Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने दिवाळीच्या पुर्व संध्येला पेट्रोल व डिझेल वरील एक्साईज कर प्रतिलिटर अनुक्रमे ५ व १० रुपयांनी कमी जनतेला मोठा दिलासा दिला होता. सदर दर कमी करण्यात यावे यासाठी कॉंग्रेस व सर्व विरोधी पक्षांनी मोठमोठी आंदोलने केली होती, परंतु केंद्र सरकारने दर कमी केल्या नंतर भाजपा शासित राज्ये वगळता कोणत्याही राज्याने पेट्रोल व डिझेल वरील दरात कपात केलेली नाही, यासाठी भाजपा जळगांव च्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले.यावेळी माजी मंत्री आ. गिरीषजी महाजन, खासदार रक्षाताई खडसे व भाजपा जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव येथे राज्यातील मविआ…

Read More

कुडे व बालकवी विद्यालयाच्या माजी विद्यार्थाचे यशप्रतिनिधी लक्ष्मण पाटील: येथील सा. दा. कुडे व बालकवी ठोंबरे विद्यालयाचा माजी विद्यार्थी कुस्तीपटू अक्षय देविदास सोनवणे या विद्यार्थाची गोवा येथे नुकत्याच झालेल्या 9 वी मास रेसलिंग स्पर्धेत त्याची 56 किलो वजन गटात निवड झाली होती. त्याने फायनल मध्ये झारखंड च्या मल्लास पराजित करून गोल्ड मेडल मिळवल्याने त्याची आता आतंरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एस. एस. पाटील, डी. आर .चव्हाण, के. जे. पवार, क्रिडाशिक्षक एस. एल. सूर्यवंशी यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक जीवन पाटील, तसेच संस्थेचे अध्यक्ष हेमलालशेठ भाटीया, उपाध्यक्ष अंकुश पाटील, सचिव प्रा.…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरातील नेहरू नगरातील ४० वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रात्री उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.जतीन जयप्रकाश चांगरे (वय-४०) रा. सेंट टेरेसा शाळेसमोर, नेहरू नगर जळगाव असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, जतीन चांगरे हे पत्नी व दोन मुलांसह नेहरू नगरात वास्तव्याला आहे. ते जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वार्ड बॉय .म्हणून नोकरीला आहे. दिवाळी निमित्त त्याची पत्नी व दोन्ही मुले माहरी मनमाड जि.नाशिक येथे गेल्या होत्या. तर वडील जयप्रकाश मनिराम चांगरे हे रेल्वे सेवेतून सेवानिवृत्त अधिकारी आहेत. ते शहरातील नवल कॉलनी येथे…

Read More

इमारतींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर  लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील शनिपेठ परिसरातील महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक १७ जवळ असलेली जुनी दोन मजली इमारत गुरुवारी दि. ११ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास कोसळली. यामध्ये किरकोळ जखमी झाले असून त्याच्यावर सामान्य रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करण्यात आले आहे जीवित हानी झालेली नाही. यामुळे जुन्या इमारतींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.जळगावकर सकाळी गुलाबी थंडीमध्ये गाढ झोपेत असताना शनिपेठ भागांमध्ये इमारत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. महानगरपालिकेची १७ क्रमांकाची शाळा शनिपेठ परिसरात आहे. त्याच्याच समोर असणारी दोन मजली जुनी इमारत गुरुवारी पहाटे ४ ते ४:३० वाजेच्या सुमारास अचानक कोसळली. त्यामुळे नागरिकांची प्रचंड धावपळ उडाली. ढिगाऱ्याखाली…

