प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: धरणगाव तालुक्यातील बोरगाव खु येथे एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याचा रस्ता अडविला असल्याने त्याची पाहणी करण्यासाठी तहसीलदार गेले असता रस्त्याची दुरवस्था पाहता बैलगाडीतून प्रवास करीत शेत रस्त्याची पाहणी केली. तालुक्यातील मौजे बोरगाव खु येथील शेतकरी स्वप्नील मुरलीधर पाटील यांचा शेतरस्ता गोपीचंद जामू पाटील यांनी अडविला होता याप्रकरणी स्वप्नील पाटील यांनी तहसीदारकडे शेतरस्त्याच्या मागणी साठी अर्ज केला होता या प्रकरणी मामलेदार कोर्ट अधिनियम अंतर्गत कामकाज सुरू करण्यात आले आहे. आज २६ ऑक्टोबर रोजी धरणगाव तहसिलदार नितीनकुमार देवरे यांनी सदर रस्त्याची पाहणी करणायसाठी गेले असता शेतरस्ताची दुरवस्था पाहता त्यांनी चक्क बैलगाडीतून प्रवास करत शेतरस्ता पाहणी केली .यामुळे उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
महात्मा फुले यांनी दिलेल्या सत्यशोधक संस्कारांची गरज त्यासाठी महाराष्ट्रभर सत्यशोधक विधीकर्ते निर्माण करणार – डॉ. सुरेश झाल्टेलाईव्ह महाराष्ट्र न्यूज: एरंडोल येथील मोठा माळीवाडा मधील बालाजी मढीमध्ये १४८ व्या सत्यशोधक समाज वर्धापनदिनानिमित्त प्रबोधन शिबिर उत्साहात पार पडले.प्रबोधन शिबिराचे प्रास्ताविक संभाजी ब्रिगेडचे राकेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एरंडोल चे माजी नगराध्यक्ष माळी समाजभूषण देविदास भाऊ महाजन होते. या प्रबोधन शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे समता शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्रमुख वक्ते धुळे येथील सत्यशोधक डॉ. सुरेश झाल्टे, सत्यशोधक राजकिशोर तायडे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी तहसिलदार अनिल माळी, या प्रबोधन शिबिराला धरणगाव शहरातील प्रमुख अतिथी राष्ट्रीय चर्मकार…
प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: येथील शहा ऍग्रो याठिकाणी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अनुदानावर हरभरा, रब्बी ज्वारी बियाणे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे हस्ते वितरित करण्यात आले. सदर कार्यक्रम प्रसंगी विधानसभा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, पंचायत समिती सभापती प्रेमराज पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, उपमहापौर कुलभुषण पाटील, नगराध्यक्ष निलेश चौधरी, पी. एम. पाटील सर, राजेंद्र महाजन, किशोर शहा,तालुका कृषी अधिकारी किरण देसले, मंडळ कृषी अधिकारी अरुण कोळी, तंत्र अधिकारी राजेंद्र लोहार, बिटीएम आत्मा दीपक नागपुरे, किरण वायसे, गजानन मोरे, विजय पाटील, ईश्वर पाटील तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सदरील अनुदानित बियाण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव येथील सौ. सु.ग. देवकर प्रायमरी स्कूलचे उपक्रमशील शिक्षक श्री.सागर पाटील सरांना राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था, श्री राजपूत करणी सेना आणि गौरी उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २०२०-२१ च्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने पुष्पगुच्छ, शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. मीनाक्षी चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. गणेश अमृतकर, सौ. संदीपा वाघ, श्री. विलाससिंग पाटील, श्री. बी.एच.खंडाळकर, श्री. सुमित पाटील, श्री. ज्ञानेश्वर वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट लक्षात घेऊन त्यांनी विविध उपक्रम शालेय स्तरावर राबवले आहेत .सागर पाटील सर हे शिक्षक आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगर या आघाडीत महानगर…
प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: येथील कर्तव्य बहुउद्देशिय संस्थेचा वतीने रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले. काल रात्री लहान माळी वाडा माळी समाज पंच मढी येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात विजयी स्पर्धकांसह परिसरातील नागरीक उपस्थित होते. विचारपीठावर कर्तव्य संस्थेचे अध्यक्ष सुनिलभाऊ चौधरी, माळी समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन, चंदनगुरू व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाशभाऊ मराठे, सामाजिक कार्यकर्ते बंडु सोनार, दिलीप महाजन व राजेद्र महाजन उपस्थित होते. प्रारंभी प्रास्ताविकात जेष्ठ पत्रकार कडू महाजन यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली तसेच संस्थेचे अध्यक्ष सुनिल चौधरी यांनी सामाजिक कार्यात दिलेल्या योगदानाची माहीती देऊन त्यांचा कार्याचा गौरव केला. उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा कर्तव्य बहुउद्देशिय संस्थेचा वतीने सत्कार करण्यात आला.