Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: यावल तालुक्यातील अकलुद येथे दहशद माजवीत आहे अशी माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन जणांना ताब्यात घेत त्याच्या कडून 20 हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा , चॉपर जप्त करण्यात आला. मागील काही दिवसा पासून गावठी कट्टयाने दहशत माजवणारे आरोपीतांचा शोध घेणे बाबत पोलीस अधीक्षक डॉ प्रविण  मुंढे  यांनी  आदेश दिले होते.अशा आरोपीचा शोध घेत असतानापोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की 16 रोजी अकलुद गावी हॉटेल राजे च्या समोर सार्वजनिक जागी दोन इसम हे त्याच्या कबज्यात गैरकायदा गावठी कट्टा व चॉपर ताब्यात बागळुन दहशत माजवत असल्याची गुप्त माहीती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे सफौ.…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज (बाभुळगाव) : धरणगाव तालुक्यातील बाभूळगाव परिसरात आज सकाळी झालेल्या  दमदार पावसाने हजेरी लावली यामुळे ‘महावितरण’ची दाणादाण उडाली. गावातील वीज वाहक तार तुटल्याने ३ म्हशी जागीच ठार झाल्याने शेतकऱ्यांचे  मोठे नुकसान झाले आहे . जळगाव जिल्ह्यात 16,17 रोजी हवामान खात्याने पाऊस पडणार असल्याचे संकेत दिले होते त्यानुसार रात्री पासून पावसाने हजेरी लावली होती आज सकाळी झालेल्या  दमदार पावसाने ‘महावितरण’ची दाणादाण उडाली. गावातील व परिसरातील वीजपुरवठा सुरू होता .बाभुळगाव परिसरात सकाळी अवकाळी पावसामुळे सकाळी 11 वाजेला शेतकरी सर्व गुरे घेऊन चरण्यासाठी घेऊन जात असताना अचानक विजेचे तार तुटल्याने बाभुळगाव येथील लक्ष्मण तुकाराम कोळी या शेतऱ्यांच्या तीन गुरे जागीच ठार झाले आहे . यात…

Read More

जळगाव प्रतिनिधी: मोटर सायकलने भजेगल्लीतून जात असतांना दोन अनोळखी आरोपी यांनी त्यांच्या मोटर सायकलवर मागून येऊन शर्टाचे खिशातील मोबाईल हिसकावून पळून गेले होते याप्रकरणी सीसीटीव्ही च्या आधारे दोन आरोपींना ताब्यात घेतले असून त्याच्या मोबाईल जप्त करण्यात आला आहे न्यायालयात हजर केले असता 5 दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे .अविनाश रामदास खैरनार रा .प्रतापनगर जळगाव हे 14 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास त्यांच्या मोटर सायकलने भजेगल्लीतून जात असतांना दोन अनोळखी आरोपी त्यांची मोटर सायकलवर मागून येऊन फिर्यादीची शर्टाचे खिशातील मोबाईल हिसकावून पळून गेले होते, अविनाश खैरनार याच्या फिर्याद वरून जिल्हापेठ पो स्टे ला गुन्हा दाखल झाला होता. निरीक्षक रामदास वाकोडे यांनी हे कॉ शरीफ…

Read More

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: अश्विन शुद्ध एकादशी या दिवशी निघणारा रथोत्सव मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही कोरोनामुळे स्थगित केला गेला होता. रथोत्सवाची परंपरा अखंड चालू राहावी रथाची मिरवणूक रद्द करून रथाची विधिवत पूजा  पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात येऊन  रधोत्सव साजरा करण्यात आला. अश्विन शुद्ध एकादशी या दिवशी धरणगाव येथे रथत्सव साजरा होतो .या रथावर श्री बालाजी भगवानांना विराजमान करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, नगराध्यक्ष श्री व सौ निलेश चौधरी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, पी. आय. शंकर शेळके, बांधकाम अभियंता ठाकूर, धानोऱ्याचे सरपंच भगवान महाजन, उपनगराध्यक्ष विलास महाजन, विलास येवले, शाम भाटीया , पत्रकार बी. एन. चौधरी, आर. डी. महाजन, डी. एस.…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील गुजरात पेट्रोल पंप येथे नुकतेच साई संकल्प मोटरच्या शोरूम चे उद्घाटन  झाले शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महेंद्रा ट्रॅक्टर भव्य शोरूम दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू झाले आहे यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील आमदार चंद्रकांत सोनवणे खा.उमेश पाटील,जि प अध्यक्षा रंजना पाटील महापौर जयश्री महाजन आदी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर उपस्थित होते. शहरातील गुजराल पेट्रोल पंप जवळ  शेतकऱ्यांसाठी मित्र असलेल्या महिंद्रा कंपनीच्या ट्रक्टर च्या शो रूम चे लोकार्पण करण्यात आले. ह्या प्रसंगी  उप महापौर कुल्भुषन पाटील डॉ आश्विन सोनवणे  ज्येष्ट नगरसेवक आबा कापसे प्रतीभा देशमुख डॉ चंद्रशेखर पाटील  किशोर बविस्कर डॉ प्रदीप तळवलकर ,लोक संघर्ष मोर्चाचे प्रतिभा शिंदे संगीतम…

