लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: रावेर विकासो मतदार संघात माजी आ.अरुण पांडुरंग पाटील यांना जनाबाई गोंडू महाजन यांनी जाहिर पाठिंबा दिल्यानंतर गेल्या १० दिवसांपासुन राजकीय वातावरण शांत होते. अचानक मतदानाच्या दिवशीच महाजन यांनी राजकीय खेळी खेळत स्वत:च्या पारड्यात मते पाडण्यासाठी फिल्डींग लावल्याने रावेर तालुक्यात अचानक पाठीत खंजीर खुपसले गेल्याने राजकारणाची दिशा आगामी काळात बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेवटी जाहिर पाठिंब्यानंतर जर चुरशीची लढत होवून कुणीही विजयी झाला. शेवटी याठिकाणचे राजकारण भविष्यात हमरी तुमरीवर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रावेर विकासो मतदार संघात जनाबाई गोडू महाजन या उमेदवार खडसे व आ.चौधरी गटाच्या होत्या. तसेच अरुण पांडुरंग पाटील यांना भाजपाच्या गटाने…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव प्रविण पाटील। तालुक्यातील कुसुंबा येथील अंगणवाडी येथे राज्य महिला बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल यांनी रविवारी २१ नोव्हेंबर रोजी दुपारी भेट देवून कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे महिला बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र राऊत, जळगाव बालविकास प्रकल्प अधिकारी विजयसिंग परेदशी, तालुका प्रकल्प अधिकारी सुधा गिंधेवार आदी उपस्थित होते. भेटीदरम्यान आयुक्त रूबल अग्रवाल यांनी अंगणवाडीत महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ३ते६वर्ष वयोगटातील आकार बालशिक्षण क्रम साहित्य व कृतीची पहाणी केली. पोषण आहार योजना तसेच शासनाच्या अंगणवाडी संबंधित सर्व योजनांचा लाभ व माहिती लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचविता की नाही हे उपस्थितांनकडुन जाणुन घेतली. तसेच कुपोषित मुले, रक्ताल्पता असलेल्या…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: अतिवृष्टीग्रस्तांना तसेच वादळग्रस्तांना अल्प मदत देऊन शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीबाबतही बळीराजाची फसवणूक केली. पीक विमा कंपन्यांना फायदेशीर अटी बनवून नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित ठेवले. नैसर्गिक संकटांमुळे खचलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याऐवजी महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या भ्रष्ट, नाकर्त्या आणि कोडग्या कारभारामुळे उद्ध्वस्त केले, असा घणाघाती आरोप भारतीय जनता पार्टीचे खा.उन्मेष पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. यावेळी आ.सीमा हिरे, सरचिटणीस पवन भगुरकर, सुनिल बच्छाव, देवदत्त जोशी, प्रविण अलई आदी उपस्थित होते.श्री.उन्मेष पाटील यांनी या पत्रकार परिषदेत आघाडी सरकारच्या शेतकरी द्रोही भूमिकेचा पंचनामाच सादर केला. ते म्हणाले की, सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांना बांधावर जाऊन हेक्टरी…
जळगाव प्रतिनिधी: आज एस टी महामंडळाने काही बसेस सुरु केल्यावर त्यापैकी चोपड्याला जाणाऱ्या बसवर ममुराबादजवळच्या रेणुकामाता मंदिराजवळ अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली . एस टी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे प्रतीक्षा यादीतील ३८ चालक व वाहकांना कामावर बोलावून आजपासून जळगाव आगारातून बसेस काही मार्गांवर सोडण्यात आल्या . यापैकी चोपडा मार्गावर एक बस जळगाव आगारातून दुपारी सोडण्यात आली ही बस चोपड्याकडे जात असताना ममुराबादजवळच्या रेणुकामाता मंदिराजवळ अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली आणि काचा फोडल्या . या बसवर आजच रुजू करून घेतलेले चालक आणि वाहक नेमलेले होते . या घटनेची माहिती कळल्यावर एस टी चे विभाग नियंत्रक भगवान जोगणार…
धरणगाव लक्ष्मण पाटील: येथील कापूस उद्योग क्षेत्रातील नामांकित अशी श्रीजी जिंनिंग फॅक्टरी आज दिनांक २१/११/२०२१ रोजी २० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. आज पासून २० वर्षांपूर्वी याच दिवशी धरणगाव शहरातील दिग्गज व्यक्तिमत्त्व नयनशेठ गुजराथी, माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी, जीवनआप्पा बयस, स्व. प्रकाशशेठ कर्वा यांनी ‘शेतकरी सुखी तर, जग सुखी’ या संकल्पनेने प्रेरित होऊन, हा उद्योग सुरू केला होता. आज जवळपास या जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी मध्ये ५०० कर्मचाऱ्यांचा चरितार्थ चालवत चालतो. सर्व मालक अतिशय दानशूर व्यक्तिमत्व आहेत, गावातील कोणत्याही कार्यासाठी श्री जी च्या माध्यमातून नेहमीच सढळ हाताने मदत केली जाते. आज सकाळी विधिवत पध्दतीने श्रीजी भगवान यांच्या प्रतिमेचे पूजन शेतकऱ्यांच्या…
