Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भुसावळ येथील एक व्यक्ती गावठी कट्टा आणि धारदार चाकू घेऊन दहशत  माजवीत आहे या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेमो.हाशीम मो.सलीन खान वय-४१ याला अटक केली. भुसावळ येथील प्रल्हाद नगरात राहणारा मो.हाशीम मो.सलीन खान हा नशिराबाद गावात गावठी पिस्तूल घेऊन दहशत माजवीत असल्याची माहिती एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. निरीक्षक बकाले यांनी नेमलेल्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, हवालदार संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, परेश महाजन, रवींद्र पाटील यांनी यांनी मो.हाशीम मो.सलीन खान याला नशिराबाद बस स्थानकाजवळून अटक केली आहे.पोलिसांनी केलेल्या झाडाझडतीत एक गावठी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतूस व धारदार चाकू मिळून आला आहे. मो.हाशीम…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भुसावळ येथील हनुमान नगर मधील पंचवटी ग्रुप तकदीर मंडळ येथे 15 रोजी मंडळासमोर दांडिया व गरबा घेण्यात येत होतं यावेळेस पोलिसांनी स्पीकर व ऍम्प्लिफायर जप्त करीत असताना काही कारण कार्यकर्त्याने शासकीय कामात अडथळा निर्माण केला बाजार पेठ पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले.शासनाने नवरात्र उत्सवामध्ये गरबा-दांडिया किंवा वाद्य वाजवण्यात कोणतीही परवानगी दिलेली नाही आहे असे असतानाही पंधराच्या रात्री हनुमान नगर येथील पंचवटी ग्रुप व तकदीर मंडळ येथे मंडळासमोर दांडिया व गर्भ वाद्य लावून खेळत होती यावेळी पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना समज देत असताना सर्व स्पीकर व ऍम्प्लिफायर ताब्यात घेत असताना काही मंडळींनी…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेची रणधुमाळी सुरू झाली आहे जिल्हा बँकेच्या महिला राखीव मतदार संघातूनअरुणा दिलीपराव पाटील यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसने सर्वपक्षीय आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर काँग्रेस स्वबळावर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उतरणार असे संकेत दिले होते त्यानुसारप्रदेश सचिव डी.जी.पाटील यांच्या सौभाग्यवती अरुणा पाटील अर्ज दाखल केला .यावेळी डी जी पाटील, संचालक संजय पवार, माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी, नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेना शहर प्रमुख राजू महाजन, नगरसेवक वासू चौधरी, चंदन पाटील, चारुशीला पाटील आदी उपस्थित होते.

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्याअर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे आज जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी सुद्धा आपला अर्ज भरला. गुलाबराव देवकर यांनी सहकार क्षेत्रात जिल्ह्यात भरीव काय कार्य केले आहे. त्यामुळे त्यांचा विजय हा जवळपास निश्चित मानला जात आहे. जिल्हा बँक निवडीमध्ये सर्वपक्षीय आघाडी साठी बैठकच झाल्या होत्या जागावाटप ही झाले आहे तरीही अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही असे असताना. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत इतर संस्था गटातून जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील एक मोठे नेते म्हणून गुलाबराव देवकर यांच्याकडे  बघितले जाते त्यांनी आपली राजकारणाची सुरुवात मजूर फेडरेशन पासून सुरू केली होती. मजूर फेडरेशनच्या…

