लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील दुध फेडरेशन जवळील रस्त्यावरून जात असतांना धान्याने भरलेली ट्रक खड्ड्यामुळे उलटून घरासमोर लावलेल्या कारवर पडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर स्थानिक नागरिकांनी नगरसेवक व महापालीकेविरोधात रोष व्यक्त केला. शहरात विविध भागात अमृत योजनेचे काम सुरु आहे. या अमृत योजनेच्या काम शिवाजीनगर परिसरात देखील या योजनेअंतर्गत काम करण्यासाठी खड्डे करण्यात आले आहेत. या रस्त्यावरून माल ट्रक (क्र.एमएच १९ झेड ५७६३) धान्य भरून जात होती. ट्रक चालकाला रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने ती ट्रक खड्ड्यामुळे उलटली असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. ही अपघातग्रस्त ट्रक थेट एका कारवर जावून पडली. यात त्या कारच्या काचा फुटल्या आहेत. या मार्गावर वारंवार…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
शेतकरी सुखी तर जग सुखी – ना.गुलाबराव पाटीलधरणगाव लक्ष्मण पाटील: शहरातील साने पटांगणावर महात्मा बळीराजा लोकोत्सव समिती धरणगाव यांच्या वतीने जगाचा पोशिंदा, लोककल्याणकारी, महात्मा बळीराजा गौरव दिनानिमित्त बळीराजाच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकल्प ऑर्गनायझेशनचे कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांनी केले. प्रास्ताविकात महात्मा बळीराजा यांच्या काळात शेतकरी अतिशय सुखी व समाधानी होता. लोककल्याणकारी राजा म्हणून बळीराजाची ख्याती होती, म्हणूनच दिवाळी सणामध्ये घराघरातील माता-भगिनी म्हणतात – “इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो” अशा महान राजाच्या कार्याबद्दल ग्रामस्थांना विस्तृत अशी माहिती सांगितली. तसेच याप्रसंगी पाटील सरानी आपल्या शहरात महात्मा बळीराजाचे भव्यदिव्य स्मारक व्हावे, अशी अपेक्षा बळीराजा लोकोत्सव समितीच्या वतीने…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयासमोर शुक्रवार ५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाऊबजीचे औक्षण करून इंधनदरवाढीचा निषेध करण्यात आला.याबाबत माहिती अशी की, पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात खासदार सुप्रिया सुळे यांच्याच्या आदेशानुसार युवती प्रदेश अध्यक्ष सक्षणा सलगर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवती काँग्रेस व महानगर यांच्या वतीने शुक्रवार ५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयासमोर केंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्या केलेल्या भरमसाठ दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला. सर्वसामान्यांचे जगणे सोपे करण्याची गरज असताना केंद्र सरकार मात्र सतत भाववाढ करून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरत आहे,म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: दीपावली सण हा सगळ्यांनी उत्साहात साजरा करण्यासाठी दिपावली निमित्ताने मातंग समाजाला भैया भाऊ महाजन यांच्या वतीने मिठाई वाटप करण्यात आले.मातंग समाजाने आपली दिवाळी उत्साहात साजरी करावी यासाठी भैयाभाऊ महाजन यांनी अनोखी संकल्पना राबविली.या प्रसंगी माळी समाजचे अध्यक्ष विठोबा नामदेव माळी यांचे हस्ते मरीआई माताचे पुजन केले. गोर गरिब मातंग समाजाची दिपावली ही सुख समृद्धीची आनंदाची जाओ या साठी भैयाभाऊ यांनी घरोघर जाऊन मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या.मातंग समाजाचा वतीने महिलांनी भैयाभाऊ महाजन यांचे औक्षण करून स्वागत केले या कार्यक्रमाला उपस्थित माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा नामदेव माळी ,सुभाष महाजन .राजु सुकलाल महाजन भैयाभाऊ महाजन .राहुल भाऊ महाजन .महेंद्र वऱ्हाडे…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील कंजरवाडा परिसरातील एका दुकानाचे कुलूप तोडून दुकानातून अडीच लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास करण्यात आल्याची घटना ३१ ऑक्टोबर रोजी घडली होती. याप्रकरणी जळगाव येथील साथीदारांच्या सहाय्याने घरफोडी करणाऱ्या चोरट्यास मध्यप्रदेशातून अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. भारतसिंग आयासिंग भाटिया (वय-१९) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. जळगाव शहरातील संत चोखामेळा वस्तीगृहामागील नंदुरबारकर सराफ या दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी २ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना ३१ ऑक्टोबर रोजी घडली होती. याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाचा तपास सुरु असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: सर्वत्र दिवाळीचा उत्साह सुरू असतांना दिव्यांग, गतिमंद मुलांनी देखील सामाजिक भावना जपत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने दीपोत्सव साजरा केला आहे. रुशील मल्टिपर्पज फाऊंडेशन संचलित उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातर्फे दिवाळीच्या पूर्वसंध्येला चिमुकले श्रीराम मंदिरात ११५१ दीप प्रज्वलित करण्यात आले.