Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव शहरातील चौघुले प्लॉट परिसरात रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास एका सलून व्यवसायिक तरुणाची चॉपरने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. तरुणाला गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याची प्राणज्योत मालवली.ममुराबाद रस्त्यावर असलेल्या प्रजापत नगरात राहणाऱ्या सुनील सुरेश टेमकर वय-३६ या तरुणाचे चौघुले प्लॉट परिसरात सलून दुकान आहे. गेल्या ५ दिवसांपासून तो आजारी असल्याने त्याचे दुकान बंद होते. रविवारीच त्याने दुकान उघडले होते. रात्री १० वाजेच्या सुमारास त्याच्यावर कुणीतरी चॉपरने वार केल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याची प्राणज्योत मालावली. जिल्हा रुग्णालयात शनीपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक बळीराम…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव शहरातील बळीराम पेठेतील बळीराम गंगुबाई शाळेच्या गल्लीत एका पत्राच्या शेडमध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार करून वाहनांमध्ये वापर करणाऱ्यावर शहर पोलीसांनी कारवाई केली. या कारवाई २१ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बळीराम गंगूबाई शाळेच्या मागील गल्लीत एका पत्र्याच्या टपरीतमध्ये संशयित आरोपी नाजीम खान नयीम खान रा. काट्या फाईल, शनीपेठ जळगाव हा बेकायदेशीरपणे घरगुती गॅसचा वापर वाहनांमध्ये करत असल्याची गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक विजय ठाकुरवाड यांना शनीवारी दुपारी १२ वाजता मिळाली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने दुपारी १ वाजता धाड टाकून…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । ‘फ्लॅट घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये’ असे सांगून 22 वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून गर्भपाताच्या गोळ्या दिल्या जात असल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पोलिसात पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर असे, धुळे शहरातील शारदा नगर येथील 22 वर्षीय विवाहितेला पुणे येथे ‘फ्लॅट घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये’ असे सांगत तिच्यावर शारीरिक व मानसिक छळ पती सुमित कृष्णा जाधव, सासरे कृष्णा उत्तम जाधव, सासु प्रमिला कृष्णा जाधव व नणंद गौरी जाधव आदींनी केल्या. सुरूवातीला घरात विवाहितेला चांगली वागणूक मिळाली. मात्र, नंतर पाच लाख माहेरून घेऊन ये…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव शहरातील बजरंग बोगद्याजवळ एका मुलीचा ५९ हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी १७ ऑक्टोबर रोजी लांबविला होता. या गुन्ह्यातील तीन संशयितांना अटक करण्यात आली असून मोबाईल हस्तगत करण्यात आला होता.रविवारी २१ नोव्हेंबर रोजी दुपारी जिल्हा पेठ पोलीसांनी फिर्यादीस चोरीस गेलेला मोबाईल सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंता हस्ते परत देण्यात आला. अधिक माहिती अशी कि , पुजा दिलीप भावसार (वय-२८) रा. गणेश कॉलनी अशोक बेकरी ख्वाजा मिया जवळ ही तरूणी १७ ऑक्टोबर रेाजी दुपारी २ वाजेच्या सुमारास गणेश कॉलनीतील अशोक बेकरीजवळ पायी जात असतांना समोरून दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीके १३८६) क्रमांकावरील दुचाकीवर अनोळखी तीन जणांनी धडक…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: रावेर विकासो मतदार संघात माजी आ.अरुण पांडुरंग पाटील यांना जनाबाई गोंडू महाजन यांनी जाहिर पाठिंबा दिल्यानंतर गेल्या १० दिवसांपासुन राजकीय वातावरण शांत होते. अचानक मतदानाच्या दिवशीच महाजन यांनी राजकीय खेळी खेळत स्वत:च्या पारड्यात मते पाडण्यासाठी फिल्डींग लावल्याने रावेर तालुक्यात अचानक पाठीत खंजीर खुपसले गेल्याने राजकारणाची दिशा आगामी काळात बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेवटी जाहिर पाठिंब्यानंतर जर चुरशीची लढत होवून कुणीही विजयी झाला. शेवटी याठिकाणचे राजकारण भविष्यात हमरी तुमरीवर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रावेर विकासो मतदार संघात जनाबाई गोडू महाजन या उमेदवार खडसे व आ.चौधरी गटाच्या होत्या. तसेच अरुण पांडुरंग पाटील यांना भाजपाच्या गटाने…

