Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: आकाशवाणी चौक परिसरातील दोन ठिकाणी चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील सोन्याची अंगठी आणि रोकड असा एकुण दीड लाख रूपयांचा ऐवज लंपास केल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, प्रसाद यशवंत काळे (वय-४७) रा. आसोदा ता. जि.जळगाव ह.मु. गणेश नगर, आकाशवाणीच्या मागे जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते जैन कंपनीत नोकरीला आहे. दिवाळीनिमित्त घरातील सदस्य गावाला गेले होते. प्रसाद काळे यांची कंपनीत रात्रपाळी असल्याने ते ७ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता घराला कुलूप लावून कामाला निघून गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटातील…

Read More

माघारी अर्जानंतर लढतीचे चित्र स्पष्ट ५ गटातील ४२उमेदवारांच्या सहकार व शेतकरी पॅनलमध्ये होणार लढती लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा बँकेच्या २१ संचालकांच्या निवडणूकीसाठी ८ नोव्हेंबर रोजी १०८ उमेदवारांच्या माघारीनंतर ५ गटातील ४२ उमेदवारांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. निवडणूक लढवित असलेल्या ४२ उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडून मंगळवार दुपारी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. यात निवडणूक रिंगणात असलेल्या दोन ते तीन उमेदवार वगळता अन्य उमेदवारांनी सहकार व शेतकरी पॅनल गठीत केले असून बुधवारपासून निवडणूक प्रचाराला सुरूवात केली जाणार आहे. तर निवडून आलेल्या उमेदवारांमधून अध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी आडाखे बांधणे सुरू असून यात चुरस रंगणार असल्याचे चित्र आहे.    २०२१-२०२६ साठी जिल्हा बँकेच्या २१…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू नं. ०१ शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक शेख ऐनोद्दीन सय्यद हसन यांना शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जळगांव येथील हजरत बिलाल बहुउद्देशीय सोसायटीच्या वतीने स्वर्गवासी डॉ. अब्दुल गफ्फार मलिक यांच्या स्मरणार्थ व सिरतुन्नबी निमित्त आयोजित कार्यक्रमात भुसावळ नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष हाजी मुन्ना इब्राहिम तेली यांच्या शुभहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सदरचा कार्यक्रम अल्पबचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथे संपन्न झाला. याप्रसंगी अध्यक्षीय स्थान अंजुमन तालीमुल मुस्लिमीनचे चेअरमन एजाज़ अब्दुल गफ्फार मलिक यांनी भूषविले. यावेळी डाॅ. अब्दुल करीम सालार, भुसावल नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष हाजी मुन्ना इब्राहिम तेली, नगरसेवक इब्राहीम…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा मध्यवर्ती बँक प्रस्थापितांचा एक वर्ग तयार झालेला आहे या प्रस्थापिताच्या वर्गाला आव्हान देण्यासाठी शेतकरी विकास पँनल तयार केले आहे ही बँक सर्व सामान्य माणसाची आहे धन्यधण्याचे कारस्थान उथळून लावण्यासाठी हे पॅनल उभे केले असल्याचे कॉग्रेस चे माजी प्रदेश सचिव डी जी पाटील  यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत आज राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस भाजपा पक्षातील काही समविचारी लोकांनी एकत्र येऊन शेतकरी विकास पॅनल तयार केले असून यात अरुणा दिलीपराव पाटील काँग्रेस विकास मुरलीधर पवार राष्ट्रवादी काँग्रेस वाघ विकास ज्ञानेश्वर कल्पना शांताराम पाटील राष्ट्रवादी काँग्रेस रवींद्र सूर्यभान पाटील भारतीय जनता पार्टी राजू रघुनाथ पाटील सुरेश शांताराम…