Read More

प्रतिनिधी प्रविण पाटील: विजया दशमीचे औचित्य साधत  गुजरात राज्याचे  भाजप प्रदेश अध्यक्ष सी आर पाटील यांच्या कन्या व जामनेर तालुक्यातील मोहाडी गावच्या सरपंच भाविनी पाटील यांनी त्यांचे पती  रामचंद्र पाटील यांच्यासह जळकेकर महाराजांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन व आध्यात्मिक तसेच विविध राजकीय विषयांवर चर्चा केली.गुजरात राज्याचे भा.ज.पा.प्रदेश अध्यक्ष,आपल्या कर्तुत्वाने गुजरात राज्यात खासदारकीची तिसरी टर्म पूर्ण करणारे सि.आर.पाटील यांच्या कन्या .भाविनी पाटील यांची त्यांच्या पति रामचंद्र पाटील ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.जळके तालुका जळगांव येथे काल विजया दशमीचे औचित्य साधत जळकेकर महाराज याची भेट घेतली. भाविनीताई व त्यांचे पती रामचंद्र पाटील यांचा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन स्वागत…

Read More

पुस्तक वाचल्याने मस्तक सशक्त होते – ग्रंथपाल गोपाल महाजनप्रतिनिधी लक्ष्मण पाटील:- सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे वाचन प्रेरणा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमंत माळी सर यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पी.आर.सोनवणे मॅम होत्या.मान्यवरांच्या हस्ते भारताचे माजी राष्ट्रपती – मिसाईल मॅन – डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम व ग्रंथालय शास्त्राचे जनक एस.आर.रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वाचन प्रेरणा दिवसाचे औचित्य साधून शाळेतील शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचनाचा आनंद घेतला. यावेळी शाळेचे ग्रंथपाल गोपाल महाजन यांनी वाचन प्रेरणा दिवसाचे महत्त्व सांगितले व पुस्तक वाचनाने मस्तक सशक्त होते असे प्रतिपादन केले. याप्रसंगी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका एम.के.कापडणे, व्ही.टी.माळी,…

Read More

वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल ; लक्ष्मणराव पाटील धरणगांव प्रतिनिधी – येथे मोठा माळीवाडा परिसरात नवरात्री व वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून सावित्रीच्या लेकींना महेंद्र (भैय्या) महाजन मित्र परिवाराने विद्यार्थिनींना शालोपयोगी साहित्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली. सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकल्प ऑर्गनायझेशनचे कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांनी केले. प्रास्ताविकात महेंद्र महाजन हे निरंतर समाजकार्यात अग्रेसर असतात.”शिकाल तर टिकाल” या वाक्याला अनुसरून शाळा सुरू व्हायच्या आधी प्रतिवर्षी विद्यार्थ्यांना मोफत वह्या, स्कूलबॅग, शूज व शालोपयोगी साहित्य उपलब्ध करून देतात. मागील लकाही दिवसांपूर्वी पिंपळे…

Read More

भाजपा बरोबर काँग्रेस जाणार नाही जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: सर्वपक्षीय आघाडी बैठकीत काँग्रेसने भाजपबरोबर जाण्यास नकार दिल्याने सर्वपक्षीय आघाडीची बैठक फिस्कटली आहे काँग्रेसने दोन पर्याय ठेवल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेत सर्वपक्षीय आघाडी होणार नाही हे आज पुन्हा स्पष्ट झाले आहे. शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसंदर्भात सर्वपक्षीय आघाडी बाबत बैठक आयोजित करण्यात आली होती मात्र काँग्रेसने आधीच भाजपा बरोबर न जाण्याची भूमिका स्पष्ट केली होती आजही बैठकीत त्यांनी भाजप जाण्यास तयार नसल्याचे सांगत पालक मंत्री गुलाबराव पाटील त्यांच्यासमोर दोन पर्याय ठेवले आहेत एक जिल्हा वरती मध्यवर्ती बँकेचा साठी महा विकास आघडी तयार करावी नाहीतर कॉंग्रेस स्वबळावर लढणार असे स्पष्ट…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे येथील २३ वर्षीय तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली असून याप्रकरणी ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे येथील रविंद्र अशोक गरूड (वय-२३) या तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.  रविंद्र गरुड यास  चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले असून वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक…

Read More