झाले असतानाच माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार भाजपाचे अधिकृत गटनेते हे भगत बालाणी असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे गटनेते पदार भाजपचा हक्क असल्याचे भाजपा पदाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट  डॉक्टर राधेश्याम चौधरी यांनी केले. आजच्या पत्रकार परिषदेत डॉ. राधेश्याम चौधरी यांनी महापालिकेतील सत्ताधारी आणि भाजपचे फुटीर सदस्यांवर टीका केली. आजवर आम्हाला ३० नगरसेवकांचा पाठींबा होता. यानंतर तीन जण सोबत आले. तर आज पुन्हा दोन जणांनी संमती दिल्यामुळे आता भाजपच्या ३५ सदस्यांनी संमतीने भगत बालाणी हेच भाजपचे गटनेते असल्याचे स्पष्ट झाले असल्याचा दावा डॉ. राधेश्याम चौधरी यांनी दिला.…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: सध्या नवरात्री सुरू आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. महिला शक्तीचा जागर होत आहे. याच धर्तीवर जिंदगी फाउंडेशनने चाळीसगाव तालुक्यातील जुनोने आणि नाईक नगर तांडा या अतिशय दुर्गम गावात महिला आणि किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीबद्दल जनजागृती केली. जुनोने हे गाव कन्नड घाटाच्या वरच्या बाजूला आहे. त्यामुळे हे गाव दुर्गम भागात मोडते. जिंदगी फाउंडेशनने गावातील महिला आणि किशोरवयीन मुलींना मासिक पाळीच्या दिवसांमध्ये घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच सर्व महिला आणि किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन वाटण्यात आले. जिंदगी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुष्मिता भालेराव यांनी उपस्थित महिलांना मासिक पाळी विषयी शास्त्रीय माहिती सांगितली. मासिक…

Read More

मनपात गटनेत्या पदावरून घडामोडींना वेग लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भारतीय जनता पक्षाचे गटनेते म्हणून आपल्याला ३३ नगरसेवकांचा पाठींबा असल्याचे पत्र भगत बालाणी यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहे. यामुळे आता उद्या होणार्‍या महासभेतील घडामोडी रंजक वळणावर आल्याचे दिसून येत आहे. १३ ऑक्टोबर रोजी महापालिकेची महासभा आयोजीत करण्यात आलेली आहे. यात स्थायी समिती सभापती, या समितीचे सदस्य आदींची निवड होणार आहे. या आधी राजकीय घडामोडी वेगवान झाल्या आहेत. यात काही दिवसांपूर्वीच भाजपच्या तीन बंडखोर सदस्यांनी घरवापसी केली. यानंतर आता गटनेतेपदाबाबतची घडामोडी समोर आल्या आहेत. भगत बालाणी यांनी आपण स्वत: गटनेता तर राजेंद्र पाटील हे उपगटनेता असल्याचे पत्र विभागीय आयुक्तांना दिले असून यात आपल्याला ३३…

Read More

प्रतिनिधी प्रवीण पाटील| जळगाव तालुक्यातील जळके व वसंतवाडी येथे 13 रोजी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना अनुदानावर हरभरे बियाणे साठी चे परमिट वाटप करण्यात येणार आहे तरी परिसरातील शेतकऱ्यांनी सातबाराचा उतारा आधार कार्ड झेरॉक्स घेऊन येण्याचे आव्हान करण्यात आले आहे. तालुक्यात 13 रोजी जळके व वसंतवाडी येथील शेतकरी बांधवांना रब्बी हंगामासाठी हरभरा बियाणे उपलब्ध झाले असून त्यासाठी लागणारे परमीट जळके ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी ९वाजेपासुन वाटप होणार आहे तरी जळके वसंतवाडी परिसरातील शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीचा ७/१२ गट नंबर समजण्यासाठी व आधार कार्ड झेरॉक्स घेऊन जाणं आवश्यक आहे . तरी जळके वसंतवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी उद्या जळके ग्रामपंचायत येथे येऊन हरभरा बियाणे परमीट घेऊन जाण्याचे…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्ह्यातील काही ठिकाणी 16 व 17 ऑक्टोबर, 2021 रोजी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी, नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील शेतमालाची काढणी करावी व शेतात साठवणूक केलेला शेतमाल सुस्थितीत योग्य ठिकाणी ठेवावा. जेणेकरुन वरील कालावधीत होणाऱ्या वादळी वारा, अवकाळी पावसापासून शेतमालाचे संरक्षण करणे सोयीचे होईल, असेही  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकात म्हटले आहे.

Read More

महाराष्ट्र बंद वरून भाजपची ठाकरे सरकारवर टीकालाईव्ह महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्रातील शेतकरी व सामान्य जनता संकटांमध्ये होरपळत असताना, उत्तर प्रदेशातील जनतेचे तारणहार असल्याच्या अविर्भवत मंत्रिमंडळाच्या बैठकीत शोकप्रस्ताव संमत करणे ही ठाकरे सरकारची निव्वळ ढोंगबाजी आहे. एक हजार पन्नास कोटींच्या दलालीचे पुरावे आयकर खात्याला सापडल्याने लखीमपूर प्रकरणाच्या ढालीआडून महाराष्ट्र बंद पुकारून या गंभीर प्रकरणावरून जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्याचे हीन राजकारण ठाकरे सरकार करत आहे, असा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे (राजु मामा) यांनी आज ११ ऑक्टोबर रोजी प्रसिध्दी पत्राद्वारे केले असुन प्रदेशातील शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखविणाऱ्या ठाकरे सरकारने महाराष्ट्रातील संकटग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर का सोडले, असा सवालही त्यांनी केला. वादळे, अतिवृष्टी, दुष्काळ, महापूर अशा…

Read More