…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: तालुक्यातील आव्हाने बांबोरी प्र.चा. येथून मोठ्या प्रमाणात गिरणा नदी अवैध वाळूचा उपसा होत असे ज्या रस्त्याने वाळूचा करण्यात येत होता आज नायब तहसीलदार मंडल अधिकारी व कोतवाल यांनी सदरचे रस्ते खोदून तो रस्ता बंद केला. आव्हाने व बांबोरी प्र चा या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात गिरणा नदीतून अवैध वाळूचा उपसा सुरू होता. ग्रामस्थांनी अनेक वेळा याबाबत तहसील कार्यालयात तक्रारी केल्या होत्या या अवैध वाळू वाहतूक मुळे अपघात झालेले आहे तसेच पाणी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अवैध वाळू उपसा ने झालेल्या डबक्यामध्ये पाणी साचून अनेकांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे यामुळे हे रस्ते बंद करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत होती आज…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मध्यप्रदेशातून औरंगाबाद येथे चालल्या ट्रक मध्ये 50 गुरांना कोंबून विनापरवाना वाहतूक करणारा ट्रक पाल पोलीसांनी पकडला आहे. यात दोन जणांना ताब्यात घेतले असून गुरांची सुटका करण्यात आली आहे. पोलिस सूत्राकडून मिळालेली माहीती अशी की, मध्यप्रदेशातुन महाराष्ट्रात येणाऱ्या गुरांना निर्दयी पणे कोंबुन अवैध वाहतूक करणारा ट्रक शेरी नाकामार्गे एमपी १७ एचएच १८०३ हा ट्रक सुमारे ५० गुरांची अवैध पध्दतीने कत्तलीसाठी जात होता. याची माहिती पोलिसांना मिळताच पाल पोलिस चौकीचे पॉहेकॉ राजेंद्र राठोर, पो.कॉ. नरेंद्र बाविस्कर, पोकॉ दिपक ठाकुर, पोलीस नाईक अतुल तडवी, पो. कॉ. संदीप धनगर यांनी सापळा रचून ट्रक आडविला आहे. यात ४५ गुरांची सुटका करणयत आली आहे तर…
प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: येथील नगर परिषदेचे गटनेते विनय भावे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगाव शिवसेना शहरात तर्फे जाहीर कीर्तन सोमवारी ठेवण्यात आले आहे या कीर्तन जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शहर शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे. धरणगाव नगरपरिषदेचे नगरसेवक व शिवसेना गटनेते विनय शशिकांत भावे (पप्पू भावे) याच्या वाढ दिवसानिमित्ताने ह भ प पुरुषोत्तम महाराज बुलढाणेकर याचे 25 रोजी सॊमवरी सायंकाळी 7 वाजेला जाहीर कीर्तन ठेवले आहे साने पटांगण, काटे बाजार धरणगाव येथे आयोजित केले आहे या कार्यक्रमाचे आयोजन हे धरणगाव शहर शिवसेना यांनी आयोजित केला आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन धरणगाव शहर शिवसेनेतर्फे करण्यात…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील मेहरूण परिसरातीळ कृष्णा लॉन येथे एक तरुण गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतूस घेवून फिरणाऱ्या तरूणाला एमआयडीसी पोलीसात अटक केली आहे. त्याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत माहिती अशी की, शहरातील मेहरूण परिसरातीळ कृष्णा लॉन परिसरात एक तरूण बेकायदेशीर गावठी बनावटीचा पिस्तूल आणि काडतूस घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकातील पोलीसांनी शुक्रवारी २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास कारवाई करत संशयित आरोपी योगेश अंबादास बारी (वय-३१) रा. बारीवाडा पिंप्राळा याला ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्याच्या कमरेला गावठी बनावटीचे…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मारवाड पोलिसात दाखल असलेल्या गुन्ह्याची चार्टशीट पाठविण्यासाठी 15 हजाराची लाच घेताना पोलीस नाईक लाज लूजपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडण्यात आले आहे तक्रारदार, त्यांचे वडील व भाऊ यांचे विरुध्द मारवड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 105/2021, भा.द.वि. कलम-354,448 अन्वये गुन्हा दाखल असुन सदर गुह्यात मदत करून सदर गुह्याचे चार्जशीट लवकर पाठविण्याच्या मोबदल्यातपोलीस नाईक भास्कर नामदेव चव्हाण यांनी 15 हजाराची मागणी केली होती. याप्रकरणी DYSP. शशिकांत एस. पाटील, PI.श्री.संजोग बच्छाव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील,पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ यांनी जुनी पोलीस लाईन,अमळनेर येथे सापळा लावला…

