लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्ह्यात जलग्रामोत्सव या नावाने प्रसिद्ध असलेले जळगाव नगरीचे ग्रामदैवत व वारकरी संप्रदायाची परंपरा असलेले श्रीराम मंदिर संस्थानतर्फे दरवर्षी रथोत्सव मोठया उत्साहात पार पडतो. यावर्षी रथोत्सवाचे हे १४९ वे वर्ष असून श्रीराम मंदिर संस्थानचे विश्वस्त गादीपती हभप मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता मंदिराच्या प्रांगणात श्रीराम रथाचे महापुजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. कार्तिक प्रबोधिनी एकादशीनिमित्त जळगाव शहरातून रथोत्सवास मोठया उत्साहाने भक्तीभावाने करण्यात येते. त्यानुसार १५ नोव्हंेंबर कार्तिक शुद्ध एकादशी सोमवारी सकाळी ४ वाजता काकडआरती, प्रभूरामचंद्रांच्या मूर्तीस महाभिषेक, सकाळी ७ वाजता महाआरतीनंतर पंचपदी सांप्रदायिक भजनाने वातावरण मंत्रमुग्ध होउन गेले होते. सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास मंदिराच्या प्रांगणात गादीपती…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: गर्भवती महिला दोन्ही नणंदा सह रस्त्यावर शतपावली करीत असताना दारूड्या दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत तिचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील वावडदा येथे घडली असून संबंधीत महिलेच्या कुटुंबियांनी दोषीवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोवर तिचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याने तणावाचे वातावरण पसरले आहे. या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील वावडदा येथील ज्योती दीपक गोपाळ (वय २१) ही गर्भवती महिला आपल्या मीनी आणि दीपाली या दोन्ही नणंदांच्या सोबत वावडदा ते म्हसावद या रोडवर शतपावली करत होत्या. इतक्यात सुपडू विक्रम जाधव (रा. वावडदा, ता. जळगाव) हा दुचाकीस्वार भरधाव वेगाने आला. त्याने ज्योतीला मागील बाजूने जोरदार धडक देऊन तिला…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी बुद्रुक येथील कापूस व्यापारी भावजयीच्या अंत्यविधीसाठी बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत घरातून ३ लाख ७० हजाराची रक्कम चोरट्यानी लंपास केली. या चोरीचा मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी बुद्रुक येथील कापूस व्यापारी काशिनाथ गुजराती (वय-६२) यांच्या वाहिनीचे निधन झाल्याने ते त्यांच्या अंत्यविधीसाठी घोडसगाव येथे गेले होते. घोडसगाव येथे जाण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या घरातील कपाटात तीन लाख ७० हजार रुपयांची रक्कम ठेवून कपाटाची चावी एका पिशवीत ठेवली होती. अंत्यविधी आटोपल्यानंतर ते त्याच दिवशी दुपारी निमखेडीत परतले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी पैसे काढण्यासाठी कपाट उघडले, त्यावेळी त्यांना कपाटात ठेवलेले पैसे नसल्याचे दिसून आले होते. त्यांनी पत्नी…
धरणगाव लक्ष्मण पाटील । शहरापासून जवळ असलेल्या सोनवद रस्त्यावर असलेल्या स्मशानभूमीतील बंद खोलीत दारूच्या बाटल्या, झोपण्यासाठी गादी आणि कंडोमचे पाकिटे आढळले आहे. यामुळे धरणगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर माहिती अशी की, सोनवद रोडवर स्मशाभभूमी आहे. ही खोली नेहमी कुलूप लावून बंद असते. दरम्यान अंत्यसंस्कारासाठी काही वस्तू असतील म्हणून याकडे सर्वांचे दुर्लक्ष असते. दरम्यान आज सोमवारी १५ नोव्हेंबर रोजी सकाळी अज्ञात व्यक्तीने खोलीचे कूलूप तोडले असता खोलीत दारूच्या बाटल्या, गादी, ताट, तांब्या, कंडोमचे पाकिट, तेलाचे डबे, ग्लास, एका पिशवीत कांदे, इतर पदार्थ आणि काही दुचाकी गांड्या नंबरे प्लेटा आढळल्या आहे. त्यामुळे हा प्रकार नेमका काय आहे याची माहिती अद्याप…
प्रतिनिधी प्रविण पाटील: तालुक्यातील म्हसावद ते जळगाव रेल्वे रुळावर 14 रोजी रात्री ११वाजेच्या सुमारास कुर्हाडदा गावाच्या जवळ असलेल्या रेल्वे पुलाजवळ खांबा क्रमांक ४०३/१०,११दरम्यान नाशिक मुंबई अपलाइनला एक अनोळखी व्यक्तीचा रेल्वे अपघात मृत्यू झाला आहे याबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यू नोंद झाली आहे. म्हसावद ते जळगाव रेल्वे रुळावर कुर्हाडदा गावाच्या जवळ असलेल्या रेल्वे पुलाजवळ खांबा क्रमांक ४०३/१०,११दरम्यान अंदाजे ३०ते३५वर्ष असल्याचं सांगितलं जातं तसेच मयत व्यक्तीने काळ्या रंगाची पॅन्ट व चेक्सच शर्ट परिधान केलेले दिसते तसेच वर्ण निमगोरा आहे रेल्वे कर्मचारी यांनी कळविल्या नंतर आज २:२०च्या सुमारास औद्योगिक वसाहत पोलिस स्टेशन जळगाव येथे अकस्मात मृत्यूची नोंद १३९/२०२१क्रमांकाने करण्यात आली आहे.