Read More

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: येथील जि.प. उर्दू प्रा. शाळा क्र. ०१ च्या मोहसीन खान अजीज खान यांची “खान्देश भूषण व आदर्श शिक्षक पुरस्कार २०२१” साठी निवड करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील नामांकित आदिलशाह फारुकी संस्थेतर्फे ह्यावर्षी दिला जाणारा “खान्देश भूषण पुरस्कार” व मौलाना अबुल कलाम आजाद सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय, कर्जोद ता. रावेर जि. जळगाव यांच्या तर्फे “आदर्श शिक्षक पुरस्कार – २०२१” साठी धरणगाव येथील जि.प. उर्दू प्रा. शाळा क्र. ०१ च्या मोहसीन खान अजीज खान यांची निवड करण्यात आली आहे. पोस्टाने प्राप्त झालेले अर्ज तसेच ऑनलाइन अर्ज आणि विश्वसनीय मान्यवरांनी सुचवलेल्या नावांची छाननी करून ही…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीवरच भाजपने बहिष्कार टाकला आहे . भाजप पक्षाचे सर्व 18 उमेदवारांनी माघार घेतली आहे.यावेळी माध्यमांशी बोलताना आ महाजन म्हणाले की सर्व ठरले असताना यांनी यु टर्न घेतला आमच्या खासदार, आमदार याचे अर्ज बाद केले त्यामुळे भाजपने या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे म्हणून निवडणुकीतुन माघार घेतली आहे.यावेळी खासदार रक्षा खडसे , खासदार उन्मेष पाटील , आमदार राजूमामा भोळे , आमदार संजय सावकारे , आमदार मंगेश चव्हाण , पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार , भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते.जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या माघारीच्या शेवटच्या दिवशी दुपारी 2.45 वाजेला भाजप पक्षाचे सर्व उमेदवार यांनी निवडणूक कार्यालयात…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: पालकमंत्री गुलाबराव पाटील नारायण राणे यांच्यावर केलेल्या टीकेतून निलेश राणे यांनी पालकमंत्र्यांवर अर्वाच्च भाषेत केलेल्या टीकेच्या निषेधार्थ आज धरणगाव येथे शिवसैनिकांनी निलेश राणे यांची प्रतीकात्मक अंतयात्रा काढून निषेध व्यक्त केला. राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री  गुलाबराव पाटील यांच्यावर अश्लील शब्द वापरल्याबद्दल  धरणगाव शहरांमध्ये नारायण राणे  याचे सुपुत्र निलेश राणे यांची अंतयात्रा हुबेहुब काढून निषेध व्यक्त करण्यात आला. सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, राजेंद्र महाजन, गटनेते पप्पू भावे, वाल्मीक पाटील, भैय्या महाजन, राहुल रोकडे,योगेश वाघ व शिवसेनेचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

आपेगाव व मुक्ताईनगर दोन्ही संस्थानने जपली  परंपरा लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: दरवर्षी प्रमाणे भाऊबीजेला बहिणीसाठी भावाने साळी भेट देत असतात त्याप्रमाणे बहीण मुक्ताबाईस बंधू ज्ञानेश्वर महाराज श्री क्षेत्र आपेगाव संस्थान यांच्याकडील साडीचोळी भाऊबीजेच्या पर्वावर अभिषेक पूजनाने संत मुक्ताबाईस परिधान करण्यात आली. संत परंपरेत बहीण भावाचे नाते जपणाऱ्या या भाऊबीज उत्सवाला पहाटे मोठ्या प्रमाणात भाविकांनी उपस्थिती लावली होती.भाऊबीजेच्या दिवशी संत मुक्ताबाईला साडी चोळी परिधान करण्यात येते या भाऊबीज उत्सवास साक्षीदार होण्यासाठी पहाटेच भाविकांची मांदियाळी मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई नवे मंदिर येथे जमली होती. ह्यावेळी संत मुक्ताबाई रविंद्र हरणे महाराज यांच्यासह जिजाभाऊ मिसाळ यांनी सहपत्निक संत मुक्ताईची पंचामृताने अभिषेक पुजा आरती केली. यावेळी कार्यक्रमाला…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: कुस्ती मल्लविद्या महासंघाचे उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस मेजर धर्मराज पाटील तसेच भडगाव तालुका सदस्य महेंद्र केदार यांनी आज धरणगाव येथे सदिच्छा भेट दिली असता त्यांचा विकल्प ऑर्गनायझेशन तर्फे सत्कार करण्यात आला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, कुस्ती मल्लविद्या महासंघ संचलित महाराष्ट्रातील दुसरे मल्लविद्या कुस्ती केंद्र धरणगावात स्थापन करण्यात येणार आहे. कुस्ती मल्लविद्या महासंघ संस्थापक अध्यक्ष श्री. गणेश मानगुडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे कुस्ती केंद्र स्थापन करण्याच्या मानस आहे. यासंदर्भात आज कुस्ती मल्लविद्या महासंघ धरणगाव तालुक्याची मिटिंग विकल्प ऑर्गनायझेशन च्या कार्यालयात संपन्न झाली. याप्रसंगी मेजर धर्मराज पाटील व महेंद्र केदार यांचा शाल – श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा बँक निवडणुकीमध्ये सुरुवातीपासून आघाड्यांच्या तिडा सुटल्याचा नाव घेताना दिसून येत नाहीये पूर्वी सर्वपक्षीय आघाडी होणार म्हणून सर्व पक्षांनी कोर कमिटी बनवली मात्र काँग्रेसने भाजपबरोबर जाण्यास नकार दिल्याने सर्वपक्षीय आघाडी न होता सर्व पक्षांनी अर्ज भरले महा विकास आघाडी होणार म्हणून बैठका झाल्या मात्र चोपड्याच्या जागेवरून अजूनही वाद सुरू असल्याने तोही तिढा सुटला नसल्याने आज सोमवार दुपारी माघार ची मुदत असल्याने माघारी नंतरच चित्र स्पष्ट होणार का असेच चित्र दिसू लागले आहेतसंसर्ग प्रादूर्भावामुळे तब्ब्ल तीन ते चार वेळा जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाला मुदत वाढ देण्यात आली होती.  दिड वर्ष लांबणीवर पडलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणूकांचा कार्यक्रम सहकार विभागाकडून…

Read More