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर जयश्री महाजन, ह.भ.प.दादा महाराज जोशी, भाजप गटनेते भगत बालाणी, डॉ.स्नेहल फेगडे, सुप्रीम कंपनीचे अनिल काबरा, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, डॉ.आदित्य माहेश्वरी, धनराज कासट, मनिषा पाटील, विनोद शिरसाळे, आदींसह उडानचे सदस्य, दिव्यांग विद्यार्थी उपस्थित होते.उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातर्फे बुधवारी चिमुकले श्रीराम मंदिरात सायंकाळी ६ वाजता दिवाळी पूर्वसंध्या उपक्रम राबविण्यात आला. उपक्रमात दिव्यांग बालकांनी ११५१ तेलाचे दिवे प्रज्वलित केले.…
प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: गेलेला व्यक्ती हा परत येऊ शकत नसला तरी आयुष्यात नव्या उमेदीने वाटचाल करावीच लागणार आहे. यासाठी राज्य शासन आणि भाऊ म्हणून आपण आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते तालुक्यातील ५२ विधवांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्या योजनेच्या अंतर्गत प्रत्येकी २० हजार तर आत्महत्याग्रस्त दोन शेतकर्यांच्या पत्नींना प्रत्येकी लाखाची मदत करण्यानिमित्त आयोजीत कार्यक्रमात बोलत होते. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या १८ ते ५९ वर्षे वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना एक महिन्याच्या आत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत एकरकमी २० हजारांचा अर्थसहाय्याचा धनादेश दिला जातो. या अंतर्गत धरणगाव…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील मासुमवाडी परिसरातील सय्यद असरार नगर येथे मध्यरात्री घरातून दोन मोबाईलसह रोकड असा एकुण ५५ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या संशयित वसीम कबीर पटले याला अटक केली आहे. याबाबत माहिती अशी की, शेख सलीम शेख रशिद (वय ४७) हे ब्रोकर आहेत. सोमवार, १ नोव्हेंबर रोजी रात्री नेहमीप्रमाणे शेख सलीम व त्यांचे कुटुंब झोपले. मध्यरात्री चोरट्यांनी मुख्य दरवाजाची आतून लावलेली कडी उघडून घरात प्रवेश केला. तसेच घरातील २ मोबाईल, २५ हजार रुपये रोख, २३ हजार रुपये किंमतीच्या चांदीच्या १२ अंगठ्या, ८ ग्रॅमचे चांदीचे पेंडल व ३ तीन लहान पितळी भांडे असा ५५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. मंगळवारी सकाळी ६…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: आरोग्य सेवकांच्या परीक्षेला मुला बरोबर आलेल्या औरंगाबाद येथील प्रौढाला एकाने एटीएम कार्ड बदली करून परस्पर ३३ हजार रूपये काढून फसवणूक केली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील आमदडे येथील बन्सी बाबुलाल सनगत (वय-४३) ( ह.मु. गंगापूर, औरंगाबाद) हे ३१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता हे त्यांचा मुलाची आरोग्य सेवकाचा परिक्षा देण्यासाठी जळगावात आले होते. शहरातील कोर्ट चौकातील एचडीएफसी बँकेच्या एटीएम मध्ये जावून त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला परंतू काढता आले नाही. त्यावेळी ३० ते ३५ वयोगटातील अनोळखी तरूण मुलगा तेथे आला. मी पैसे काढून देतो असे…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील शिवाजी नगर भागातील हुडको परिसरात महापालिकेचे कर्मचारी वालमन पाणी सोडण्यासाठी जात असतांना दोन जणांनी दारूच्या नशेत शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. याप्रकरणी शहरपोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी की, उमाकांत संभाजीराव चव्हाण (वय-५८) रा. पिंप्राळा शिवार जळगाव हे जळगाव महापालिकेत वालमन म्हणून कर्मचारी आहे. ते शहरातील विविध भागात पाणी सोडण्याचे काम करतात. मंगळवार २ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास उमाकांत चव्हाण हे त्यांच्या दुचाकीने शिवाजी नगर हुडको भागात पाणी सोडण्यासाठी जात असतांना जनार्दन कोळी आणि गणेश (पुर्ण नाव माहित नाही) दोन्ही रा. शिवाजी नगर यांनी चव्हाण यांचा रस्ता आडविला…