Read More

जळगाव प्रविण पाटील। तालुक्यातील कुसुंबा येथील अंगणवाडी येथे राज्य महिला बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल यांनी रविवारी २१ नोव्हेंबर रोजी दुपारी भेट देवून कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे महिला बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र राऊत, जळगाव बालविकास प्रकल्प अधिकारी विजयसिंग परेदशी, तालुका प्रकल्प अधिकारी सुधा गिंधेवार आदी उपस्थित होते. भेटीदरम्यान आयुक्त रूबल अग्रवाल यांनी अंगणवाडीत महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ३ते६वर्ष वयोगटातील आकार बालशिक्षण क्रम साहित्य व कृतीची पहाणी केली. पोषण आहार योजना तसेच शासनाच्या अंगणवाडी संबंधित सर्व योजनांचा लाभ व माहिती लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचविता की नाही हे उपस्थितांनकडुन जाणुन घेतली. तसेच कुपोषित मुले, रक्ताल्पता असलेल्या…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: अतिवृष्टीग्रस्तांना तसेच वादळग्रस्तांना अल्प मदत देऊन शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीबाबतही बळीराजाची फसवणूक केली. पीक विमा कंपन्यांना फायदेशीर अटी बनवून नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित ठेवले. नैसर्गिक संकटांमुळे खचलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याऐवजी महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या भ्रष्ट, नाकर्त्या आणि कोडग्या कारभारामुळे उद्ध्वस्त केले, असा घणाघाती आरोप भारतीय जनता पार्टीचे खा.उन्मेष पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. यावेळी आ.सीमा हिरे, सरचिटणीस पवन भगुरकर, सुनिल बच्छाव, देवदत्त जोशी, प्रविण अलई आदी उपस्थित होते.श्री.उन्मेष पाटील यांनी या पत्रकार परिषदेत आघाडी सरकारच्या शेतकरी द्रोही भूमिकेचा पंचनामाच सादर  केला. ते म्हणाले की, सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांना बांधावर जाऊन हेक्टरी…

Read More

जळगाव प्रतिनिधी: आज एस टी महामंडळाने काही बसेस सुरु केल्यावर त्यापैकी चोपड्याला जाणाऱ्या बसवर ममुराबादजवळच्या रेणुकामाता मंदिराजवळ अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली . एस टी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे प्रतीक्षा यादीतील ३८ चालक व वाहकांना कामावर बोलावून आजपासून जळगाव आगारातून बसेस काही मार्गांवर सोडण्यात  आल्या . यापैकी चोपडा मार्गावर एक बस जळगाव आगारातून दुपारी सोडण्यात आली ही बस चोपड्याकडे जात असताना ममुराबादजवळच्या रेणुकामाता मंदिराजवळ अज्ञात व्यक्तींनी दगडफेक  केली आणि काचा फोडल्या . या बसवर आजच रुजू करून घेतलेले चालक आणि वाहक नेमलेले होते . या घटनेची माहिती कळल्यावर एस टी चे विभाग नियंत्रक भगवान जोगणार…

Read More

धरणगाव लक्ष्मण पाटील: येथील कापूस उद्योग क्षेत्रातील नामांकित अशी श्रीजी जिंनिंग फॅक्टरी आज दिनांक २१/११/२०२१ रोजी २० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. आज पासून २० वर्षांपूर्वी याच दिवशी धरणगाव शहरातील दिग्गज व्यक्तिमत्त्व नयनशेठ गुजराथी, माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी, जीवनआप्पा बयस, स्व. प्रकाशशेठ कर्वा यांनी ‘शेतकरी सुखी तर, जग सुखी’ या संकल्पनेने प्रेरित होऊन, हा उद्योग सुरू केला होता. आज जवळपास या जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी मध्ये ५०० कर्मचाऱ्यांचा चरितार्थ चालवत चालतो. सर्व मालक अतिशय दानशूर व्यक्तिमत्व आहेत, गावातील कोणत्याही कार्यासाठी श्री जी च्या माध्यमातून नेहमीच सढळ हाताने मदत केली जाते. आज सकाळी विधिवत पध्दतीने श्रीजी भगवान यांच्या प्रतिमेचे पूजन शेतकऱ्यांच्या…

Read More

नाशिक वृत्तसंस्था: जग एकविसाव्या शतकाकडे जात आहे शिक्षणामध्ये मुलांबरोबर मुलींनी मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे मुली आज मोठ्या पदांवर काम करत आहे देश पातळीवर विश्व पातळीवर सुद्धा मुलींनी आपला ठसा उमटविला आहे. असे असले तरी शिक्षण घेतले नावापुढे पदव्या लावल्या म्हणजे आपण सुशिक्षित झालो असे होत नाही असाच काहीसा प्रकार नाशिक येथे घडला चक्क डॉक्टर नववधूची कौमार्य चाचणी करण्याचा प्रयत्न होणार होता. त्यातही विशेष म्हणजे मुलीचा होणारा नवरा हा मर्चंट नेव्हीमध्ये. यावर आता बोलणार तर काय? धार्मिक दृष्ट्या नाशिक शहराला फार महत्त्व आहे हे या ठिकाणी कुंभमेळा भरला जातो अशाच नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावर एका हॉटेलमध्ये नुकताच एक विवाह सोहळा आयोजन…

Read More