Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावातील कारागृहात कैद्यांमध्ये फ्री स्टाईलहाणामारी
    क्राईम

    जळगावातील कारागृहात कैद्यांमध्ये फ्री स्टाईल
    हाणामारी

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रNovember 19, 2021Updated:November 19, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव जिल्हा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात हाणामारी झाल्याची घटना गुरुवारी घडली. हाणामारी सोडवत असतांना एका कैद्याने चक्क कारागृह पोलिस कर्मचार्‍याला कडाडून चावा घेतला. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.

    सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार असे की, जळगाव जिल्हा कारागृहात अमोल ऊर्फ कार्तिक नाना सोनवणे (मराठे) (वय-29 रा. खेडी ब्रुदूक ता. जळगाव) हा न्यायबंदी खुनाच्या गुन्ह्यात 1 ऑक्टोबर 2019 पासून बॅरेक नं.12 मध्ये दाखल आहे. गुरुवारी कारागृह अधीक्षक अनिल वांढेकर हे कारागृह गस्त घालत होते.

    यावेळी कैदी अमोल सोनवणे हा त्याच्या बॅरेकच्या बाहेर निघुन त्याने बॅरेक 9 मध्ये जावुन टिव्ही लावला. यावेळी न्यायबंदी समाधान वाल्मीक शेवाळे याने अमोल याला तू आमच्या बॅरेक मध्ये कशासाठी आला, येथे आमचे साहित्य चोरीला जाते असे सांगीतल्यावरुन वादाला सुरुवात झाली.

    या वादात टिव्ही फोडण्याची धमकी देत, टिव्हीचा रिमोट तोडला. अमोल याचा मित्र तेजस दिलीप सोनवणे याच्यासह चेतन पितांबर सोनार असे दोघे वादात पडल्यानंतर वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. हाणामारी झाल्यावर कारागृह पोलीस कर्मचारी निवृत्ती काशिनाथ पवार, सुभाष बाबुराव खरे व तुरूंगाधीकारी धावत आले. अमोल सोनवणे याला धरुन भांडण सोडवून नेत असतांना त्याने कारागृह अधीकार्‍यांशीच वाद घातला.

    हाणामारी थांबवुन अमोल सोनवणे याला अधीक्षकांच्या सांगण्यावरुन बॅरेक मध्ये बंद करण्यास नेत असतांना त्याने कर्मचारी दत्ता हनुमंत खोत, रोशन लहुगिरी, निवृत्ती पवार सुभाष रोकडे यांच्याशी झटापट केली.

    या झटापटीत दत्ता हनुमंत खोत या कर्मचार्‍याच्या हाताला कडाडून चावा घेतला. खोत यांच्यावर वैद्यकीय उपचार करुन याप्रकरणी जिल्हापेठ पेालिसांत तक्रार देण्यात आली आहे. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु होती. दरम्यान कैदी अमोल सोनवणे याच्या गैरवर्तनाचा अहवाल यापुर्वीही दाखल करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    राज्याच्या राजकारणात खळबळ: १७ रिक्त जागांसाठी निवडणूक, मेमध्ये आणखी ९ जागांचा फैसला

    April 16, 2026

    बांधकाम कामगार भांडी योजना लाभासाठी शंभर रुपयांची लाच!

    April 16, 2026

    नाशिक धर्मांतर-छळ प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; ‘निदा खान’च मुख्य सूत्रधार !

    April 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.