Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दिव्यांगाना साहित्य वाटपाचा वर्धमान भाऊ धाडीवाल यांचा उपक्रम कौतुकास्पद – राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू
    चाळीसगाव

    दिव्यांगाना साहित्य वाटपाचा वर्धमान भाऊ धाडीवाल यांचा उपक्रम कौतुकास्पद – राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रNovember 17, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मानवी सेवेत ताकद असल्याने समाजातील वंचित घटकांच्या मदतीसाठी प्रत्येकाने नेहमीच मदतीचा हात दिला पाहिजे. सामाजिक कार्याने प्रेरित संघटनेने दिव्यांग बांधवांना आवश्यक साहित्य वितरणाचा कार्यक्रम अनुकरणीय आणि कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा लाभक्षेत्र, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी केले.

    चाळीसगाव जि. जळगाव येथे आज सायंकाळी वर्धमान धाडीवाल मित्र मंडळातर्फे दिव्यांग बांधवांना विविध साहित्याचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दिव्यांग संस्थेच्या अध्यक्षा मीनाक्षी निकम, अनिल चौधरी, सामाजिक कार्यकर्ते वर्धमान धाडीवाल आदी उपस्थित होते.

    राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले, समाजातील वंचित, दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नांना सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांनी मदतीसाठी पुढे आले पाहिजे. एवढेच नव्हे, तर मानवता धर्म मानून दिव्यांग बांधवांना मदत करावी. विविध मंडळांच्या माध्यमातून गरजू, दिव्यांग, निराधार व्यक्ती, गरीब रुग्णांना वेळोवेळी मदत करण्याचे आवाहन राज्यमंत्री श्री. कडू यांनी केले.

    श्रीमती निकम म्हणाल्या, की, जळगाव जिल्ह्यात दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आगामी काळात विविध कार्यक्रम आयोजित केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

    लक्ष्मण शिरसाट यांनी मनोगत व्यक्त केले. कोरोना विषाणूच्या काळात बाधित रुग्णांना भोजन दिल्याबद्दल गणेश गवळी, विजय गवळी यांचा तसेच दिव्यांग बांधवांसाठी अहोरात्र झटणा-या मीनाक्षी निकम यांचा राज्यमंत्री श्री. कडू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दिव्यांग बांधव, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय गवळी गणेश गवळी महेंद्र अचलिया संजय सुराणा गजानन मोरे राहूल जाधव दिनेश घोरपडे रामलाल मिस्तरी जितेंद्र वाघ सतीश पवार प्रशांत ठाकूर आकाश अलंकार प्रतीक गवळी बाळासाहेब खरटमल गजानन महाजन स्वप्निल लगडे शिवाजी गवळी बाबासाहेब सापनर बबलू खान आदींनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप घोरपडे यानी केले

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    अक्षय्य तृतीयेवर बालविवाह रोखण्यासाठी राज्यभर कडक बंदोबस्त; प्रशासनाचे सतर्कतेचे आदेश”

    April 19, 2026

    राज्यात उष्णतेचा कहर, अवकाळी पावसाचा तडाखा : दुहेरी संकटात शेतकरी-नागरिक हैराण

    April 18, 2026

    चोपडा शहरात कडकडीत बंद : पीआय साळवे यांच्या निलंबनासाठी चोपड्यात पाच हजार लोक रस्त्यावर !

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.