Read More

शासन निर्णय जारी, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची वचनपूर्तीलाईव्ह महाराष्ट्र न्यूज: धरणगाव येथील विस्तारीत भागासह संपूर्ण शहराच्या पाईपलाईनसाठी राज्य शासनाने सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेतून २७ कोटी ४४ लाख रूपयांच्या निधीला मंजुरी दिली असून याबाबतचा शासन निर्णय (जीआर) आज नगरविकास खात्यातर्फे जाहीर करण्यात आला आहे. तब्बल पाच दशकानंतर धरणगावातील जुन्या जलवाहिन्या बदलण्यात येणार असून यामुळे शहरात पाणी पुरवठा योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वात मोठा अडसर दुर झाला आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची जलवाहिन्यांच्या कामांसाठी लवकरच निधी मिळणार असल्याची केलेली घोषणा या माध्यमातून प्रत्यक्षात उतरली आहे. तर. ना. गुलाबराव पाटील यांनी यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांच्या माध्यमातून धरणगावच्या इतिहासातील या मोठ्या कामांना लवकरच…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरात जवाहर रोड गुजराथी गल्ली, धरणगांव तालुक्यात खामखेडा, सार्वे, बाभळे, येथील परवानाधारकांनी राजीनामा दिल्याने तसेच विवरे, भोकणी, मुसळी बु, शेरी, कल्याणे बु. या पाच महसुली गांवात दुकान नसल्याने व बोरगांव बु. येथील रद्द केल्याने व गारखेडा येथे विनापरवानगीदिर्घ मुदतीपासुन रजेवर असल्याने या ११ ठिकाणी नव्याने स्वस्त धान्य दुकानांचे जाहिरनामे दि. १२ ऑक्टोबर, २०२१ रोजी जाहिर करण्यात आलेले आहेत. त्यासाठी अर्ज धरणगांव पुरवठा विभागात उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि.२० नोव्हेंबर- २०२१ पर्यंत आहे, अशी माहिती धरणगांव तहसिलदार नितीनकुमार देवरे यांनी दिली.यासाठी गावातील ग्रामपंचायत, बचत गट, सहकारी संस्था, आदिना अर्ज करता येणार आहे. अशी माहिती ही…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भारतीय जनता युवामोर्चा जळगाव जिल्हा महानगर तर्फ  नवाब मलिक यांच्या पुतळ्याचे दहन आज  10 रोजी सायंकाळी 5 वाजता  शहरातील टॉवर चौकात करण्यात आले.महाविकास आघाडीचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर व ग्रामीण तर्फ देशद्रोही नवाब मलिक यांचा निषेध व्यक्त करत राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यावेळी जळगाव जिल्हा महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, प्रदेश महिला उपाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, महानगराचे सरचिटणीस नितीन इंगळे, महानगर उपाध्यक्ष राजेंद्र मराठे, युवा मोर्चा महानगर अध्यक्ष आनंद सपकाळे, महिला मोर्चा अध्यक्ष दीप्तीताई चिरमाडे, महानगर चिटणीस राहुल वाघ, विधानसभा क्षेत्रप्रमुख दीपक साखरे, जळगाव तालुका अध्यक्ष गोपाल भंगाळे, नगरसेवक विरेन…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा बँकेमध्ये माघारीनंतर अनेक घडामोडी घडत आहे जिल्हा बँकेत भाजपने माघार घेतली आहे.तर नाराज पदाधिकाऱ्यांनी आपले पॅनल बनविले असून त्यांनी बलाढय नेत्यांना आव्हान दिले आहे तर रावेर मध्ये मात्र वेगळेच पॅटर्न पाहायला मिळत आहे राष्ट्रवादीच्या माजी आमदारांना भाजपने पुरस्कृत केल्यानंतर चक्क कॉंग्रेसच्या उमेदवाराने जाहीर पाठींबा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.या जागेसाठी कॉग्रेस चे आमदारशिरीष चौधरी यांनी खूप प्रयत्न केले होते ती त्यांना मिळाली सुद्धा होती मात्र कॉग्रेस च्या उमेदवाराने दुसऱ्या च उमेदवाराला पाठींबा जाहीर केला. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माघारी नंतर अनेक घडामोडी होत आहे. रावेर विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघात अतिशय नाट्यमय घडामोडी झाल्या. राष्ट्रवादीचे माजी आमदार…

Read More

प्रतिनिधी प्रविण पाटील: आमदार संजय शिरसाठ यांनी ग्रामसेवकांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा जाहीर निषेध करीत जळगाव तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष बबन राजु वाघ यांनी बीडीओ, तहसीलदार, पोलीस निरीक्षक याना निवेदन देण्यात आले.औरंगाबाद पश्चिम विधानसभेचे आमदार संजय शिरसाठ यांनी  ०८ रोजी औरंगाबाद येथे सरपंचांचे प्रशिक्षण कार्यशाळेत भाषण करतांना, शासकिय व्यासपीठावरुन ग्रामसेवक संवर्गाबद्दल “भामटा, हरामखोर ” अशी  अपशब्द वापरुन संवर्गाची बदनामी केली तसेच, ग्रामविकासात सरपंच व ग्रामसेवक यांची संयुक्तीक जबाबदारीचे भान न ठेवता दोघांमध्ये कसा तेढ निर्माण होईल ? अशा दृष्टीने, ग्रामसेवक तुमचा नौकर आहे, तो तुमच्या हाताखाली काम करतो, त्याचे ऐकु नका, असे वेजबाबदार विधान करुन दोन ग्रुपमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील विनोद धोंडू शिंदे यांचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे ४ लाख ८३ हजाराचा मुद्देमाल चोरणाऱ्या दोन संशयितांना जळगावातील तांबापुरातून एमआयडीसी पोलीसांनी अटक केली. दोघांना मुक्ताईनगर पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. याबाबत माहिती अशी की मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील विनोद धोंडू शिंदे  हे वरणगाव फॅक्टरीत नोकरीला आहे. आपल्या कुटुंबीयांसह कोथळी येथे वास्तव्याला आहे. विनोद शिंदे यांच्या काकाचे निधन झाल्याने त्यांच्या दशक्रियाविधी कार्यक्रमासाठी घराला कुलूप लावून बोईसर नवापूर येथे आई व वडील यांच्यासोबत बाहेरगावी गेले होते. याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोडा तोडून  कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, टाटा स्काय कंपनीचा सेटटॉप बॉक्स…

Read More