सदर अपघातात मयताचे वय…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: दोन हजारांची लाच स्वीकारताना भुसावळ दुय्यम कारागृहातील तुरूंग रक्षक अनिल लोटन देवरे यांना जळगाव एसीबीच्या पथकाने सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. तक्रारदार यांच्या नातेवाईकाविरोधात गुन्हा दाखल आहे. ते भुसावळ येथील दुय्यम कारागृहात आहे त्यांना भेटण्यासाठी दुय्यम कारागृहातील तुरूंग रक्षक अनिल लोटन देवरेयांनी तीन हजारांची लाच मागितली होती मात्र दोन हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवली व सापळा रचण्यात आला.सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास भुसावळ कारागृहात तक्रारदाराकडून देवरे यांनी दोन हजारांची लाच स्वीकारताच त्यांना पंचांसमक्ष अटक करण्यात आली. हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील व पोलीस…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊनही तहसीलदार, मुख्यधिकारी कारवाई करीत नसल्याने 17 रोजी गायरान बचाव मंचाच्या वतीने पशुधन पालक, शेतकरी,इत्यादीसह शासकिय गायरान जमिनीच्या बचावासाठी शांततेचा मार्गाने मूक मोर्चाचे आयोजन केलेले आहे. अतिक्रमण मोर्चानंतर २२ हजार नागरीकांच्या सह्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात येईल धरणगाव शहरातील अमळनेर रोड लगत असलेल्या गट नं.१२४८ व १२४८/१,१२४८/२ मधील गायरान जमीन ३ हेक्टर ५१ आर असून त्या जमिनीचा पूर्वापार पासून गायरान म्हणून वापर केला जात आहे.आणि संबंधित गट नंबर वरील सातबाऱ्यावर देखील गायरानसाठी आरक्षित म्हणून उल्लेख आहे.असे असताना देखील धरणगावातील काही समाजकंटकांनी मानवसेवा संकल्प प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेला हाताशी धरून संगनमताने…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: पाचोरा तालुक्यातील सावखेडा बु” येथील ३५ वर्षाचा जवान नक्षलवाद्यांशी लढतांना शनिवारी मध्यरात्री पठाणकोट (पंजाब) येथे शहिद झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे सावखेडा बु”, सावखेडा खु”, वरखेडी, डांभुर्णी, मोंढाळे ता. भुसावळ सह परीसरात मोठी शोककळा पसरली असून सावखेडा गावी घटनेची माहिती मिळताच मोठा जनसमुदाय लोटला होता. वृद्ध आई वडील, दोन भावंडासह नातेवाईक व गावकऱ्यांनी एकच आक्रोश केला. शहिद जवानाचे पार्थीव सोमवारी पठाणकोट येथून विमानाने औरंगाबाद येथे आल्यानंतर तेथुन मिलट्रीच्या वाहनातून गावी आणल्यानंतर सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहे.पाचोरा शहरापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या सावखेडा बु” येथील जवान मंगलसिंग जयसिंग परदेशी (वय – ३५) हा…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शिवाजीमहाराजांचे चरित्र महाराष्ट्राच्या घराघरात नेणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे दीनानाथ रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले गेल्या 60 वर्षा पासून शिवाजी महाराज यांचा इतिहास त्यांनी राज्यात नव्हे तर सातासमुद्रापार नेले आहे शिवाजी महाराज यांचे व्याख्यानांच्या आणि अन्य कामांच्या निमित्ताने देशा-परदेशात अखंड भ्रमंती सुरू असलेल्या बाबासाहेबांनी नुकतेच शंभराव्या वर्षांत पदार्पण केले होते. त्यानिमित्ताने त्यांच्या झालेल्या अनेक मुलाखतींमधून त्यांनी उत्साहाने दीड-दीड तास आपले मनोगत व्यक्त केले होते. २६ ऑक्टोबरला सकाळी ते उठले असता त्यांचा तोल गेला आणि त्यांच्या डोक्याला इजा झाली. त्यानंतर त्यांना तातडीने एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.तेथेही पहिले दोन दिवस ते व्यवस्थित बोलत…
वार्ताहर भाईदास पाटील: तालुक्यातील भवरखेडे येथे कायदेविषयक शिबिर उत्साहात संपन्न झाले. जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाने दिवाणी व फौजदारी न्यायालय धरणगाव व तालुका वकील संघ यांच्यातर्फे भवरखेडे येथे कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धरणगाव दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश एस. डी. सावरकर साहेब होते. याबाबत सविस्तर माहिती अशी की, भवरखेडा येथे दिनांक १३/११/२०२१ रोजी सकाळी ११ वाजता सदर कार्यक्रम विठ्ठल मंदिर भवरखेडे बु. येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात धरणगाव न्यायालयाचे न्यायाधीश एस. डी. सावरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. तद्नंतर धरणगाव न्यायालयाचे न्यायाधीश सावरकर साहेब यांचा सत्कार गावचे सरपंच किरण पाटील यांच्या…