नाशिक वृत्तसंस्था: जग एकविसाव्या शतकाकडे जात आहे शिक्षणामध्ये मुलांबरोबर मुलींनी मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे मुली आज मोठ्या पदांवर काम करत आहे देश पातळीवर विश्व पातळीवर सुद्धा मुलींनी आपला ठसा उमटविला आहे. असे असले तरी शिक्षण घेतले नावापुढे पदव्या लावल्या म्हणजे आपण सुशिक्षित झालो असे होत नाही असाच काहीसा प्रकार नाशिक येथे घडला चक्क डॉक्टर नववधूची कौमार्य चाचणी करण्याचा प्रयत्न होणार होता. त्यातही विशेष म्हणजे मुलीचा होणारा नवरा हा मर्चंट नेव्हीमध्ये. यावर आता बोलणार तर काय? धार्मिक दृष्ट्या नाशिक शहराला फार महत्त्व आहे हे या ठिकाणी कुंभमेळा भरला जातो अशाच नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावर एका हॉटेलमध्ये नुकताच एक विवाह सोहळा आयोजन…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. अर्ज प्रक्रिया १६ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ६ डिसेंबर २०२१ आहे.पदाचे नाव आणि जागा : 1) सिनियर रिलेशनशिप मॅनेजर 3262) e-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर 50 शैक्षणिक पात्रता: पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 1.5 वर्षे अनुभव. अर्जाचं शुल्क बँक ऑफ बडोदाकडून खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं अर्जाचं शुल्क 60 रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवार, महिला आणि दिव्यांग उमेदवारांना 100 रुपये अर्जाचं शुल्क द्यावं लागेल. ऑनलाईन अर्ज कुठं दाखल करायचा? पात्र…
नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – ऑनलाइन गांजा पुरवल्याबद्दल अॅमेझॉनच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचा अंदाज आहे की साधारण एक लाख ४८ हजार कोटी डॉलर्स किमतीचा एक हजार किलो गांजा आत्तापर्यंत अॅमेझॉनच्या माध्यमातून विकला गेला आहे. मध्यप्रदेश पोलिसांनी १४ नोव्हेंबररोजी दोघांना २० किलो गांजासह ताब्यात घेतलं होतं. त्यावेळी लक्षात आलं की हे लोक अॅमेझॉन वेबसाईटचा वापर गांजा खरेदी आणि पुरवठा करण्यासाठी करत होते. अॅमेझॉन इंडियाच्या कार्यकारी संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चौकशी केली कंपनीची कागदपत्रं आणि दिलेली उत्तरं यात तफावत आढळून आल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या आधीही या संचालकांशी गांजा तस्करीविषयी चौकशी केली…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचारींचा संप सुरू असताना आज प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना कामावर घेत बससेवा सुरू केली. आज धुळे आगार बसस्थानकातून चार बस मार्गस्थ झाल्या. या चार बसवर अज्ञातानी हल्ला करत बसच्या काचाफोडल्याचा प्रकार घडला. धुळे परिवहन विभागातर्फे यापूर्वीच एसटी भरतीमध्ये निवड झालेल्या परंतु अद्यापपर्यंत सेवेत रुजू न करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू करून घेत बस सेवा सुरू करण्यात आली आहे. तब्बल १४ दिवसानंतर आज धुळे एसटी आगारातून लालपरी मार्गस्थ करण्यात आली होती. सकाळी पोलिसांचा मोठा फौजफाटामध्ये या बसेस आगारा बाहेर पडल्या. परंतु मार्गस्थ होत असताना अज्ञातांनी व्यक्तींनी चार बसेसवर दगडफेक केली आहे. त्यामध्ये एक एसटी चालक जखमी…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या चौदा पंधरा दिवसांपासून संप पुकारला आहे आणि आज शासनाच्या आदेशाने पुन्हा बस सेवा सुरू करण्यात आली आहे बहुजन क्रांती मोर्चा च्या पदाधिकाऱ्यांनी याला विरोध दर्शविला त्यामुळे पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतलेबहुजन क्रांती मोर्चा ने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला आहे तर आज शासनाच्या आदेशाने जळगाव धुळे बस सेवा सुरू करण्यात आली याला विरोध दर्शविला म्हणून बहुजन क्रांती मोर्चा च्या पदाधिकाऱ्याला ताब्यात घेतले.