Read More

जिल्हा बँक निवडीसाठी एकनाथ खडसे, रोहिणी खडसे याचे अर्ज दाखलशिवसेनेचे आ किशोर पाटील , रा का चे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, आ अनिल पाटील लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरण्यास गती आली आहे यात एकनाथराव खडसे जिल्हा बँकेच्या विद्यमान अध्यक्ष रोहिणी खडसे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील राष्ट्रवादीचे माजी पालकमंत्री  गुलाबराव देवकर राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी अर्ज दाखल केले. जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय बैठकीत जागा वाटप ठरले असले तरी गुरूवारी दुपारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई, (सहकार) यांनी दिली.निवडणूक कार्यक्रम…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मागासवर्गीय राखीव इतर संस्था प्रतिनिधी मतदार संघातून धरणगाव चे माजी नगराध्यक्ष व उद्योगपती सुरेश नाना चौधरी यांनी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेस शिवसेना यांचे पदाधिकारी उपस्थित होते. जळगांव जिल्हा मध्यवर्ती बॅंक इतर मागासवर्गीय राखीव(ओ.बी.सी.) व इतर संस्था प्रतिनिधी मतदार संघातून धरणगांव नगरीचे माजी नगराध्यक्ष व उद्योगपती सुरेश नाना चौधरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी  त्याच्या सोबत काँग्रेस प्रदेश सचिव डि.जी.पाटील .,जळगांव जिल्हा बँक संचालक .संजय पवार.,शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन.,लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी.,नगरसेवक वासुदेव चौधरी.,विजय महाजन.,भागवत चौधरी.,युवक काँग्रेस चे चंदन पाटील.,तसेच सर्व शिवसेना नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भुसावळ तालुक्यातीलसाकेगाव येथील तरूणाला खंडणी मागण्याच्या प्रकरणाती दाखल गुन्ह्यातील दोन संशयितांना तालुका पोलीस स्थानकाच्या पथकाने अटक केली आहे. याबाबत वृत्त असे की, महामार्गावर असणार्‍या बर्‍हाटे पेट्रोल पंपाजवळ बंटी पथरोड यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेले बॅनर फाडल्याच्या आरोप करत मयूर मदन काळे (वय १९, रा.साकेगाव) याचे संशयितांनी चारचाकीतून अपहरण केले. चॉपर व पिस्तुलाचा धाक दाखवून ५ लाख रुपये खंडणी देण्याच्या अटीवर सोडून दिले होते. ७ व ८ सप्टेंबरला घडलेल्या या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली होती. या घटनेप्रकरणी मयूर मदन काळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बंटी पथरोड, नितीन कोळी (अंजाळे, ता.यावल), हर्षल पाटील, गोलू जव्हेरीलाल कोटेचा (साकेगाव), ओम, सागन भगवान भोई (वय…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भोसरी जमीन खरेदी प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं.मुंबई उच्च न्यायालयाने एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंना दिलासा दिला. अटक झाल्यास ५० हजारांच्या जामिनावर सुटका करण्याचे पोलिसांना आणि १७ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश त्यांना न्यायालयाने दिले . विशेष न्यायालयासमोर हजर राहण्यासंदर्भातील निर्देश न्यायालयाने मंदाकिनी यांना दिले आहेत. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा खटल्यात मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात दोन दिवसांपूर्वीच मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, सुनावणीदरम्यान त्यांचा अर्ज फेटाळून लावत त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव जिल्हा बँक निवडणूक सर्वपक्षीय पॅनल ची उभारणी सुरू असून सामाजिक समतोल साधावा म्हणून महिला राखीव मतदारसंघ माजी नगराध्यक्ष पुष्पा महाजन यांना महिला राखीव मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा बॅंक निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांची बैठक घ्यायला पाहिजे होती. परंतु तसे झाले नाही त्यामुळे आता जिल्हाध्यक्षांनी तात्काळ इच्छुकांची बैठक बोलवावी अशी मागणीही महाजन यांनी केले आहे सर्वपक्षीय पॅनल मध्ये सर्व समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न सुरू असून माळी समाजालाही न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव जिल्हा पोलीस मुख्यालयातील महिला दक्षता विभागातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला २० हजाराची लाच घेतल्याप्रकरणी रंगेहात पकडले. एसीबीने सदर कारवाई आज दुपारी केली असून या कारवाईमुळे पोलीस मुख्यालयात एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलीस मुख्‍यालयातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिलींद केदार अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. जळगाव जिल्हा पोलीस मुख्यालयाच्‍या परिसरात असलेल्या महिला दक्षता समिती कार्यालयात आज सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक केदार यांनी एका प्रकरणात तक्रारदाराकडून २५ हजाराची लाचेची मागणी केली होती. यात तडजोडीअंती २० हजार रूपये निश्‍चीत झाले. व यासंदर्भात तक्रारदाराने जळगाव येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. असा रचला सापळा..तक्रारदाराच्या तक्रारीनुसार लाचलुचपत विभागाने कारवाई करत २० हजाराची…

Read More